खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

सुका मेव्यातील खजूर हा खूप चांगला. त्यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर यांचा एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यात बाकीचा सुका मेवा मिसळून तर हे लाडू अजून पौष्टिक होतात.
#cpm8

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-१० मिनिटे
  1. १०-१२ खजूर
  2. 1/2 वाटीड्राय फ्रुटस - बदाम, काजू, मनुका, पिस्ता, अक्रोड
  3. 1/4 वाटीभाजलेले शेंगदाणे
  4. 3-4 चमचेडेसिकेटेड कोकोनट
  5. थोडी खसखस

कुकिंग सूचना

५-१० मिनिटे
  1. 1

    प्रथम खजूर मधील बिया काढून त्याचे तुकडे करावे. सर्व ड्रायफ्रुटस थोडी भाजून घ्यावीत.

  2. 2

    मग खजूर, ड्रायफ्रुटस, शेंगदाणे, कोकोनट मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यात चिमूटभर मीठ व चिमूटभर हळद घालावी.

  3. 3

    सर्व नीट मिक्स करावे. मग त्याचे लाडू वळावेत आणि मग खसखसमध्ये घोळवावेत. पौष्टिक खजूर ड्रायफ्रुटस लाडू रेडी!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

Similar Recipes