कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#wdr
संडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे.

कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)

#wdr
संडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 45 मिनटं
4 सर्विन्ग
  1. 1/2 किलोबासमती तांदूळ
  2. 450 ग्रॅम कोलंबी धुऊन साफ केलेली
  3. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  5. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  6. 1/4 टेबलस्पूनधने पूड
  7. 1/4 टेबलस्पूनहळद
  8. 2 टेबलस्पूनआले-लसूण पेस्ट
  9. 2 टेबलस्पूनचिंचेची पेस्ट
  10. 2कांदे बारीक चिरलेले
  11. 2टोमॅटो बारीक चिरलेले
  12. खडा मसाला
  13. 2तमालपत्र
  14. 2दालचिनीचे तुकडे
  15. 1चक्रीफुल
  16. 1मोठी वेलची
  17. 3-4 छोटी वेलची
  18. 3-4 काळीमिरी आणि लवंग प्रत्येकी
  19. 1/2 टीस्पूनजीरे
  20. 1 वाटी मोठी ओल्या नारळाचे दूध
  21. मीठ चवीनुसार
  22. कोथिंबीर बारीक चिरलेली
  23. तळलेला कांदा
  24. पुदिन्याची पाने
  25. 2 टेबल स्पूनखाण्याचा पिवळा कलर
  26. 2 टेबल स्पूनलिंबाचा रस
  27. 3-4 टेबलस्पून साजूक तूप
  28. 6-7 टेबलस्पून तेल
  29. पाणी

कुकिंग सूचना

1 तास 45 मिनटं
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन एक तासभर पाण्यात किमान भिजत ठेवणे

  2. 2

    कोळंबी स्वच्छ धुवुन आणि साफ करून तिला मॅरीनेट करणे. त्यासाठी कोलंबी मध्ये हळद गरम मसाला,लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट, चिंचेची पेस्ट हे सर्व कोलंबी मध्ये व्यवस्थित मिक्स करून कोलंबीला अर्धा तास मॅरीनेट करणे.

  3. 3

    बिर्याणी साठी लागणारा तांदूळ शिजवण्यासाठी टोपात पाणी गरम करणे व त्यामध्ये भातापुरतं मीठ मिक्स करणे. त्यामध्ये भिजवलेला तांदूळ ॲड करणे. आणि तांदळाला 80 ते 90 टक्क्यापर्यंत शिजवून घेणे.

  4. 4

    बिर्याणी साठी लागणारी कोलंबीची ग्रेवी तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेणे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, खडा मसाला,कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेणे. नंतर त्यामध्ये मॅरीनेट केलेली कोलंबी ॲड करणे. बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करणे. नारळाचे दूध आणि पाणी मिक्स करणे.मीठ घालणे.कोलंबीला झाकण लावून दहा मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेणे. कोलंबीची ग्रेवी शिजली की झाकण काढून पुन्हा तीन ते चार मिनिटे ग्रेव्हीला उकळू देणे आणि घट्टसर ग्रेव्ही तयार करून घेणे.

  5. 5

    बिर्याणीच्या लेयर करण्यासाठी एका मोठा पातेल्यामध्ये तळाशी कोलंबी ची ग्रेवी घालून घेणे. त्यावर शिजवलेल्या भाताची लेयर देणे. भाताची लेयर देऊन झाली की वरून तळलेला कांदा,चिरलेली कोथिंबीर व पुदिन्याची पाने घालणे. खाण्याचा कलर,लिंबाचा रस तूप घालणे.व थोडासा बिर्याणी मसाला वरतून भुरभूररवने.

  6. 6

    बिर्याणीला मंद आचेवर सात ते आठ मिनिटे झाकण लावून वाफवून घेणे. तयार गरम गरम बिर्याणी कांदा आणि लिंबू सोबत सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

Similar Recipes