तांदुळक्याची भाजी (Tandulkyachi bhaji recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

# तांदुळाक ही भारतात उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजण्या व तीव्र तापावर फार उपयोगी आहे. उष्णता कमी करण्यास मदत करते नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींसाठी, बाळंतीण आणि गरोदर स्त्रिया यांच्यासाठी ही भाजी वरदान आहे. डोळ्यांच्या विकारासाठी फार उपयुक्त आहे. वृद्ध माणसांच्या आरोग्या साठी खुप उपयुक्त आहे.
मी पालेभाज्या चिरत नाही. त्याची पाने आणि कोवळे देठ घेते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनटे
4 जणांसाठी
  1. 1जुडी तांदुळक्याची भाजी
  2. 1मोठा कांदा
  3. 2 टेबलस्पूनओल्या खोबऱ्याचा कीस
  4. 3-4हिरव्या मिरच्या
  5. 8-10लसूण पाकळ्या
  6. 1/2 टेबलस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

20 मिनटे
  1. 1

    भाजी वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुऊन आणि निवडून घ्यावी.

  2. 2

    कांदा मिरची चिरुन घ्यावी. लसूण सोलून चेचून घ्यावा.

  3. 3

    गॅसवर एका पॅन मध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यात मिरची घालून ती परतुन त्यात कांदा घालून परतुन घ्यावा. मीठ घालावे. ठेचलेला लसूण घालून परतुन घ्यावे.

  4. 4

    कांदा लसूण परतल्यावर त्यात तांदुळक्याची भाजी घालून ढवळून घ्यावे. गॅस मंद करून झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे ठेवून झाकण काढून त्यात खोबऱ्याचा कीस घालून हलवून मिक्स करावे.

  5. 5

    ह्या भाजीत कोकणात दही आणि मेतकूट मिसळून भाकरी बरोबर खातात.. तोंडी लावायला लसणीची झणझणीत चटणी. असा बेत असतो. आमच्या घरी हा सर्वांचा आवडता मेनू आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes