उकडपेंडी(वैदर्भीय पारंपरिक नाश्ता) (ukadpendi recipe in marathi)

उकडपेंडी ही विदर्भातील पारंपारीक नाश्ता आहे. उकडपेंडी गव्हाच्या पीठाची केली जाते , तसेच थोडे ज्वारीचे पीठ व बेसन देखिल टाकले जाते त्यामुळे अतिशय पोष्टीक व पोट भरीची असते. ही उकडपेंडी विदर्भातील प्रत्येक घरी केली जाते.
उकडपेंडी(वैदर्भीय पारंपरिक नाश्ता) (ukadpendi recipe in marathi)
उकडपेंडी ही विदर्भातील पारंपारीक नाश्ता आहे. उकडपेंडी गव्हाच्या पीठाची केली जाते , तसेच थोडे ज्वारीचे पीठ व बेसन देखिल टाकले जाते त्यामुळे अतिशय पोष्टीक व पोट भरीची असते. ही उकडपेंडी विदर्भातील प्रत्येक घरी केली जाते.
कुकिंग सूचना
- 1
कढईत २ मोठे चमचे तेल घाला.तेल गरम झाल्यावर जीरे टाका.जीरे तडतडल्यावर कांदा,घाला. कांदा लालसर परतून घ्या. नंतर मिरची, कढी पत्ता, शेंगदाणे घालुन छान परतून घ्या
- 2
नंतर गव्हाचे पीठ,ज्वारीचे पीठ,बेसन, लाल तिखट, हळद,मीठ,हिंग घ्याला. मंद आचेवर पीठ लालसर भाजून घ्या.पीठाचा रंग बदलला पाहीजे.
- 3
नंतर त्यात दही घाला व थोडे थोडे गरम पाणी घालत परतून घ्या.खूप पातळ करू नये.झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्या. कोथींबीर घालून गरम गरम सरव्ह करा.सोबत लिंबाचे लोणचे किंवा लिंबाची फोड घ्या.
Similar Recipes
-
उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
खरं तर उकडपेंडी हा पारंपारिक पदार्थ !सकाळच्या नाश्त्याला ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी केली म्हणजे दुपारच्या जेवणाची काळजी नाही ,इतके पोट भरले जाते. माझ्या मुलाला उकडपेंडी खूप आवडते. तो सहा महिन्यांनी घरी आल्यामुळे ,त्याच्यासाठी ही खास बनवली आहे! Varsha Ingole Bele -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
ज्वारीची उकडपेंडी#KS3# विदर्भमी आज विदर्भ स्पेशल ज्वारीची उकडपेंडी केलेली आहे.विदर्भात उकडपेंडी हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घेऊन नाश्त्यासाठी उकडपेंडी तयार केली जाते Sapna Sawaji -
उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#GA4 #week5#upma#उपमा#ukadpendi#multiflourupmaमहाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उकडपेंडी हा प्रकार बनवला जातो हा एक उपमा चा प्रकार आहे. विदर्भात स्पेशल करून उकडपेंडी बनवली जाते आता जवळपास सगळीकडे उकडपेंडी बनवतात. माझ्या आठवणीतली उकडपेंडी म्हणजे आमच्या छोट्या छोट्या भुकेसाठी आमची आझी आम्हाला नेहमीच हा पदार्थ बनवून देत असत. आजही मी बनवते तर मला लहानपणची आठवण येते. आझी गव्हाच्या पिठाची उकडपेंडी बनवायची. मी आता थोडा फेरबदल करून बनवते तसा उकलपेंडी हा खुप् हेल्दी असा पदार्थ आहे. मी अजून हेल्दी पद्धतीने बनवते. खूप चविष्ट असा हा पदार्थ आहे. थोडक्यात म्हणजे मिश्र पिठाचा उपमा असा हा पदार्थ आहे. त्यात आपल्याला हाय फायबर मिळतो. पचनाला ही हलका असतो. सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही खूप चांगला असा प्रकार आहे. Chetana Bhojak -
मिश्र पिठाची उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3 विदर्भ मधील नागपूर प्रसिद्ध उकडपेंडी आज मी बनवली असून ,ही पाककृती मला माहित असण्याचे कारण म्हणजे झी मराठी वरील मालिका माज्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये असलेले मेन पात्र नागपूर चे आहे असे दाखवले आहे ते मेन पात्र राधिका ही त्यातील दुसऱ्या पात्राला शनयाला ही पाककृती सांगताना त्यात दाखवले असून त्या पाककृती च्या नावावरूनच ती करायची उत्सुकता होती म्हणूनच मी तेंव्हा ऐकलेली पाककृती आज बनवली .तसं तर उकडपेंडी गव्हाची, ज्वारीची, बाजरीची ,तांदळाची करतात पण आज मी मिश्र पिठाची उकडपेंडी केली आहे,मग बघूयात कशी करायची ते उकडपेंडी... Pooja Katake Vyas -
मिश्र पिठाची उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#wdr # आमच्याकडे सर्वांना उकडपेंडी, हा प्रकार खूप आवडतो.. त्यामुळे, बाकी काही विशेष बनवायचे ठरवले नसेल, तर उकडपेंडी ठरलेली..मग तिची पौष्टिकता वाढविण्यासाठी, वेगवेगळ्या भाज्या, कंद टाकायचे.. म्हणजे पोटही भरते, चवही छान येते.. तेव्हा आज मी केली आहे, कणीक आणि ज्वारीचे पीठ, एकत्र करून... Varsha Ingole Bele -
उकडपेंडी -एक पारंपरिक आणि पौष्टिक नाश्ता (ukadpendi recipe in marathi)
उकडपेंडी-एक पारंपरिक नाश्ता प्रकार आहे.तो खास करून विदर्भात केला जातो.पोटभरु आणि पौष्टिक आहे.घरात उपलब्ध साहित्यातून होतो.#bfr Pragati Hakim -
ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी (Jowarichya Pithachi Ukadpendi Recipe In Marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी सकस व पोटभरीचा नाश्ता म्हणजे ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी Charusheela Prabhu -
ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी (jowarichya pithachi ukadpendi recipe in marathi)
#KS7 विस्मरणात गेलेल्या रेसिपी अशी थीम चालू आहे तर मलाही ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी ही रेसिपी आठवली पूर्वीच्या काळी सकाळच्या नाश्त्याला बनवली जायची पण आताच्या धकाधकीच्या जीवनात तयार ब्रेकफास्ट वर जास्त भर दिला जातो आणि अशी पौष्टिक पदार्थ मागे पडतात ज्वारीचे पीठ वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी नक्की करून पहा Smita Kiran Patil -
उकडपेंडी (गावरानी आवडीचा मेणू) (ukadpendi recipe in marathi)
#उकडपेंडी #अधूनमधून उत्तम नास्ता साठी मेणू . Dilip Bele -
ज्वारीची उकडपेंडी (Jowarichi Ukadpendi Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज्वारीची उकडपेंडी हा विदर्भातील पदार्थ असून घरोघरी ती नाश्त्याला केली जाते.पोटभरु असून पौष्टिक आणि चटपटीतही आहे.अगदी डिनरलाही चालू शकते. Pragati Hakim -
मिश्र पीठाची उकडपेंडी (mix pithachi ukadpendi recipe in marathi)
#ks3#विदर्भ स्पेशल उकडपेंडी हि घरातीलच साहित्यापासून बनणारी सोपी, झटपट होणारी, हेल्दी रेसिपी आहे. Sumedha Joshi -
कणीक सोयाबीन उकडपेंडी (kanik soyabean ukadpendi recipe in marathi)
#KS3 #विदर्भ_रेसिपीज...#कणीक_सोयाबीन_उकडपेंडी.. कणीक सोयाबीन उकडपेंडी हा नाश्त्याचा दमदमीत प्रकार..कणकेची उकडपेंडी हा प्रकार पहिल्यांदा मी इंदूरला खाल्ला..मी माझ्या मामेसासूबाईंकडे म्हणजेच मिस्टरांच्या आजोळी गेले होते ..तेव्हां या पदार्थाची प्रथमच चव घेतली..खूप खमंग, चमचमीत अशी उकडपेंडी मला खूपच आवडली..आणि मग तेव्हांपासून अधूनमधून माझ्या किचन मध्येही ही रेसिपी आवर्जून उपस्थित राहू लागली.. या रेसिपीला अधिक पौष्टिक,protein rich करण्यासाठी सोयाबीन पीठ घातलेली कणिक घेतली आहे..चला तर मग या सुटसुटीत रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
ज्वारी च्या पिठाची उकडपेंडी (jowarichya pithachi ukadpedi recipe in marathi)
#GA4 #week16 वर्हाडचा खास मेणू म्हणजे उकडपेंडी . Dilip Bele -
आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5धिरडे जरी डोशासदृश असला तरी वेगळा आहे बरंका. यात आंबवण्याची कृती नाही तर, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक किंवा तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ घेतले जाई. पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असतील ती पिठे घेऊन धिरडे लगेच बनवता येते. Shital Muranjan -
ज्वारीची पौष्टिक उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
# KS3#विदर्भ_स्पेशल"ज्वारीची उकडपेंडी"मी आज पहिल्यांदा च बनवली आहे.आमच्या कडे बाजरी ची पिक जास्त प्रमाणात घेतले जाते..पण ज्वारीच्या भाकरी रोजच्या आहारात असतात.. ज्वारीची चकली बनवली आहे पण उकडपेंडी हे नाव माहितच नव्हते.. खुप छान, मस्त असा हा पौष्टिक पदार्थ इथुन पुढे मात्र माझ्या किचनमध्ये नेहमीच बनेल कारण खुप आवडला आम्हाला..यात दही घालतात पण मी नाही घातले.मी सर्व्हिंग प्लेटमध्ये दही घेतले.. खुप छान वाटले खाताना.. वेगळी टेस्टी चव आली .. लता धानापुने -
विदर्भ स्पेशल कणकेची उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल कणकेची उकडपेंडीअतिशय पौष्टिक पण तेवढाच चविष्ट पदार्थ हा विदर्भात घरोघरी केल्या जातो.....माझी आजी खूपच छान करायची....करताना तिची खूप आठवण आली....मस्त होते नक्की करून पहा.... Shweta Khode Thengadi -
ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी (jawarichya pithache ukadpind recipe in marathi)
#cooksnapही उकडपेंडी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात अढळस्थानी बसलेली आहे. या उकडपेंडी ने माझे मन हळवे होते , त्यामुळे मी ही उकडपेंडी बनवणे बंद केले होते ,कारण माझ्या स्वर्गीय बाबांना ही उकडपेंडी अतिशय प्रिय होती, पण काही दिवस आधी माझी मैत्रीण श्वेता हिने पोस्ट केली ,तेव्हा माझ्या स्वर्गीय बाबांच्या स्मरणार्थ मी अनेक वर्षांनी केली. Bhaik Anjali -
उकडपेंडी
#myfirstrecipe"उकडपेंडी हा खान्देशचा पारंपारिक पदार्थ म्हणायला हरकत नाही.करायला अगदी सोप्पी आणि चविष्ट अशी हि उकडपेंडी म्हणजे माझ्या माहेरची आठवण.तर हि अशी आठवणीतली उकडपेंडी तुमच्यासाठी. Samarpita Patwardhan -
उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
कणकेला थोडे परतवले तांबूस त्यावर फोडणी घातली मोहरीची,पिज्जा दाबेली वा असो बर्गर चव रेंगाळते अजुनही उकडपेंडीची......मग घ्यायची का करायला...आज चा नास्टा... Devyani Pande -
ज्वारीच्या पिठाच्या घाऱ्या (jowarichya pithachya gharya recipe in marathi)
हा एक विदर्भातील शेगाव व जवळपास च्या भागातील पारंपरिक पदार्थ आहे. अक्षय त्रितीयेला चिंचवणी किंवा कैरीच्या आमरसासोबत केला जायचा. तसेच तांदळाच्या खीरी सोबत देखिल केला जायचा .पण हल्ली फार कमी लोक करतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गव्हाच्या पीठाची गोड शंकरपीळी (god shankarpali recipe in marathi)
हि शंकरपाळी मस्त खुशखुशीत होतात ,गव्हाच्या पीठाची असल्यामुळे पोष्टीक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
नाचणी ऑमलेट (nachani omlet recipe in marathi)
#हेल्थ#रागी#नाश्तारोज रोज सकाळी नाश्ता काय करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणी समोर असतो. घरी नाचणी चे पीठ होते म्हणून नेहमीचे वेज ऑमलेट आज नाचणी पीठ वापरून केले. पहिल्यांदाच करत असल्याने काहीच अंदाज न्हवता म्हणून जोडीला थोडे थोडे तांदूळ पीठ, बेसन वापरले. अगदी कमी तेल वापरून छान ऑमलेट झाली.Pradnya Purandare
-
ज्वारी कोबी मुठिया (howard kobi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week16JOWAR या क्लूनुसार मी ज्वारीचे पीठ वापरून ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
थालीपीठ/धपाटे (thalipith recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रथालीपीठ हे सातारा आणि पुणे येथे खासकरून आषाढ महिन्यात तसेच नवरात्रात घट उठविताना नैवैद्य म्हणून केले जातात.पण ही घरातील बाजरीचे, ज्वारीचे, डाळीचे आणि गव्हाचे पीठ घालून केली जातात.. Monali Garud-Bhoite -
उकडपेंडी (Ukadpendi Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशल रेसिपी चॅलेंज#उकरपेंडीप्रत्येकाच्या मनात आईची जागा ही काही वेगळीच असते.आईच्या हातांची चव पण काही विशेष असणारच. माझ्या आईला आवडणारी खास नागपूरी रेसिपी उकडपेंडी मी आज केली आहे. Deepali dake Kulkarni -
विदर्भ स्पेशल उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3# उकडपेंडी # सकाळच्या नाश्ता पासून जेवणा मध्ये सुद्धा आपण उकडपेंडी चा आस्वाद घेऊ शकतो . हि एक हेल्दी डिलिशिअस आणि झटपट होणारी डिश आहे मी तर आठवड्यातून एकदा उकड पेंडी बनवत असते.. मला तर खूप आवडते माझ्या घरातल्या सर्व व्यक्तींना सुद्धा खूप आवडते... चला तर मग अशी अप्रतिम बनणारी गव्हाची उकडपेंडी बघूया. Gital Haria -
कढीगोळे (kadhi gole recipe in marathi)
#cooksnap #कढीगोळा # वर्षा इंगोले बेले हिची कढीगोळा ही रेसीपी मी cooksnap केली आहे. नावा वरुनच लक्षात आल असेल आज कोणती रेसीपी आहे तर मंडळी विदर्भात हे कढीगोळे बहुधा प्रत्येक घरी बनवल्या जातात.आता सर्व भाज्या सर्व सिझनमध्ये मिळतात. परंतु पुर्वी भाजीची वानवा असायची. मग घरी असलेल्या जिन्नसातुनभाज्या व्हायच्या.तर असाच हा प्रकार आहे. तुम्हाला नक्की आवडेल Suchita Ingole Lavhale -
मटार मकई आटा पराठा
# पराठाआता घरात आसलेल्या सामनातून काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न नेहमी आपण पराठे हे गव्हाच्या पिठाचे बनवतो पण मी माक्या चे पीठ वापरलं त्यामुळे ते थोडे खुसखशीत झालेत. Dhanashree Suki -
-
धपाटे (dhapate recipe in marathi)
धपाटे ही महाराष्ट्र् मराठवाड्यातील लोकप्रिय रेसिपी आहे. ज्वारीचे पीठ वापरून धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून धपाटे आसे नाव पडले आसावे धपाटे हा थालिपिठांशी मिळताजुळता पदार्थ आहे.लहानपणापासून माझा आवडीचा . धपाटे दही , शेंगदाणे चटणी, ठेचा सोबत छान लागतात. आमच्याकडे या मध्ये मेथीची भाजी किंवा कांद्याची पात पण घातली जाते. Ranjana Balaji mali
More Recipes
टिप्पण्या