मसाला पाव (masala pav recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#cpm3
#Week3
#मसाला_पाव... delicious saga
मसाला पाव हे पावभाजी चं झटपट होणारं सुटसुटीत, चटपटीत चमचमीत mini version.. मसाला पाव हा पावभाजीचा धाकटा भाऊच म्हटलं तर वावगं ठरू नये.. पावभाजी आणि मसाला पाव ही दोन्ही भावंड स्वाद आणि चवीच्या बाबतीत कायमच अव्वल नंबर.. हे दोन्ही तसे मुंबईचे अस्सल रोड साईड स्नॅक्स किंवा
street food... म्हणूनच अगदी शाळा कॉलेजातल्या मुलां मुलींपासून ते तिशी,चाळीशी,पन्नाशीतील लोकांचे एवढेच नव्हे तर आजी आजोबांचे देखील आवडते खाणे...😍😋
अधूनमधून या मसाला पाव वर ताव मारायला सगळेच जण उत्सुक असतात..😜आणि मसाला पाव आपल्या चटपटीतपणामुळे आपली अजिबात निराशा होऊ देत नाही..😀 उलट *तुमने पुकारा और हम चले आये* ..असं म्हणत समस्त खादाडखाऊंच्या रसना काही मिनिटातच तृप्त करतो..आणि आपल्या मोठ्या बहिणीची पावभाजीची चविष्ट चमचमीत परंपरेची शान कायम राखतो.. चला तर मग या चविष्ट खानदानाची ओळख करुन घेऊ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20मिनीटे
4 जणांना
  1. 8-10लादी पाव
  2. 3मोठे कांदे
  3. 3मोठे टोमॅटो
  4. 1मोठी सिमला मिरची
  5. 2 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  6. 2 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  9. मीठ चवीनुसार
  10. 1/4 टीस्पूनसाखर
  11. भरपूर कोथिंबीर
  12. थोडं किसलेले गाजर आणि बारीक चिरलेला कांदा
  13. 1लिंबू
  14. बटर आवश्यकतेनुसार
  15. तेल आवश्यकतेनुसार
  16. 1 टीस्पूनधणे-जीरे पावडर

कुकिंग सूचना

15-20मिनीटे
  1. 1

    प्रथम कांदा टोमॅटो सिमला मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्या. लसूण मिरची पेस्ट करून घ्यावी....

  2. 2

    नंतर एका पॅनमध्ये थोडे तेल आणि बटर घालून त्यावर कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या.

  3. 3

    आता आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट,थोडी कोथिंबीर घाला. त्यावर टोमॅटो घालून थोडे शिजवून घ्या नंतर यामध्ये शिमला मिरची घालून मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्या.

  4. 4

    आता या परतलेल्या साहित्यामध्ये हळद, लाल तिखट,पावभाजी मसाला, धणे जीरे पावडर, मीठ,साखर किंचित पाणी घालून व्यवस्थित परतून घ्या..आणि मिश्रण पाच मिनिटे झाकून ठेवा. शेवटी लिंबू पिळून वरून कोथिंबीर घाला अशाप्रकारे पावासाठी चा आपला मसाला तयार झालाय

  5. 5

    आता सर्व पाव मधून कापून घ्या आणि पॅनमध्ये बटर घालून सर्व पाव भाजून घ्या आता या माजलेल्या भावाला तयार मसाला आतून लावून घ्या आणि वरून पण थोडा मसाला लावा परत वरती बटर घाला आणि भाजून घ्या

  6. 6

    आता वरून कोथिंबीर घालून कांदा,किसलेलं गाजर घालून गरमागरम चटपटीत मसाला पाव सर्व्ह करा. तुम्हाला जर आवडत असेल तर मसाला लावल्यावर त्यावर चीज किसून घाला आणि मसाला पावावर वरून देखील चीज किसून घाला.

  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes