विदर्भ स्पेशल हेल्दी नाष्टा उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#bfr
# breakfast Recipe

विदर्भ स्पेशल हेल्दी नाष्टा उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)

#bfr
# breakfast Recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 जणं
  1. 1 वाटीगव्हाचे पीठ (कणिक)
  2. 1/2 वाटीबाजरीचे पीठ
  3. 1/2 वाटीज्वारीचे पीठ
  4. चवीप्रमाणे मीठ
  5. 2मोठे कांदे
  6. कोथिंबीर, कढीपत्ता
  7. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  8. 1 टीस्पूनहिंग
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  11. 1 टेबलस्पूनधणेजीरे पुड
  12. 1/2 वाटीतेल
  13. 1लिंबू
  14. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    कांदा पातळ लांब लांब चिरून घ्यायचा.कढईत तेल गरम करून मोहरी जीरे,हिरवी मिरचीचे तुकडे टाकून कांदा टाकायचा.कांदा थोडा परतल्यानंतर हिंग,हळद,लाल तिखट व धणेजीरे पुड टाकायचे.छान परतुन घ्यायचे..

  2. 2

    नंतर सगळी पीठे टाकून सुगंध सूटेपर्यंत लाल रंगावर छान खमंग भाजून घ्यायचे.एका बाजूला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे.पीठामध्ये भाजतांनाच मीठ व साखर चवीप्रमाणे टाकून घ्यायचे.

  3. 3

    पीठ छान भाजून झाल्यावर त्यात गरम पाणी टाकायचे.लींबूचा रस घालायचा.छान दणदणीत वाफ काढायची.बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची.

  4. 4

    आपली "उकडपेंडी" तयार आहे..लोणचे,बारीक चिरलेला कांदा,लींबूची फोड व लोणच्यासोबत सर्व्ह करायची,खूप छान लागते,दही पण घेतात...विदर्भातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडीची अशी ही ब्रेकफास्ट डिश.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes