आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)

Priyanka Girkar
Priyanka Girkar @Priyapratik

आलू पराठा हा सर्वांचा खासमखास.
हा कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून  बनलेले आणि त्यातून  जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश  मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात  हा पराठा पटकन होतो !

आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)

आलू पराठा हा सर्वांचा खासमखास.
हा कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून  बनलेले आणि त्यातून  जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश  मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात  हा पराठा पटकन होतो !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20min
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीगव्हाचे पिठ
  2. 2चमचाभर मैद
  3. 1 वाटीपाणी
  4. 1 चमचाधणे
  5. 1 चमचाजिरं
  6. 4मीडियम उकडलेले बटाटे
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 चमचाहळद
  9. 1/2 चमचालाल तिखट
  10. 1/2 चमचाआमचूर पावडर
  11. 1 चमचाआले + लसुण +हिरवी मिरची यांची पेस्ट
  12. कोथिंबीर
  13. बटर गरजेनुसार

कुकिंग सूचना

20min
  1. 1

    गव्हाचे पीठ अणि मैदा चवीनुसार मीठ टाकून मळून घ्यावे. फार घट्ट आणि सैल मळू नये. मळून झाल्यावर 15 मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    धणे आणि जिरं गॅसवर गरम करून घ्यावे आणि पावडर करावी. याने पराठ्याची टेस्ट चांगली लागते.

    *उलगडलेले बटाटे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या.

    * पेस्ट केलेले बटाटे+धणे जीरे पूड+ आले + लसुण +हिरवी मिरची यांची पेस्ट + आमचूर पूड +मीठ+ कोथिंबीर हे सर्व घटक एकजीव करून घ्या.

  3. 3

    कणकेचे गोळे करून घ्या. त्यानंतर मोदक प्रमाणे पाकळ्या करून तयार केलेल मिश्रण त्यात भरून पाकळीचे तोंड बंद करून घ्या. पोळपाटावर ठेवूनहलक्या हाताने दाब देवून सारण सगळीकडे पसरून घ्या. अलगद हाताने पराठे लाटून घ्यावेत.

  4. 4

    गॅसवर तवा ठेवून हाय मीडियम फ्लेमवर बटर किवा तूप लावून पराठे भाजून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Girkar
Priyanka Girkar @Priyapratik
रोजी

Similar Recipes