वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3वांगे
  2. 1बटाटा
  3. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. 1कांदा
  5. 7-8लसुण पाकळ्या
  6. 1 इंचआलं
  7. 2लाल मिरच्या
  8. 1 टीस्पूनधणे
  9. 3/4 टीस्पूनजीरे
  10. 2 टेबलस्पूनखोबऱ्याचा कीस
  11. 1 टेबलस्पूनतीळ
  12. 1 टीस्पूनतिखट
  13. 1 टीस्पूनकाळा मसाला
  14. 1/2 टीस्पूनमोहरी
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. १/८ टीस्पून हिंग
  17. 2 टेबलस्पूनतेल
  18. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम वांगी, बटाटा कोथिंबीर, कांदा स्वच्छ करून घेतले. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून घेतला.

  2. 2

    मग त्यात लसुण, आलं घालुन परतले. नंतर त्यात धने जीरे, खोबरं, तीळ, थोडी कोथिंबीर घालून परतून घेतले.

  3. 3

    सर्व परतून झाल्यावर थंड करून मिक्सर मध्ये वाटून घेतले. मग परत गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद व वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतले. मग त्यात तिखट, काळा मसाला, मीठ, कोथिंबीर घालुन परतले.

  4. 4

    आता त्यात वांग, बटाट्याच्या फोडी घालून परतून गरम पाणी घातले व झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली.

  5. 5

    आता चमचमीत, टेस्टी वांग बटाटा भाजी वाटी मध्ये काढून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes