खजूर सफरचंदाचे लोणचे (khajur safarchandache lonche recipe in marathi)

Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50

#AsahiKaseiIndia खजूर सफरचंदाचे लोणचे
Zero Oil रेसिपी
हे लोणचे बनवायचा उद्देश्य हा होता कि माझ्या मुलांना विटामिन C आणि सफरचंदाची पौष्टिकता दोन्ही मिळावी .मुलांना मधल्या वेळी खायला पोळी ला किंवा ब्रेड ला लावून दिलं कि मुलं आनंदानी खातात म्हणजे आपली कल्पकता मार्गी लागली हे सुख मिळतं.👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामलाल जरा आंबटसर सफरचंद
  2. 100 ग्रामबिया काढून बारीक काप केलेले खजूर
  3. 1 कपसाखर
  4. 1/4 कपव्हिनेगर
  5. 1-1/2 चमचेचवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सफरचंदाचा मधला भाग व बिया काढून  पण साल न काढता पातळ काप करा.

  2. 2

    आता हे काप 2-3 मिनिटे चाळणी वर ठेवून किंवा 30-30 सेकंद मायक्रो करून शिजवून घ्या.

  3. 3

    आता साखरेत व्हिनेगर घालून जाडसर पाक तयार करा

  4. 4

    पाकात खजूर,लाल तिखट, मीठ आणि थोडे शिजवलेले सफरचंदाचे काप घालून 3 मिनिटे / 1 मिनिट मायक्रो करून थंड होऊ द्या.

  5. 5

    खजूर -सफरचंदाचे टेंगी लोणचे तयार आहे.

  6. 6

    तयार लोणचे स्वच्छ बरणित भरून घ्या. हे  लोणचे जर "सम्पले नाही तर"😍 फ्रिज मधे 3 महिने पर्यंत खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes