इडली चटणी (idli chutney recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाट्याजाड तांदुळ
  2. 1 वाटीउडीद डाळ
  3. 6-7 मेथीदाणे
  4. चटणी साठी साहित्य:
  5. 1 वाटीखवलेला नारळ
  6. 4मिरच्या
  7. 4लसूण पाकळ्या
  8. थोडं आलं
  9. 1/2 टीस्पून जीरे
  10. चवीनुसारमीठ
  11. फोडणीसाठी
  12. 2 टेबलस्पून तेल
  13. 1 टीस्पूनमोहरी
  14. 5-6 कडीपत्त्याची पाने
  15. चिमुटभरहिंग
  16. 2लाल सुक्या मिरच्या

कुकिंग सूचना

25 मिनिटं
  1. 1

    प्रथम डाळ व तांदूळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास भिजत ठेवणे सहा तासानंतर त्यातले पाणी काढून घेणे व मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणे. वाटून झाल्यानंतर पिठात मेथी दाणे घालून मिक्स करून नंतर पीठ उबदार ठिकाणी ठेऊन रात्रभर झाकून ठेवणे.

  2. 2

    सकाळी पीठ छान फुलून येते

  3. 3

    पिठ छान फुलून आल्यावर त्यात मीठ घालून एक दोन मिनिटं चमच्याच्या साह्याने पीठ फेटून घेणे नंतर इडलीपात्र घेऊन त्याला तेल लावून त्यामध्ये इडलीचे ‌‌बंँटर घालून घेणे

  4. 4

    नंतर एका कढईत पाणी ठेवून पाणी उकळल्यावर त्यात इडली पात्र ठेवून 15 मिनिटे वाफेवर इडली शिजवून घेणे थंड झाल्यानंतर इडली पात्रातून इडली काढून घेणे आता पण चटणीची रेसिपी पाहूया

  5. 5

    एका मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं, मीठ घालून घेणे व मिक्सरला बारीक वाटून घेणे नंतर एका कढईत फोडणी साठी तेल घेणे

  6. 6

    तेल तापल्यावर त्यात मोहरी हिंग कढीपत्ता व सुक्या लाल मिरच्या यांची फोडणी करून चटणीवर घालून मिक्स करून घेणे

  7. 7

    गरमागरम इडली चटणी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes