मायाळूची भाजी (mayaluchi bhaji recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

मायाळू ही एक रानभाजी. पण ती पावसाळ्यात जशी मिळते तशी इतरवेळी नेहमी नाही मिळत. कुंडीत बिया लावल्या तरी छान वेल बहरतो. थंड असल्याने पित्त किंवा उष्णता वाढल्यास ही भाजी देतात. पचायला हलकी...

मायाळूची भाजी (mayaluchi bhaji recipe in marathi)

मायाळू ही एक रानभाजी. पण ती पावसाळ्यात जशी मिळते तशी इतरवेळी नेहमी नाही मिळत. कुंडीत बिया लावल्या तरी छान वेल बहरतो. थंड असल्याने पित्त किंवा उष्णता वाढल्यास ही भाजी देतात. पचायला हलकी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
३-४
  1. 1जुडी मायाळू
  2. 1मोठा कांदा
  3. 7-8लसूण पाकळ्या
  4. 2-3 हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पून जीरे
  6. कोथिंबीर
  7. मीठ
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1/4 कपओलं खोबरं

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. मायाळूची कोवळी पाने धुवून घ्यावीत.

  2. 2

    मायाळू, कांदा, मिरची,लसूण, कोथिंबीर चिरुन घ्यावे.कढईत तेल गरम झाले की, जीरे तडतडू द्यावे.

  3. 3

    लसूण चांगला परतून कांदा-मिरची टाकावी. गुलाबी रंगावर परतून घ्यावे. मीठ टाकून हलवून मायाळू टाकावा. सर्व परतून घ्यावे. भाजीतले पाणी आटले की गॅस बंद करावा. वरुन कोथिंबीर व ओलं खोबरं घालून खावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

Similar Recipes