गोपाल कृष्ण (gopal krishna recipe in marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न. खडा मसाला साहित्य व काळ्या मनुका, कढिपत्ता, फुलांचा वापर करून श्री कृष्ण साकारण्याचा प्रयत्न केला.

गोपाल कृष्ण (gopal krishna recipe in marathi)

काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न. खडा मसाला साहित्य व काळ्या मनुका, कढिपत्ता, फुलांचा वापर करून श्री कृष्ण साकारण्याचा प्रयत्न केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 20मीरे
  2. 1/2 कपकाळ्या मनुका
  3. 7लवंगा
  4. 1चक्री फुल
  5. 1लाल सुकी मिरची
  6. 1 टीस्पून तुरीची डाळ / हळद
  7. 1 टीस्पून कुंकू /तिखट
  8. कढिपत्ता काड्या
  9. कढिपत्ता
  10. फुले हवी ती

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य एकत्र जमवणे. काळ्या मनुका धुऊन स्वच्छ पुसून घेणे.

  2. 2

    आता काळ्या मनुकाची श्री कृष्णाच्या केसांच्या आकारात रचना करणे. आता मीरे समान भागात(10-10)घेऊन भुवया (आयब्रो)करणे.कढिपत्ताच्या काड्या वाकवून डोळे व नाक बनविणे.

  3. 3

    ओठासाठी कुंकू /तिखटाचा वापर करून आकार देणे. बासरीला लिलीचे पाते किंवा कांदा पात घेऊन त्यात लवंगा टोचवून बासरी करणे.

  4. 4

    मोरपिसा साठी कढीपत्ता पानांवर चक्री फुल, सुकी लाल मिरची कापून, एक फुल लावून मोर पिसाची रचना करावी.कपाळावर गंधासाठी तुरीची डाळ /हळद वापरून मधे लाल सुकी मिरची चा तुकडा लावणे. कानात फुले लावणे. तयार झाले आपले लड्डू गोपाल, गोपाल कृष्ण.

  5. 5

    🙏🌹|| जय श्री कृष्ण || राधे राधे||🌹🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes