पाव वडा (pav vada recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#KS8 # नाशिकचा पाव वडा...

पाव वडा (pav vada recipe in marathi)

#KS8 # नाशिकचा पाव वडा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2उकडलेले बटाटे
  2. 1 टीस्पूनतेल
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. 1/4 टीस्पूनहिंग
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  7. चवीनुसारमीठ
  8. कोथिंबीर
  9. 4लादी पाव
  10. 1 कपबेसन आवरणाकरिता
  11. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  12. चवीनुसारमीठ
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 1 टीस्पूनआले आणि मिरचीची पेस्ट
  15. चिमुटभरसोडा
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    आधी बटाटे उकडून घ्यावेत आणि मॅश करून घ्यावे. एका बाजूला एका भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घ्यावे. त्यात हळद, मीठ, आले आणि मिरचीची पेस्ट, आणि चिमुटभर सोडा टाकावा. आणि थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घ्यावे. खूप घट्ट नको किंवा पातळ नको असे. त्यानंतर 5-10 मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवावे.

  2. 2

    तो पर्यंत आपण बटाट्याचे सारण करून घेऊ. त्यासाठी एका कढईत तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जीरे आणि हिंग टाकावा. छान तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेली मिरची टाकून छान परतून घ्यावी. आता त्यात हळद टाकावी. गॅस बंद करावा.

  3. 3

    लगेचच बटाटा टाकून नंतर त्यात चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर टाकावी.

  4. 4

    छान मिक्स करून घ्यावे. अशाप्रकारे सारण तयार आहे. आता एक पाव घेवू. त्याला मध्ये, फोटोत दाखवल्याप्रमाणे काप द्यावा. आणि त्यात मावेल तसे बटाट्याचे सारण भरावे. तोपर्यंत, तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे.

  5. 5

    आता बेसनाचे ब्याटर, मध्ये, सारण भरलेला पाव, बुडवून, सर्व बाजूंनी बेसन लागल्याची खात्री करून, तळण्यासाठी, तेलात टाकावे. मध्यम आचेवर तळून घ्यावे.

  6. 6

    अशा रीतीने सर्व वडे तळून घ्यावेत. सोबत तोंडी लावण्यासाठी, हिरवे मीरचेही तळून घ्यावेत. तळण्या आधी, मिरची थोडी कप देवून घ्यावी.

  7. 7

    आता हे गरमागरम पाव वडे, मिरची, कांदा, आणि चटणी किंवा सॉस सोबत खाण्यास द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes