स्टफ चिझ गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

निकिता आंबेडकर
निकिता आंबेडकर @cook_24496190

स्टफ चिझ गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण २तास
  1. 1 कपमैदा
  2. 1 चमचासाखर
  3. 1/4 चमचाखायचा सोडा
  4. 1/2 चमचाबेकिंग पावडर
  5. १//२ चमचा ओरिगाॅनो
  6. 2 मोठे चमचे आंबट दही
  7. १,१/२ चमचा खायचे तेल
  8. 1/4 कपदूध
  9. २,३ चमचे पाणी
  10. चवीनुसारमीठ
  11. 3 मोठा चमचाबटर
  12. 1 टेबलस्पूनप्रोसेस चीझ

कुकिंग सूचना

साधारण २तास
  1. 1

    एका बाऊलमध्ये एक कप मैदा,एक चमचा साखर,चवीनुसार मीठ,मग पाव चमचा खायचा सोडा,अर्धा चमचा बेकिंग पावडर,अर्धा चमचा ओरिगाॅनो, मग हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यावं मग त्यात दोन मोठे चमचे आंबट दही घालावे मग दीड चमचा खायचं तेल घालावे. पाव कप दूध घ्यावं मग हे सगळं एकत्र करून चांगलं मळून घ्यावं मग त्या मळलेल्या गोळ्याला तेल लावून एक तास ठेवून द्यावे त्यावर एखादा कपडा ठेवावा किंवा झाकण ठेवावे.

  2. 2

    एका छोट्या बाऊलमध्ये तीन मोठे चमचे बटर घेऊन त्यात एक छोटा चमचा ओरिगाॅनो,एक छोटा चमचा बारीक चिरलेली लसूण घालून ते चांगले एकत्र करून घ्यावे

  3. 3

    आता आपण मैदा भिजवून घेतलेला जो गोळा होता त्या गोळ्याची एक पोळी लाटून घ्यावी पोळी लाटून झाल्यावर आपण जे बटर तयार केलं होतं ते बटर त्या पोळीला ब्रश च्या साह्याने संपूर्ण पोळीला लावून घ्यावे मग त्यावर किसलेले चीज अर्ध्या पोळीवर पसरवून घ्यावे. मग त्या पोळीचा अर्धा रिकामा असलेला चिझ पसरलेल्या भागावर फोल्ड करून चांगल्या प्रकारे बंद करून घ्यावी मग वरच्या भागावर परत बटर लावून चिली फ्लेक्स घालावे

  4. 4

    मग हा ब्रेड मायक्रोवेव्हमध्ये 180 डिग्री ला २५ ते ३० मिनिट ठेवावे. मग तुमचा स्टफ चिझ गार्लिक ब्रेड तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
निकिता आंबेडकर
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes