मेथीचे थालीपीठ (methi thalipith recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week7
Breakfast
Post 1
बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीच्या भाजीचे फायदे अमुल्य आहेत. मेथी बहुगुणी आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते. फ्रिजमध्ये थोडी मेथी शिल्लक होती. त्याची भाजी बनवली तर पुरण्यासारखी नव्हती म्हणून आज न्याहारी साठी मेथीचे थालीपीठ बनवण्याचे ठरवले😀. घरात सगळ्या प्रकारची पिठं होतीच. मेथीच्या थालीपीठा साठी साहित्य काय लागते ते बघुया😍.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
३ माणसे
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 1 कपतांदूळ पीठ
  3. 1 कपज्वारीचे पीठ
  4. 1 कपबाजरीचे पीठ
  5. 1/2 कपबेसन
  6. 3 टेबलस्पूनदही
  7. 1कांदा बारीक चिरून
  8. 1 वाटीचिरलेली कोथिंबीर
  9. 1 वाटीमेथीची पाने बारीक चिरून
  10. 3-4हिरव्या मिरच्या
  11. 6-7पाकळ्या लसूण ठेचलेला,
  12. 1/2 टिस्पून हळद
  13. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  14. 1 टिस्पून धणेपूड
  15. 1 टिस्पून जिरेपूड
  16. 2 टेबलस्पूनसफेद तिळ
  17. 1 टिस्पून ओवा
  18. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    सगळी पीठे एकत्र करा. मग वरील सर्व जिन्नस पिठात टाकून थोडे थोडे पाणी घालून चांगले मिक्स करा. पीठ जास्त पातळ नको आणि घट्ट पण नको.

  2. 2

    घालून चांगले मिक्स करा. पीठ जास्त पातळ नको आणि घट्ट पण नको. थोडे तेल घालून पीठ मळून घ्या. शेवटी हाताला थोडे तेल लावून पीठ मळून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.

  3. 3

    पीठ सेट झाले की त्याचा छोटा गोळा घेऊन पोळपाटावर प्लास्टिक किंवा पातळ सुती कपडा ठेवून हाताला थोडं पाणी लावून एकदम हलक्या हाताने गोळा पसरवा.

  4. 4

    लाटणीचा उपयोग नाही करायचा. मग थालीपीठावर छोटी छोटी भोकं पाडा. मंद गॅसवर तवा ठेवून अगदी थोडे तेल टाकून थालीपीठ टाका. मग थालीपीठाला जी भोकं पाडली आहेत त्यात थोडे तेल टाकून वरती झाकण ठेवा. २-३ मिनिटांनी चुर्र असा आवाज झाला की थालीपीठ पलटा. दोन्ही बाजूंनी शेकवून घ्या. मग प्लेटमध्ये थालीपीठ काढून त्यावर लोणी टाका व दही किंवा चटणी बरोबर खायला द्या.

  5. 5

    मग प्लेटमध्ये थालीपीठ काढून त्यावर लोणी टाका व दही किंवा चटणी बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes