जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#cn
जेवणाच्या पानात उजवी आणि डावी बाजू अगदी बँलन्स हवी.हा बँलन्स जशा भाज्या,आमटी,पातळ भाज्या साधतात तशाच चटण्या,कोशिंबिरीही!!
हल्ली आहारात जवसाचा समावेश वाढला आहे.याचं मुख्य कारण म्हणजे जवस वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.शरिरातील कफाचे प्रमाण कमी करते.मधुमेह, रक्तदाब नियंत्रित ठेवते.ओमेगा 3चे भरपूर स्त्रोत असलेले फायबरयुक्त जवस हे शाकाहारी लोकांसाठी वरदानच आहे!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मि.
4-5व्यक्तींना आठवडाभर पुरते.
  1. 1 कपजवस
  2. 1/2 कपखोबरे कीस
  3. 1/4 कपशेंगदाणे
  4. 1/4 कपधणे
  5. 1/4 कपकढीपत्ता पाने
  6. 10-15लसूण पाकळ्या
  7. 6-7लाल सुक्या मिरच्या
  8. 1.5 टीस्पूनब्याडगी मिरची तिखट (रंग येण्यासाठी)
  9. 2 टीस्पूनमीठ अथवा चवीनुसार

कुकिंग सूचना

30मि.
  1. 1

    सर्व साहित्याची पूर्वतयारी करुन घ्यावी.
    जवस,खोबरे कीस,धणे,शेंगदाणे, कढीपत्ता,लाल मिरच्या हे सगळे एकेक करुन स्वतंत्र खरपूस भाजून घ्यावे. थोडे थंड होऊ द्यावे.

  2. 2

    लाल तिखट व मीठ लसूण घालून सर्व घटक मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.

  3. 3

    जवसाची चटणी भाकरीबरोबर थोडे कच्चे तेल घालून किंवा दही घालून खावी.पोळीचा चटणी घालून रोलही छान लागतो.
    अशी ही जवसाची आरोग्यदायी चटणी घरात केलेली हवीच!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes