मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)

एक वाटी मसूर डाळ संपूर्ण पोषणाची पूर्तता करते. ही डाळ प्रत्येकाच्या आरोग्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपला प्रभाव दाखवते. ही डाळ इतर सर्व डाळींच्या तुलनेत स्वादिष्ट असते. आपल्या आवडीनुसार अनेक मसाले व टोमॅटो, बटाटा घालून आपण ही डाळ बनवू शकतो.
मसूराची डाळ व्हिटॅमिन व अन्य पोषक तत्व जसं की कॅल्शियम व मॅग्नेशियमचा एक समृद्ध स्त्रोत आहे. जे दात व हाडांचे आरोग्य स्वस्थ ठेवतात.
चला तर मग पाहूयात झटपट मसूर आमटी ..😊
मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
एक वाटी मसूर डाळ संपूर्ण पोषणाची पूर्तता करते. ही डाळ प्रत्येकाच्या आरोग्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपला प्रभाव दाखवते. ही डाळ इतर सर्व डाळींच्या तुलनेत स्वादिष्ट असते. आपल्या आवडीनुसार अनेक मसाले व टोमॅटो, बटाटा घालून आपण ही डाळ बनवू शकतो.
मसूराची डाळ व्हिटॅमिन व अन्य पोषक तत्व जसं की कॅल्शियम व मॅग्नेशियमचा एक समृद्ध स्त्रोत आहे. जे दात व हाडांचे आरोग्य स्वस्थ ठेवतात.
चला तर मग पाहूयात झटपट मसूर आमटी ..😊
कुकिंग सूचना
- 1
मसूर १ तास भिजत घालत घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. म्हणजे मसूर छान मऊसर शिजतील.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग,आलं लसूण घालून छान परतून घ्या. नंतर त्यात कांदा टोमॅटो छान शिजेपर्यंत परतून घ्या.
- 3
नंतर त्यात हळद,लाल तिखट,गरम मसाला,ओलं खोबरं घालून छान परतून घ्या.
- 4
नंतर त्यात मसूर स्मॅश करून तयार फोडणी मध्ये घालून छान मिक्स करा.अंदाजे पाणी,मीठ, कोथिंबीर,कोकम घालून आमटी मध्यम आचेवर १५ ते २० मि.छान शिजू द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अख्खा मसूर ची भाजी/ मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
मी मसूर ची पातळ भाजी बनविलेली आहे आमच्या घरात सर्वांना अशी भाजी खुप आवडते खूप टेस्टी आणि रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट भाजी आहे. Suvarna Potdar -
मसूर मखनी (masoor makhani recipe in marathi)
#dr इन्ग्रेडियंट मध्ये फक्त रुटीन मसाले अख्खा मसूर वापरून मसूर मखनी बनवली आहे... मी जैन आहे जैन लोकांमध्ये महिन्यामध्ये चार दिवस असे असतात की त्या दिवशी हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला जात नाही..2अष्टमी पौर्णिमा, अमावस्या... तेव्हा मसूर मखनी ही डिश आम्ही नेहमी बनवत असतो विदाऊट व्हेजिटेबल्स पण मसूर मखनी खूप छान लागते गरम गरम भाता सोबत तसेच पोळीसोबत पण छान लागते Gital Haria -
🩸मसूर गोळा सांबार
🩸मसूर हे एक कडधान्य असून त्यापासून डाळ केली जाते. या डाळीला अतिशय आकर्षक असा केशरी रंग असतो. शाकाहारी लोकांना प्रथिने मिळवण्यासाठी डाळी हे एक उत्तम पर्याय आहे. त्यापैकी मसूर डाळ ही इतर डाळींच्या तुलनेत चवदार व पौष्टिक असून त्यात जास्त प्रथिने असतात.या सांबारात संपूर्णपणे मसूर डाळ वापरली आहेअतीशय चवीष्ट व साधी सोपी अशी ही पाककृती आहे P G VrishaLi -
ढाबा स्टाईल अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#ढाबा_स्टाईल_अख्खा_मसूर#कुकपॅडची_शाळा या निमित्ताने इस्लामपूर या माझ्या जन्मगावातील एक प्रसिद्ध असणारा पदार्थ "अख्खा मसूर" याची रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. अख्खा मसूर हा घरोघरी थोड्याफार फरकाने जरा वेगळ्या पद्धतीने पण केला जातो. तरीही फारच चमचमीत असा अख्खा मसूर हा भाकरी. चपाती, भात कशाबरोबर पण खायला खूपच टेस्टी लागतो. बनवायला एकदम सोपा आहे. Ujwala Rangnekar -
झणझणीत अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccs "झणझणीत अख्खा मसूर भाजी" लता धानापुने -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccsढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#ks2#अख्खा मसूरसातारा जिल्ह्यातील व्हेज मधील सर्वात प्रसिद्ध पदार्थ. काही ढाबे तर या साठी प्रसिद्ध आहेत .काही लोक आवर्जुन तेथे जाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. मीही आज अख्ख्यामसूरची रेसिपी तुमच्यासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
मसूर भात (masoor bhat recipe in marathi)
अगदी पटकन होणारा आणि घाई गडबडी मध्ये एक छान पर्याय म्हणून मी नेहमी बनवते..हा मसूर भात..आज शेअर करतेय . Shilpa Gamre Joshi -
आख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#आख्खामसूर#मसूरकूकपॅड ची शाळा या अॅक्टिविटी साठी अख्खा मसूर तयार केला ही रेसिपी पहिल्यांदा मी माझ्या जाऊबाई ना बनवताना पाहिले आहे त्यांच्या हाताची ही रेसिपी मी टेस्ट केलेली आहे त्या खूप छान अख्खा मसूर बनवतातमी बनवते पण आज खूप छान तयार झाला आहे अख्खा मसूर रेसिपीजतून नक्कीच बघा Chetana Bhojak -
धाबा स्टाइल अख्खा मसूर (Akha masoor recipe in marathi)
कोल्हापूर स्पेशल झणझणीत अख्खा मसूर मसूर अतिशय रुचकर व सुंदर लागतो. Charusheela Prabhu -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मसूर पालक पौष्टिक डाळ (masoor palak dal recipe in marathi)
ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते. तर पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.तर चला आज आपण मसूर पालक पौष्टिक डाळ पाहू#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#kdrअख्खा मसूर सातारा सांगली भागातील ढाब्यांवर मिळणारी लोकप्रिय डिश. झटपट होणारी व चवदार अशी ही रेसिपी. मसूर मध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर आहे. झिंक कूकपॅड च्या कडधान्य रेसिपी थीम साठी झटपट होणारी "अख्खा मसूर " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
चमचमीत मसूर डाळ आमटी (masoor dal aamti recipe in marathi)
आमच्या घरी अशा पद्धतीने केली जाणारी मसूर डाळीची आमटी कशी आहे नक्की सांगा... भाता बरोबर छान लागते..घरी सगळ्यांना फार आवडते. Shilpa Gamre Joshi -
अख्ख्या मसूर खिचडी(akhya masoor khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी खिचडी... भाताचे प्रकार बनवू तितके कमी... आणि त्यात साधा भात सोडला तर खिचडी हा उत्तम संपूर्ण आहार... जास्त वेळ नाही लागत बनवायला व दही, लोणचे, पापड.. ह्या सोबत गरमागरम लवकर गट्टम होते Dipti Warange -
अख्खा मसूर खिचडी (akhya masoor Khichdi recipe in marathi)
#cooksnap # अख्खा मसूर खिचडी # सीमा माटे# यांची ही रेसिपी मी cooksnap केली आहे. पहिल्यांदाच मसूर वापरून खिचडी केली आहे. पण खूप मस्त, चविष्ट झाली आहे खिचडी...घरी सर्वांना आवडली... Varsha Ingole Bele -
अख्खा मसूर दाल फ्राय (akha masoor dal fry recipe in marathi)
#ccs मसूर हे अगदी उच्च protein युक्त आहे.या मध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात.दाल फ्राय मध्ये ही पण अतिशय चविष्ट अशीडाळ तयार होते.आपण अगदी फुलका, भाकरी पोळी सोबत सर्व्ह करू शकतो.:-) Anjita Mahajan -
करकंबची बाजार आमटी (karkambichi bajar amti recipe in marathi)
#KS2सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण बाज म्हणून चटक-फटक ड्गकरकंबची बाजार आमटी या प्रकाराची चव नाही चाखली तर कदाचित सोलापुरी चवविश्वातले अधुरेपण होऊ शकेल इतकी बाजार आमटी झपाट्याने महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागलीय. या रस्सा आमटीची एक पारंपरिक जन्मकथा आहे.काही शतकांपूर्वी व्यापारी आपला माल घोड्यावर लादून महिनो महिने करकंब (ता. पंढरपूर) या मध्यवर्ती गावात मुक्काम ठोकून असत. या व्यापारांना केवळ भाकरी बडवता येत असे. रात्रीच्या भोजनाला भाजी करायचे फारसे श्रम न घेता हे व्यापारी काळा मसाला, तेल, खोबरे, शेंगादाणे, तीळ, तूरदाळ, कच्चे मसाले असे सारे पदार्थ समप्रमाणात घेऊन त्यात लसूण, अदरक, कांद्याची दगडावर रगडून केलेली पेस्ट मिसळून या अफलातून मिश्रणाला खमंग फोडणी देत असत. यातून जी आमटी तयार झाली, त्याला नाव पडले करकंबची बाजार आमटी !सर्दी, पडसे, ताप, थंडी अशा हंगामी रोगावर एक जालीम उपाय म्हणून ही आमटी अर्धापावलिटर प्यायलाही ते व्यापारी कमी करत नसत. अत्यंत चवदार व तिखटपणा न बाधणारी ही आमटी. यातील पारंपरिक बाज जपून व बॉईलिंग टायमिंगचे व इतर मिश्रणपद्धती अधिक चवदार करण्याचे संशोधनात्मक तंत्रशुद्ध गणित आखून नव्या ढंगात गेली बारा वर्षे सोलापूर जिल्ह्याच्या हॉटेल उद्योगात नाव कमावतेय..चला तर पाहूयात,करकंबची बाजार आमटी! Deepti Padiyar -
मसुरडाळ तडका (आमटी) (masoor dal tadka recipe in marathi)
#dr#डाळ_रेसिपीज_कॉन्टेस्ट#मसूर डाळ- ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते.तसेच या मसुरडाळ ची माहिती म्हणजे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे .हे एक द्विदल धान्य आहे. या धान्याची डाळ करतात. डाळीचा रंग भगवा असतो तसेच या डाळी चा फेसपॅक ही बनवला जातो 😊 Jyotshna Vishal Khadatkar -
मसूर डाळीचं तिखट वरण (masoor daliche tikhat varan recipe in marathi)
आज आपण थोडं युनिक पद्धतीने डाळ करणार आहेत ही डाळ फ्राय फिश सोबत खाल्ली तर खूप भारी जेवायला मज्जा येते.#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#फोटोग्राफी#रेसिपीबुक #week5उसळ हा प्रकार मला फारसा आवडत नाही. फक्त काळ्या वाटाण्याची आणि हरभराची उसळ मला आवडते पण घरी बाकी कोणाला नाही आवडत. मग हा वेगळा प्रकार मसूरचा. आमच्या भागात म्हणजे कोल्हापूर इस्लामपूर सांगली कराड भागात ही ढाब्यामध्ये मिळणारी खूप लोकप्रिय डिश... अर्थात याची मूळ रेसिपी त्या ढाबेवाल्यांनाच माहित... ही माझी पद्धत... खूप प्रकार करून बघातल्यानंतरची फायनल... फोटोग्राफी क्लासनुसार मी प्लेन सरफेसचा वापर करणार होते पण माझा 4 वर्षांचा मुलगा रेयांशने त्याचे Alphabets आणून ठेवले फोटो काढ म्हणून... त्यामुळे वेगळाच लुक आला डिशला... 😍 छान... 😂😂 चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Ashwini Jadhav -
रेस्टॉरंट स्टाईल फ्रायड मसूर डाळ (Masoor Dal Recipe In Marathi)
#SDRसमर डिनर रेसिपीमसूर डाळ ही एक उत्तम चवदार डाळ आहे. तांदूळ आणि लोणच्याबरोबर सर्व्ह करण्यासाठी ती खूप चांगली आहे. Sushma Sachin Sharma -
मसूर खिचडी विथ मूग पकोडा (masoor khichdi with moong pakoda recipe in marathi)
#kr आयत्यावेळी व पटकन सहज होणारा सोप्पा पदार्थ म्हणून आपल्याकडे खिचडी चा मान आहे ,खिचडी आवडत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही .अशी ही खिचडी वन पॉट मिल म्हणून पुर्ण आहाराची कमतरता भरून काढते. म्हणूनच आज मी अतिशय पौष्टिक अशी मसूर खिचडी केली आहे ती पण अक्खा मसूर वापरून, मसूर हे एक उत्तम प्रोटीन, कायब्रोहायड्रेड, लोहयुक्त असून त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश असणं गरजेचं आहे .मसूर रक्तवाढी साठी उत्तम पर्याय आहे .त्यात या मसूर खिचडी चा स्वाद मूग डाळ पकोडे, व कढी ,पापड मुळे अतिशय वाढतो ,नेहमीची खिचडी सोडून मसूर खिचडी विथ मूग पकोडा तुम्ही नक्की करून बघा अप्रतिम चव लागते ,तर मग बघूयात कशी करायची ही खिचडी... Pooja Katake Vyas -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#कोल्हापुर स्पेशल#अख्खा मसूर Rupali Atre - deshpande -
मसूर डाळ वडा (masoor dal vada recipe in marathi)
मसूर डाळ ही जास्त खाण्यात येत नाही तेव्हा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवता येतात का हे पाहूया मसूर डाळ वडा हा उत्तम चवीला लागतो चला तर मग आज बनवण्यात आपण मसूरडाळ वडा Supriya Devkar -
-
नागौरी दाल तडका (nagori dal tadka recipe in marathi)
#drअख्खा मसूर आणि मूगडाळ याचं भन्नाट काॅम्बीनेशन असलेलं हा नागौरी दाल तडका फारच चविष्ट लागतो.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मसाला तूर-मसूर दाल फ्राई (Masala dal fry recipe in marathi)
#MBRमसाला बाक्स रेसिपी तूर मसूर मिक्स डाळ ही आमच्या जेवणाच्या वेळेसाठी आरोग्यदायी आणि चवदार डाळ आहे. Sushma Sachin Sharma -
मसूर लसूणी
#lockdown recipe day 7कसे आहात सगळे. घरातच बसून रहातात नं. हो हो आम्ही पण सगळे घरातच बसून आहोत. आज एक आठवडा होत आला. आमच्यासारखं सगळ्यांनाच आता घरातच बसायची हळूहळू सवय होते आहे, आणि ते किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आलंय. अशातच रोज जेवायला काय करायचं. काय काय आहे घरात हे बघूनच जेवण बनवण्याची आखणी केली जाते. मला बरणीमधे आख्खे मसूर दिसले. मग मी त्यातले थोडे मसूर पाणी घालून एका बाऊल मधे पाच तास भिजत ठेवले. त्याचीच साधी आणि सोपी कृती अगदी कमी साहित्य वापरु बनवली आहे. या मसूरच्या उसळी बरोबर भाता आणि चपाती असे दोन्ही खायला छान लागलं. Ujwala Rangnekar
More Recipes
टिप्पण्या