जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

जवसाची चटणी माझ्या मुलीला खुप आवडते चपाती चटणी रोल करून खाणे तर तिला खुप आवडते खुपच पोष्टीक व चविष्ट लागते जवस चटणी. 😋😋
#cn

जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

जवसाची चटणी माझ्या मुलीला खुप आवडते चपाती चटणी रोल करून खाणे तर तिला खुप आवडते खुपच पोष्टीक व चविष्ट लागते जवस चटणी. 😋😋
#cn

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनटे
20 लोकांन करता 1 टेबल स्पून
  1. 1 वाटीजवस
  2. 2 टीस्पूनजीरे
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 2 टीस्पूनमीठ
  5. 6-7लसूण पाकळ्या
  6. 1/2 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

20 मिनटे
  1. 1

    सुरवातीला साहित्य एका ठिकाणी घेऊ व जवस चाळून निट करुन घेतले आहेत.

  2. 2

    सुरवातीला जवस 7-10 मिनटे छान भाजून घेयचे. त्याचा रंग बदलेल इतपत भाजयचे आहेत.

  3. 3

    जवस चांगले तडतडु लागले की साईडला प्लेट मधे काढुन ठेवणे.

  4. 4

    त्याच पॅन मध्ये गॅस बंद करून 2 टीस्पून जीरे ही भाजुन घेऊ.

  5. 5

    अत्ता मिक्सरच्या भांडयात भाजलेले जवस, जीरे, लसुण पाकळ्या, 1टेबलस्पून तिखट व मीठ, हिंग घालून मिक्सर मधुन बारीक करून घेऊ.

  6. 6

    तिखट मीठ थोडे जास्त ठेवायचे म्हणजे चव छान लागते. ही चटणी भात वरण सोबत किंवा चपाती वर रोल करून खाऊ शकता खुप चविष्ट लागते.

  7. 7

    जवस चटणी 1 महिना छान राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

Top Search in

Similar Recipes