मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1- तास
5- सर्व्हींग
  1. ●समोसा भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ●
  2. बटाटे 5 ऊकडून सॅम्श केलेले
  3. 1 वाटीफ्रोजन मटार
  4. 4 हिरवी मिरची बारीक चिरून
  5. 1 टीस्पूनजीर
  6. 1 टेबलस्पूनबडीशेप बारीक कुटून घेतली
  7. 1 टेबलस्पूनधना पावडर
  8. 1 टेबलस्पूनजिरा पावडर
  9. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  12. कोथिंबीर
  13. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  14. तेल तळण्यासाठी
  15. मीठ चवीनुसार
  16. ●समोसाचे कणिक ●
  17. 1 वाटीमैदा एक मोठा बाऊल
  18. 1 टीस्पूनओवा
  19. 4-5 टेबलस्पूनतेल
  20. पाणी
  21. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

1- तास
  1. 1

    प्रथम आपण कणीक भिजवून 30-मिनिट बाजूला ठेऊन देऊ.

  2. 2

    कणिक मळून झाल्यावर आपण भाजी करून घेऊ त्यासाठी गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिर, बडीशेप, हींग, हिरवी मिरची, मटार घालून परतून घेऊ 2-3 मिनिट परतून झाल्यावर त्यात बटाटा घालून घेऊ आणि सर्व मसाले आणि कोथिंबीर, मीठ घालून भाजी तयार करून घेऊ

  3. 3

    भाजी झाली आहे.आता ती थंड करून घेऊ त्यानंतर आपण समोसे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी पोळी लाटून घेऊ आणि सूरीने दोन भाग करून घेऊ.बाजूच्या कडाना पाणी लावून घेऊ. आणि त्याचा कोन बनवून त्यात भाजी भरून घेऊ आणि व्यवस्थित सर्व बाजू पॅक करून घेऊ

  4. 4

    अशा पध्दतीने सर्व समोसे तयार करून घेऊ. आता कढईत तेल गरम करुन सर्व मिडीयम ते लो फ्लेमवर तळून घेऊ.

  5. 5

    समोसे तयार आहेत खाण्यासाठी चटणीबरोबर सर्व्ह करा.😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes