सुपर साॅफ्ट मावा केक (mawa cake recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"सुपर साॅफ्ट मावा केक"

सुपर साॅफ्ट मावा केक (mawa cake recipe in marathi)

"सुपर साॅफ्ट मावा केक"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
सात
  1. 1/4 कपमावा
  2. 1/2 कपपिठी साखर
  3. 1 कपमैदा
  4. 1/4 कपबटर
  5. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  6. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    बटर आणि साखर पाच सहा मिनिटे चांगली फेटून घ्या..बटर रुम टेंम्परेचर चे असावे.

  2. 2

    मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या व मिक्स करा.बटर आणि साखर फेटलेल्या मिश्रणात घाला व मिश्रण एकजीव करून घ्या

  3. 3

    मिश्रणात वेलचीपूड व पाव कप दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

  4. 4

    मावा किसून घ्या व मिश्रणात घालून हलक्या हाताने एकजीव करून घ्या

  5. 5

    हे सगळे करण्याआधी केक ओव्हनमध्ये बेक करायचा असेल तर ओव्हन 180% ला प्रिहीट करायला ठेवून मग केक बॅटर बनवण्यासाठी सुरूवात करा... कुकरमध्ये किंवा कढईत केक बेक करायचा असेल तर त्यात एक कप मीठ पसरवून घाला, त्यावर एक स्टॅण्ड ठेवा, झाकण लावून दहा मिनिटे बारीक गॅसवर प्रिहीट करण्यासाठी ठेवा

  6. 6

    बेकिंग ट्रे मध्ये तेल लावून बटर पेपर घाला व तयार केक बॅटर ओतून सपाट करून घ्या.. मावा केक चे बॅटर घट्ट असावे.पातळ करु नये.. वरून हवे ते ड्रायफ्रुट्स चे काप घालावे

  7. 7

    प्रिहीट कढईत स्टॅण्ड वर केक टिन ठेवा झाकण ठेवून चाळीस मिनिटे मंद गॅसवर ठेवून बेक करा..तीस, पस्तीस मिनिटांनंतर टूथ पिक घालून चेक करा.शिजला असेल तर गॅस बंद करा.

  8. 8

    चाळीस मिनिटाने केक मस्त तयार होतो.. गॅस किंवा आपण किती जाडीचे भांडे केक शिजवण्यासाठी ठेवले आहे.त्यावर टाईम ठरेल.मस्त साॅफ्ट आणि जाळीदार मावा केक तयार होतो..

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes