मसाला पाव (masala pav recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

मसाला पाव (masala pav recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन
  1. 4लादी पाव
  2. 2मिडीयम आकाराचे कांदे
  3. 2मिडीयम आकाराचे टाॅमेटो
  4. 1सिमला मिरची
  5. 1/2 गाजर
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनपावभाजी मसाला
  8. चिमुटभरहिंग
  9. चिमुटभरहळद
  10. 1 टीस्पूनहिरवी मिरची लसूण आले पेस्ट
  11. 1 टेबलस्पूनबटर
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. आवडीनुसार कोथिंबीर

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    कांदा, कोथिंबीर, सिमला मिरची,टाॅमेटो बारीक कापून घ्या.. हिरवी मिरची लसूण आले पेस्ट करून घ्या

  2. 2

    कढईत तेल,बटर घालून गरम झाले की त्यात कांदा परतून घ्या.. कोथिंबीर, टाॅमेटो, सिमला मिरची घालून मिक्स करून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या..

  3. 3

    चांगले मऊ होईपर्यंत शिजवावे.आता त्यात सुके मसाले घाला, मीठ घाला व स्मॅशरने स्मॅश करून घ्या.. म्हणजे सगळे मसाले एकजीव होतील.गॅस बारीक असावा..

  4. 4

    आता आपला मसाला तयार आहे.. लादी पाव मधोमध कापून घ्या..बटर लावून तव्यावर गरम करून घ्या..

  5. 5

    पावामध्ये मसाला भरून घ्या व वरच्या बाजूला सुद्धा थोडा मसाला लावून घ्या

  6. 6

    आपला मसाला पाव तयार आहे.. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरुन बारीक चिरलेला कांदा टाॅमेटो कोथिंबीर गाजर घालून सजावट करा.बाजूला सलाड तयार करून घ्या व सर्व्ह करा..

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या (2)

Vaishali Khot
Vaishali Khot @Khot_12
मसाला रेसिपी बोलो कौन से मसाले डालने का🙏🙏

Similar Recipes