कंटोळीची  सात्विक भाजी (kantolichi bhaji recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#रेसिपीबुक #week7
कंटोळी हे पावसातून वेलीवरती येतात. यामध्ये प्रमाणात सर्वच विटामिन्स असतात. हे वजन कमी करण्यासाठी तसेच उच्चरक्तदाबासाठी गुणकारी आहे. तसेच ते ऑंटी अॅलर्जन व एनर्जीचा सर्दी, खोकल्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे. तसेच नेत्ररोग, हृदयरोग व कर्करोग सोनार या रुग्णांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामकंटोळी
  2. 2 टेबलस्पूनचना डाळ भिजवलेली
  3. 7/8पाने कडीपत्ता
  4. 1 टीस्पूनजिरे
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 8/9हिरव्या मिरच्या
  7. 4 टेबलस्पूनओलं खोबरं
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. आवडीनुसार कोथंबीर
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

35 मि
  1. 1

    सर्वप्रथम कंटाळे स्वच्छ धुऊन त्याचा मागचा व पुढचा भाग कापून त्याचे पातळ तुकडे करून घ्यावेत.

  2. 2

    एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. त्यामध्ये जीरं टाकायचे आहे जीरं थोडं तडतडल्यावरती हिंग व कढीपत्ता टाकायचा आहे आता मिरची टाकायची आहे व त्या वरती चण्याची डाळ जी आपण भिजवून ठेवले आहे ती टाकायची आहे.(इथे आपण लसूणही होऊ शकतो आवडत असेल तर) दोन ते तीन मिनिटे डाळ परतून घ्यायची आहे.

  3. 3

    आता आपल्याला त्यामध्ये कापलेले कंटोली टाकायचे आहे. त्यानंतर वरून त्यामध्ये हळद व मीठ टाकून चांगले परतायचं आहे. मग मंद आचेवरती ही भाजी आपल्याला शिजू द्यायचे आहे. भाजी थोडी शिजली की त्यामध्ये आपल्याला ओले खोबरे टाकायचं आहे व पाणी आठवून घ्यायचं आहे. अशाप्रकारे आपले तयार होईल पौष्टिक व सात्त्विक कंटोलीची भाजी. वरून कोथिंबीर टाकावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

Similar Recipes