खमंग अळुवडी(नैवेद्यासाठी) (alu wadi recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#ngnr
#अळुवडी आवडत नाही असा माणूस विरळाच. नांव काढलं तरी तोंडाला पाणी सुटले ना.पावसाळ्यात अळूच्या पानांना वेगळीच छान चव असते .या दिवसात केलेली अळुवडी अप्रतिम लागते.अळुमधे औषधी गुणधर्म खुप आहेत. अळुमधे ए,बी,सी जीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅशियम असते अॅन्टीऑक्सिडंट चे प्रमाण जास्त असल्याने प्रकृतीसाठी फायदेशीर आहे.शिवाय पित्त कफनाशक आहे.बाळंतिणीला जर दुध येत नसेल तर भाजी खायला देतात.असा हा बहुगुणी अळु त्याची जर अळुवडी केली तर आणखीन बहार.चला तर कशी करायची बघुयात.देवबाप्पा ला नैवेद्य म्हणून तुम्ही करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4/6 सर्व्हिंग्ज
  1. 7/8अळूची पाने
  2. 2 कपचण्याचे पीठ
  3. 1/2 कपतांदूळ पीठ
  4. 3 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  5. 1/4 कपगुळ
  6. 1 टेबलस्पूनमिक्स मसाला
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  9. 2/3 टीस्पूनहिंग
  10. 1 टेबलस्पूनमीठ
  11. 2 टेबलस्पूनतिळ
  12. तळण्यासाठी तेल
  13. वाटणासाठी👇
  14. 1/2 कपसुके खोबरे
  15. 2-3 हिरव्या मिरच्या
  16. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  17. 1 टेबलस्पूनआल
  18. 1 तुकडादालचीनी
  19. 5-6लवंगा
  20. 10-15काळीमीरी
  21. 1 टेबलस्पूनजीरे

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    अळूची पाने स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घ्याव्यात व पाने पुसून घ्या.

  2. 2

    खालीलप्रमाणे तयारी करा.खोबरे भाजून त्या सोबत जीरे व इतर गरम मसाले भाजा नी वाटण करून घ्या.

  3. 3

    वाटण केले आहे.

  4. 4

    चण्याचे पीठ नी तांदूळ पीठात वरील सर्व जिन्नस घालणे गुळ बारीक करणे नि थोडे घट्ट म्हणजे पसरवण्या सारखे पीठ करून घेणे.

  5. 5

    आता अळुचे पान उलटे घ्या नी त्याला पीठाचा पातळ थर द्या.दुसरे पान उलटे ठेवा त्याला पण पीठ लावा.अशी उलट सुलट पाच सहा पाने लावून घ्या.

  6. 6

    नंतर खाली दाखवल्याप्रमाणे पाने दुमडून नंतर घट्ट रोल गुडाळा. असे दोन उंडे होतील.

  7. 7

    उंडे ईडलीपात्रात 30मिनिटे वाफवून घ्या.थंड होऊ द्या.नंतर वड्या कापा.

  8. 8

    तव्यावर तेल टाकून शॅलोफ्राय करा.तळताना थोडे तिळ भुरभुरवा छान दिसतात नि लागतात पण.

  9. 9

    अळुवडी तयार आहे नैवेद्य दाखवा नी अशीच खा.

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes