चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#br
बिर्याणी चा बेत करायचा म्हंटल कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत.मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनववं असेल.त्यामुळे कोणत्या बिर्याणीचा बेत करायचा असं म्हंटल कि यामध्ये बुहुतांश नॉनव्हेज प्रेमिंची चिकन बिर्याणीलाच पसंती असतें. म्हणूनच मला चिकन बिर्याणी बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. आज मी या कॉन्टेस्ट साठी माझी चिकन बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करतेय.
अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या.

चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

#br
बिर्याणी चा बेत करायचा म्हंटल कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत.मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनववं असेल.त्यामुळे कोणत्या बिर्याणीचा बेत करायचा असं म्हंटल कि यामध्ये बुहुतांश नॉनव्हेज प्रेमिंची चिकन बिर्याणीलाच पसंती असतें. म्हणूनच मला चिकन बिर्याणी बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. आज मी या कॉन्टेस्ट साठी माझी चिकन बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करतेय.
अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास 30 मिनटं
4 सर्व्हरिंग
  1. 1/2 किलोलोकल बासमती तांदूळ
  2. 1/2 किलोचिकन
  3. खडा मसाला (1 ते 2 तमालपत्र,1 मोठी वेलची,2 लहान वेलची,1 चक्री फुलं,3 ते 4 लवंग आणि काळी मिरी,1 ते 2 दालचिनी)
  4. 200 ग्रॅमदही
  5. 1-1/2 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  7. 1-1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  9. 1/2 टेबलस्पूनहळद
  10. 1/2 टेबलस्पूनधने पूड
  11. 1/2 टेबलस्पूनजीरे पूड
  12. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  13. 6कांदे
  14. 2टोमॅटो
  15. 7ते 8टेबलस्पून तेल
  16. 1/2 टेबलस्पूनजिरं
  17. 1 वाटीचिरलेली कोथिंबीर
  18. 1 वाटीमोठी वाटी पुदिन्याची पानं
  19. 2 टेबल स्पूनखाण्याचा कलर
  20. 4-5 टेबलस्पूनसाजूक तूप
  21. मीठ चवीनुसार
  22. 1/4 टीस्पूनसाखर
  23. पाणी

कुकिंग सूचना

2 तास 30 मिनटं
  1. 1

    बसामाती तांदूळ 3 ते 4 पाण्यात धुवून 1 तास पाण्यात भिजत ठेवणे.

  2. 2

    चिकन स्वच्छ धुवून त्यात 200 ग्रॅम दही 1 आणि 1/2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट,1 टेबलस्पून बिर्याणी मसाला,1 आणि 1/2 टेबलस्पून लाल तिखट,1/2 टेबलस्पून हळद,1/2 टेबलस्पून गरम मसाला,1 टेबलस्पून लिंबाचा रस घालून चिकन ला सर्व साहित्य नीट लावून दीड तासासाठी मॅरीनेट करणे.

  3. 3

    1 तासाने बिर्याणी साठी लागणारा तांदूळ शिजवणे. त्यासाठी गॅस वर एका पातेल्यात 4 ते 5 ग्लास पाणी गरम करून त्यात खडा मसाला घालणे.(1 तमालपत्र,1 मोठी वेलची,2 छोटी वेलची,1 चक्री फुलं,3 ते 4 काळी मिरी आणि लवंग, 1 ते 2 दालचिनी) नंतर त्यात तांदळापूरत मीठ घालणे. पाण्याला उकळी आली कि त्यात भिजवलेला तांदूळ घालणे. तांदूळ 80 ते 90 टक्के शिजवून घेणे. तांदूळ शिजला कि त्यातील एक्सट्राच पाणी काढून भात थंड करायला ठेवणे.

  4. 4

    बिर्याणी साठी लागणारा कांदा तळून घेणे.3 कांदे उभे चिरून त्यांना थोडं मीठ व साखर लावून कांदा हाथाने कुस्करून मोकळा करून घेणे.5 ते 10 मिनटं कांदा बाजूला ठेवणे. 10 मिनीटांनी कढई मध्ये तेल गरम करून कांदा छान लालसर आणि कुरकुरीत होईपर्यन्त तळून घेणे.

  5. 5

    बिर्याणी साठी लागणारी चिकन ग्रेव्ही शिजवणे. त्यासाठी कढई गॅस वर ठेवून त्यात तेल घालणे. तेल गरम झालं कि त्यात 1/2 टेबलस्पून जिरं घालणे. नंतर त्यात एक तमालपत्र आणि 3 कांदे बारीक चिरून घालणे. कांदा लालसर होईपर्यत छान परतून घेणे. कांदा लालसर परतला कि त्यात 2 टोमॅटो बारीक चिरून घालणे. टोमॅटो छान मऊ झाले कि त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालणे. नंतर त्यात 1/2 टेबलस्पून धने पूड आणि 1/2 टेबलस्पून जिरं पूड व चिरलेली कोथिंबीर घालणे. चिकन मध्ये पाणी घालून 15 ते 20 मिनिट झाकण लावून चिकन शिजवणे.

  6. 6

    बिर्याणी च्या लेअर तयार करणे. त्यासाठी एका जाड बुडाच्या पातेल्यात तळाला शिजवलेली चिकन ग्रेव्ही घालणे. नंतर त्यात शिजवून थंड केलेला तांदूळ घालणे.नंतर तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर व पुदिन्याची पानं घालणे. नंतर 1 टेबलस्पून खाण्याचा कलर आणि 3 टेबलस्पून साजूक तूप घालणे.वरतून थोडासा बिर्याणी मसाला आणि लिंबू पिळून घेणे. अश्याप्रकारे दुसरी लेअरही करून घेणे.

  7. 7

    बिर्याणी च्या लेअर करून झाल्या कि झाकण लावून बिर्याणीला गॅस वर मंद आचेवर 7 ते 8 मिनटं वाफ काडून घेणे. नंतर गरम गरम तयार बिर्याणी प्लेट मध्ये काढून कांदा आणि लिंबाच्या फोडी सह सर्व्ह करणे.

  8. 8

    टीप : बिर्याणी साठी तांदूळ वापरताना तो शिजवून थंड करून मगच वापरावा. थंड झाला कि भात छान मोकळा होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

Similar Recipes