झटपट मुगडाळ डोसा (moongdal dosa recipe in marathi)

Kamat Gokhale Foodz
Kamat Gokhale Foodz @KGF11

#WDR

वीकेंड म्हटले की घरचे सगळे जण इडली, डोसा, सांबार चटणी असे नाष्टाचे प्रकार गृहीत धरतात. कारण ह्यासाठी वेळही तसाच द्यावा लागतो. डाळ तांदूळ आदल्या दिवशी भिजत घालणे पुन्हा संध्याकाळी ते वाटून ठेवणे अशी एक दिवस आधी पासून तयारी सुरू असते. पण कधी कधी हे डाळ तांदूळ योग्य वेळी भिजवणे राहून जाते,मग पुन्हा ते पीठ आंबवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही म्हणून मग डोसा खायचा राहून जातो. पण यासाठी आज मी न आंबवता करता येणार मूग डाळ डोसा रेसिपी सांगणार आहे. चला तर रेसिपी पाहू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४५ मिनिटे
२-३ लोक
  1. 1 कपमुगडाळ
  2. 1 कपतांदूळ
  3. 1/2 चमचामेथी
  4. 1 चमचाकिंवा चवीनुसार मीठ
  5. बटर किंवा तेल डोसा वर लावण्यासाठी
  6. पाणी आवशयकतेनुसार

कुकिंग सूचना

३०-४५ मिनिटे
  1. 1

    १ कप मुगडाळ आणि १ कप तांदूळ एकत्र घेऊन २-३ वेळा स्वच्छ धूऊन घ्यावे.

  2. 2

    मग त्यामधे १/२ चमचा मेथी घालावी. आणि ४ कप किंवा डाळ तांदूळ नीट भिजतील इतके पाणी घालून २ तास भिजत ठेवावे.

  3. 3

    २ तासानंतर भिजवलेले पाणी काढून टाकून डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे. हे सगळे बारीक वाटून घ्यावे म्हणजे डोसा हवा तसा पातळ बनवणे सोपे होईल. मिश्रण वाटताना पाणी बेताने घालावे. बॅटर खूप पातळ किंवा खूप जाड करू नये.

  4. 4

    ह्या बॅटर मध्ये १ चमचा किंवा आपल्या चवीनुसार मीठ घालावे. आणि सगळे पुन्हा छान मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    आता डोसा बनवण्यासाठी गॅस सुरू करून तवा छान गरम करून घ्यावा.त्यावर तेल किंवा बटर ब्रश करून घ्यावे.आणि थोडेसे पाणी शिंपडून ते टिशूने किंवा स्वच्छ किचन नॅपकिन ते पुसून घ्यावे. ह्या प्रोसेस मुळे कुरकुरीत डोसा बनवणे सोपे होते

  6. 6

    आता त्यावर एक डाव डोसा बॅटर तव्याच्या मधोमध घालावे आणि डावाच्या साहाय्याने बॅटर तव्याच्या कडेपर्यंत पसरवावे.

  7. 7

    मग त्यावर आवश्कतेनुसार बटर किंवा तेल घालावे आणि उलाथने घेऊन डोसा तव्यावरच एका कडेने दुमडून सर्व्ह करावा. हा डोसा,बटाटा भाजी,सांबार किंवा फक्त चटणी सोबत सुध्दा छान लागतो. रेसिपी करून पहा आणि आवडली तर नक्की कळवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kamat Gokhale Foodz
रोजी
YOU TUBE - Kamat Gokhale Foodz
पुढे वाचा

Similar Recipes