ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)

Heena
Heena @HeenaKherde811

एकदा सकाळी उठायला, भरपूर उशीर झालेला. नुकतेच माहेराहून आल्यामुळे घरात काहीच नव्हतं. मग काय, बटाटे चिरले, गॅलरीतून कढीपत्ता तोडला आणि बनवली, झटपट टिफीनसाठी सुकी भाजी.. माझ्या नवरोबाला खूपच आवडली. आता त्यांच्यासाठी स्पेशल बनते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 4मध्यम आकाराचे बटाटे
  2. 5सुक्या लाल मिरच्या
  3. मुठभर कढीपत्ता
  4. 1 चमचाजीरे
  5. 1/4 चमचाहळद
  6. चिमूटभरहिंग
  7. चवीनुसारमीठ
  8. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    बटाटे सोलून घ्या आणि लहान तुकडे करा. सगळे घटक काढून घ्या. कढईत तेल गरम करा.

  2. 2

    जीरे, वाळलेल्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घाला.
    हळद, हिंग आणि मीठ घाला.

  3. 3

    चांगले मिसळा.
    चिरलेली बटाटे घाला.

  4. 4

    झाकून 2 मिनीट शिजवा.
    तुमची स्वादिष्ट, बटाटा भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Heena
Heena @HeenaKherde811
रोजी

Similar Recipes