मुंबई स्ट्रीट फूड स्पेशल चटपटीत मसाला पाव (masala pav recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#KS8
#मसाला_पाव
स्ट्रीटफूड कल्चर हा भारतीय खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे... किंबहुना आता तो झालाय..
स्ट्रीट फूड वर मिळणारे पदार्थ बहुरंगी, बहुढंगी आणि उत्तम चवीचे असतात. कधी कधी हे ठेलेवाले आपल्यासारखेच घटक पदार्थ, मसाले वापरुन पदार्थ करतात. तरीदेखील चवी मध्ये वेगळेपणा कसा येतो..? तुम्हालाही पडला असेलच ना प्रश्न कधीतरी...
मोठ्या लोखंडी तव्यावर,कढईमध्ये झणझणीत तवा पुलाव, चौवमिन, फाईड राईस मंचूरियन कितीतरी पदार्थ सहज रीत्या बनविले जातात. या गाडीवाल्यांकडून खूप काही शिकण्यासारखे असते. त्यांची टाईम मॅनेजमेंट, रिसोर्सफुलनेस आणि क्रिएटिव्हीटी सारखे गुण.... असो
मुंबईचा असाच एक पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे *मसाला पाव*..
मुंबईला बऱ्याच वेळा काही ना काही कामानिमित्त जाण्याचा योग येतोच येतो. जेव्हा ही जाते तेव्हा या मसालेपाव चा मनमुराद आनंद घेते. मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला गेले तेव्हा आम्ही बाहेर खाण्यासाठी गेलेलो. तिथे आम्ही ज्या फूडची ऑर्डर दिली ती तयार होण्यासाठी थोडा वेळ होता. तेव्हा त्या वेळेत आम्ही हा मसाला पाव खावा असे तिथल्या ठेले वाल्यांनी आम्हाला सुचविले. तेव्हा तिथे पहिल्यांदा टेस्ट केलेला हा मसाला पाव.. चवीला अप्रतिम, भन्नाट खूप आवडला सर्वांना आणि मला देखील. तेव्हापासूनच मी त्याची रेसिपी युट्युब वर शोधून करायला लागले. आज कुकपॅडच्या निमित्ताने परत एकदा घरी हा मसाला पाव बनवून त्याचा आस्वाद घेता आला...
पावभाजीचा क्विक अवतार म्हणजे मुंबईचा मसाला पाव. कुठल्या छोट्या मोठ्या पार्टीमध्ये सामील होऊ शकणारा चटपटीत पदार्थ, स्नॅक्स म्हणून पार्टीचे आकर्षण ठरू शकते..
तेव्हा करू या मग *मुंबई स्ट्रीट फूड स्पेशल चटपटीत मसाला पाव*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 4-6लादी पाव
  2. 3मोठे टोमॅटो बारीक कापलेले
  3. 2मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले
  4. 2-3शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली
  5. 1मध्यम आकाराचा शिजवून मॅश केलेला पोटॅटो (ऑप्शनल)
  6. 6-7लसूण पाकळ्या
  7. 1 इंचअदरकचा तुकडा
  8. 8-9हिरव्या मिरच्या
  9. 1-2 टेबलस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 2 टेबलस्पूनपाव भाजी मसाला
  12. 1/4 कपकोथिंबीर
  13. मीठ चवीनुसार
  14. आवश्यकतेनुसार पाणी
  15. 25 ग्रामबटर
  16. 2-3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    मसाला पाव करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य तयार करून ठेवावे. आले, लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    पसरट नॉन स्टिक पॅन वरती किंवा लोखंडाच्या तव्यावरती तेल व बटर घालावे. तेल व बटर गरम झाले की, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा. एक ते दोन मिनिटे कांदा चांगला शिजवून घेतल्यानंतर, त्यामध्ये आले, लसुण, हिरव्या मिरच्याची पेस्ट घालून दोन मिनिटे होऊ द्यावे.

  3. 3

    यामध्ये आता हळद घालावी.मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची घालून एक मिनिट शिजू द्यावी. त्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालावा. मीठ घालावे. 1/4 कप पाणी घालून चार ते पाच मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे.

  4. 4

    टोमॅटो चांगले शिजले की त्यामध्ये आता कश्मीरी लाल मिरची व पाव भाजी मसाला घालावा. थोडे बटर घालावे व चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये मॅश केलेला पोटॅटो घालावा. (ऐच्छिक आहे.. पोटॅटो घातल्याने मसाला चांगला मिळून येतो. व क्रीम स्टेक्चर येते)

  5. 5

    आवश्‍यकतेनुसार थोडे पाणी घालावे.बटर घालावे. चांगले मिक्स करून हा मसाला चांगला शिजू द्यावा. कोथिंबीर घालावी. त्यानंतर तव्यावरली मसाला बाजूला करून घ्यावा व त्याच तव्यावरती मधातून कापलेला लादी पाव बटर लावून शेकून घ्यावा. नंतर पाव ला मधातून आणि वरून देखील मसाला लावून घ्यावा. (फोटोत दाखवीले तसे)

  6. 6

    अशाच प्रकारे सर्व मसाला पाव तयार करून घ्यावे. व बारीक चिरलेल्या कांद्यासोबत, लिंबू सोबत गरमा गरम *मसाला पाव* सर्व्ह करावा... 💃 💃 💕 💕

  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

Similar Recipes