तोंडलीची  सात्विक भाजी (tondali satvik bhaji recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#skm
Learn with Cookpad...#तोंडलीची_भाजी..
रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यामुळे या भाज्या शरीरासाठी गुणकारी असल्याचं दिसून येतं. यामध्येच तोंडली खाण्याचेदेखील अनेक फायदे आहेत. परंतु, अनेक वेळा तोंडली खाण्यास काही जण नकार देतात.
तोंडली म्हटलं की बऱ्याच जणांकडून नापसंतीचा सूर ऐकायला मिळतो, पण आहारमूल्यांच्या दृष्टीने पाहिलं तर तोंडली शरीराच्या निरोगीपणासाठी आवश्यक असणाऱ्या फळभाज्यांपैकी एक आहे. वेलवगीर्य भाज्यांमध्ये मोडणाऱ्या तोंडलीचं उगमस्थान भारतातच आहे.
मात्र, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात तोंडली खाण्याचे फायदेः
१. उष्णतेमुळे तोंडात फोड आल्यास कच्चे तोंडले चावून खावे.
२. पोटांच्या तक्रारी दूर होतात
३. शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते.
४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
५. ताप आल्यास गुणकारी
६. पचनक्रिया सुरळीत ठेवते.कारण या भाजीमध्ये 94%पाणी असते..
७. अपचन, गॅसेसच्या समस्या दूर ठेवते.
८. तोंडली खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते.
अनेक जण तोंडलीची भाजी खाताना नाकं मुरडतात. अशा वेळी मसालेभात, तोंडल्याचं भरीत ,भरली तोंडली अशा विविध रेसिपींचे option आहेतच आपल्याकडे..😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
4जणांना
  1. 250 ग्रॅमतोंडली
  2. 4-5हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  3. 1 इंचआल्याचे बारीक तुकडे
  4. 5-6 कडीपत्त्याची पाने
  5. 1 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  6. 2 टेबलस्पूनओलं खोबरं
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. मीठ चवीनुसार
  9. फोडणीसाठी तेल मोहरी जीरे हिंग हळद
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम तोंडली स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी आणि सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करा.

  2. 2

    एका कढईत तेल तापत ठेवा.तेल तापले की की त्यात मोहरी जीरे हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या. त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे.आलं. कढीपत्ता. कोथिंबीर घालून फोडणी परतून घ्या.

  3. 3

    आता या फोडणीवर बारीक चिरलेली तोंडली घालू व्यवस्थित एकजीव करा.नंतर झाकण ठेवून एक दोन वाफा आणा. आता यामध्ये चवीनुसार मीठ साखर घालून भाजी शिजवून घ्या.

  4. 4

    आता भाजी शिजत आली की यामध्ये शेंगदाणा कूट,ओले खोबरे घालून भाजी छान पैकी परतून घ्या आणि झाकण ठेवून दोन ते तीन वाफा काढा.

  5. 5

    तयार झाली आपली सात्विक खमंग तोंडलीची भाजी वरून खोबरं कोथिंबीर घालून गरमागरम पोळी सोबत सर्व्ह करा.

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
भाग्यश्री, तोंडलीच्या सात्विक भाजीच्या रेसिपी बद्दल खूप खूप धन्यवाद.

Similar Recipes