दहीवडा

Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
४ जणांसाठी
  1. २५० ग्राम उडिद डाळ, तेल, खायचा सोडा, मीठ, तिखट, मिरपूड, चाटमसाला
  2. चिंच, ओलाखजूर ८/९, गुळ, धणेजीरे पावडर, दही, साखर, पाणी

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    २तास उडीद डाळ भिजवून ठेवा, त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकुन मिक्सर मध्ये वाटून घ्या, त्या नंतर त्यात मीठ टाकून चमच्याने त्याला हलके होईस्तोवर फेटून घ्या गॅस वर तेल गरम करून मध्यम आचेवर ठेवा, सर्वात शेवटी त्यात चिमूटभर खायचा सोडा घालून परत फेटून घ्या, तेल गरम झाले असल्यास त्यात साधारण लाडूच्या आकाराचे गोळे टाकून नीट तळून घ्या.
    एकीकडे दह्यात साखर, मीठ चवी पुरता घालून मिक्सर मधून काढून घ्यावे दही खूप घट्ट असल्यास त्यात थोडे पाणी घालून मिक्स करावे. तळलेल्या वडयाना पाणी भरल्या बाउल मध्ये टाकून

  2. 2

    बाहेर काढावे व हाताने घट्ट दाबून दह्यात सोडावे.
    एकीकडे ४चमचे चिंचेचा कोळ, पाव वाटी गूळ आणि ८/९ खजूर बिया काढून मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे वाटलेले मिश्रण गॅस वर ठेऊन त्यात पाव चमचा तिखट, मीठ, पाव चमचा धणे जिरे पूड टाकून थोडे पाणी घालून उकळून घ्यावे गोड चटणी तय्यार. सर्विग बाऊल मध्ये दह्यात घातलेले वडे घ्यावे त्यावर गोड चटणी थोडा चाटमसला, व मिरची पावडर टाकून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar
रोजी
For me cooking is my stress buster... it's meditation
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes