इडली-चटणी (idli chutney recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#fdr
मला फ्रेंडशीप डे निमित्त सगळ्यांशी ओळख करुन द्यायला आवडेल माझी जीवाभावाची मैत्रिण सौ.वैदेही हिची🤗
प्रेम जसं कुणावरही करावं...तशी मैत्री कुणाशीही करावी!मैत्रीला वयाचं बंधन नसते.नात्यातही मैत्री असतेच.माझ्या सहवासात असलेल्या प्रत्येकाचे माझ्याशी मैत्र जमले आहे.सौ. वैदेही ही माझी सून आहे!!...आश्चर्य वाटलं ना?सुनेशी मैत्री??...हो..हो..अगदीच जमू शकते हं!
पाच वर्षापूर्वी आमच्या घरात आली आणि सासू-सुनेचं नातं कधी गळून पडलं आणि मैत्री झाली हे आम्हालाही कळलं नाही.मला तिचे स्पष्ट आणि पारदर्शी विचार आवडतात.दुसरी अगदी मैत्री होण्याचं समान कारण म्हणजे खवय्येगिरी!!एक तर तिचे टेस्टबड्स फारच सेन्सिटिव्ह आणि डेव्हलप्ड आहेत.त्यामुळे मी करते त्या पदार्थाची टेस्ट व काही कमी जास्त असेल तर लगेचच मला प्रतिक्रिया मिळते.तसंच तिचं पदार्थ करणंही खूप छान आहे.हाताला चव आहे.पदार्थ करण्याचीही आवड आहे.अत्यंत टापटीप आणि नियोजनबद्ध स्वयंपाकाचे तिचे संस्कार आहेत.माहेर कुळाचार,कुळधर्म पाळणारे,तीही भरपूर गोतावळ्यात वाढलेली,धार्मिक व आधुनिकतेची आवड समानपणे जपणारी असल्याने आम्ही दिलखुलासपणे आणि मज्जेने स्वयंपाक घरात वावरत असतो.भरभरुन दाद देण्याच्या वृत्तीमुळे सगळे कुकींग आनंदाने होते.स्वयंपाकात विविध उपकरणे वापरणे आणि सोशल मिडीयाचा योग्य तो वापर,नाविन्याची आवड याने ती खूपच अद्ययावत असते.मग मलाही चार नव्या गोष्टी शिकायला मिळतात!आणि माझ्याबद्द्ल तिलाही खूप आदर व प्रेम आहे.मैत्रीला आणखी काय हवे?....
इडली हा तिचा वीकपॉइंट!त्यामुळे आजच्या फ्रेंडशीप दिवसानिमित्त तिच्यासाठी खास "इडली-चटणी-सांबार"चा बेत....तिच्या आवडीचा!!👍😋😋
सगळ्या मैत्रिणींना मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌹😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि.
4व्यक्ती
  1. 4 कपउकडा तांदूळ
  2. 2 कपउडीदडाळ
  3. 1.5 टीस्पूनमेथ्या
  4. 2 टेबलस्पूनमीठ
  5. साच्याला लावण्यास तेल
  6. हिरवी चटणी :
  7. 4 टेबलस्पूनखोवलेला नारळ
  8. 1/2 कपकोथिंबीर
  9. 1 टेबलस्पूनमिरची ठेचा
  10. 6-7लसूणपाकळ्या
  11. 3/4 टीस्पूनमीठ
  12. 8-10कढीपत्ता पाने
  13. चवीपुरती साखर
  14. 1/2लिंबाचा रस
  15. चटणीवर फोडणीसाठी :
  16. 1.5 टीस्पून तेल
  17. जीरे
  18. मोहरी
  19. हिंग व उडीदडाळ

कुकिंग सूचना

40 मि.
  1. 1

    उकडा तांदूळ व उडीदडाळ वरील प्रमाणानुसार 8-10 तास भिजवावे,त्यात भिजवतानाच मेथ्या घालाव्यात.(पावसाळा असल्याने जास्त भिजवले आहे.)8-10तासांनी तांदूळ व डाळीतील पाणी काढून वाटून घ्यावे.

  2. 2

    वाटलेले मिश्रण फर्मेंट होण्यासाठी ठेवावे.रात्री वाटून ठेवल्यास सकाळी हे मिश्रण छान फुगते.मेथ्यांमुळे इडली जाळीदार व हलकी होते.2-3टेबलस्पून मीठ घालून मिक्स करावे.इडलीपात्रातील ताटल्यांच्या साच्याला तेल लावून एकेका साच्यात फरमेंटेड पीठ घालावे. व इडलीकुकर मध्ये ह्या इडल्या 5-8मिनिटे वाफवून घ्याव्यात.याप्रमाणे सर्व इडल्या करुन घ्याव्यात.
    इडली साच्यातून थोडी थंड झाल्यावर काढली की व्यवस्थित निघते.

  3. 3

    आता चटणी करुन घेऊ.
    ओल्या नारळाचा चव,कोथिंबीर, मिरची,मीठ,लसूणपाकळ्या, लिंबाचा रस व चिमूटभर साखर घालून मिक्सरवर ही चटणी वाटावी.जेवढी पातळ हवी असेल त्याप्रमाणे पाणी घालून पातळ करावी.

  4. 4

    इडली व चटणी तयार आहे.गरमागरम सांबाराबरोबर सर्व्ह करावी स्पॉंजी व लुसलुशीत इडली!!😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
sushma ji recipe cha main photo ha fakt recipe cha hawa ,please tumhi fakt recipe photo upload kara

Similar Recipes