साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#cn
साऊथ इंडियन पाककृती मधे चिंच, धणे, हरभरा, उडद डाळ चा समावेश प्रामुख्याने असतो. अशीच एक चटपटीत पाककृती टोमॅटोची चटणी.

साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)

#cn
साऊथ इंडियन पाककृती मधे चिंच, धणे, हरभरा, उडद डाळ चा समावेश प्रामुख्याने असतो. अशीच एक चटपटीत पाककृती टोमॅटोची चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 4टोमॅटो
  2. 1मोठा कांदा
  3. 1+1/2 टीस्पून तिखट
  4. 6लसुण पाकळ्या
  5. 1" आले
  6. 1चिंचेचे बुटूक
  7. 2 टीस्पूनगुळ पावडर
  8. 7-8कढिपत्ता
  9. 2सुख्या लाल मिरच्या
  10. 1 टेबलस्पूनहरभरा डाळ
  11. 1 टेबलस्पूनउडद डाळ
  12. 1 टीस्पूनतेल
  13. मीठ चवीनुसार
  14. फोडणी साहित्य *
  15. 2 टीस्पूनतेल
  16. 1 टीस्पूनधणे
  17. 1/2 टीस्पूनजीरे
  18. 1/2 टीस्पूनमोहरी
  19. 1/2 टीस्पूनहळद
  20. 1/4 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

10 मि.
  1. 1

    टोमॅटो व कांदा चिरून घ्यावा. सर्व साहित्य एकत्र जमवणे.

  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता, उडद डाळ, हरभरा डाळ घालून चांगले परतून त्यात कांदा,चिंच, आले, लसूण घालून परतून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटो, तिखट गुळ व मीठ घालून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    टोमॅटो थोडे शिजल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे. आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,हिंग,हळद,जीरे, कढिपत्ता, धणे, सुखी लाल मिरची घालणे, हि फोडणी चटणी वर घालून सर्व्ह करावे.

  4. 4

    चटपटीत साऊथ इंडियन टोमॅटो चटणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes