पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#br बिर्याणी स्पेशल
अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी माझी करून झाली.म्हणून मी आज पनीर बिर्याणी केली. खूप छान झालेली.
तुम्ही नक्की करून बघा.

पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)

#br बिर्याणी स्पेशल
अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी माझी करून झाली.म्हणून मी आज पनीर बिर्याणी केली. खूप छान झालेली.
तुम्ही नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3 जणांसाठी
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 2 कपपाणी
  3. 1 टीस्पूनतेल किंवा तूप
  4. 3-4काळीमिरी
  5. 1/2 इंचदालचिनी तुकडा
  6. 1तमालपत्र
  7. 2वेलदोडे
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1 कपपनीरचे तुकडे
  10. 1/4 कपदही
  11. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  12. 2 टेबलस्पूनपुदिन्याची पाने
  13. 1 -1 टीस्पूनकसुरी मेथी
  14. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  17. 1/2 टीस्पूनधने पावडर
  18. 1 टीस्पूनकांदा लसूण मसाला
  19. 1 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  20. 1 टीस्पूनगरम मसाला
  21. 1 टीस्पूनतेल
  22. चवीप्रमाणे मीठ
  23. 2कांदे
  24. 1टोमॅटो
  25. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  26. 2हिरव्या मिरच्या
  27. थोडी कोथिंबीर व पुदिन्याची पाने
  28. 1कांदा
  29. 3-4 टेबलस्पूनतेल किंवा तूप

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    एका वाटी मध्ये दही,हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला, कांदा लसूण मसाला,गरम मसाला, धने-जीरे पावडर, मीठ, पुदीना व कोथिंबीर,कसुरी मेथी हातावर चोळून घालावी. सर्व एकत्र करुन मिक्स करून घेणे.

  2. 2

    मिक्स केलेल्या मिश्रणात पनीरचे तुकडे व 1 टीस्पून तेल घालून चांगले मिक्स करून घेणे.1/2 तास झाकून ठेवावे.

  3. 3

    2 कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिन्याची पाने चिरून घेणे. एक कांदा उभा चिरून घ्यावा. तो तेलात लालसर तळून घ्यावा.

  4. 4

    बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून ठेवणे.गॅसवर एका पातेल्यात 2कप पाणी घालून गरम करत ठेवावे. त्यात सर्व खडा गरम मसाला घालणे. तेल किंवा तूप व मीठ घालून चांगले हलवून घेणे.

  5. 5

    उकळी आल्यावर त्यात तांदूळ घालावे. अर्धवट कच्चा भात शिजवून घेणे. त्यातील शिल्लक पाणी चाळणीने निथळून घ्यावे.

  6. 6

    गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल किंवा तूप घालणे.जीरे, हिरवी मिरची घालून परतवून घेणे.कांदा घालून थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेणे. आलं लसूण पेस्ट व टोमॅटो घालून परतवून घ्यावे.

  7. 7

    नंतर सर्व मसाले घालून परतणे. मीठ व थोडे थोडे पाणी घालून 2-3 मिनिटे शिजवून घेणे. कोथिंबीर व पुदिन्याची पाने चिरून घालावी.

  8. 8

    गॅस मंद आचेवर ठेवून ग्रेव्ही थोडी घट्ट झाली की थोडा भाताचा लेयर दयावा.नंतर मुरवलेले पनीर घालून घेणे. तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिन्याची पाने घालून घेणे. नंतर उरलेला सर्व भात घालून घेणे. परत तळलेला कांदा घालणे. सर्वीकडे तूप घालून घेणे. कुकरला झाकण लावून घेणे. गॅसवर तवा ठेवावा.त्यावर कुकर ठेवून 25-30 मिनिटे ठेवावे. नंतर गॅस बंद करावा.

  9. 9

    खाण्यासाठी तयार पनीर बिर्याणी!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes