अळूच्या वड्या (aluchya vadya recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#shr
#श्रावण_स्पेशल #cooksnap_चॅलेंज
#महाराष्ट्रीयन_रेसिपी
#महाराष्ट्रयीन_रेसिपी
दिप्ती हीची अळूवड्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. अळूवड्या खूप छान टेस्टी झाल्या. ‌
श्रावण महिन्यात खूप छान छान सणांची रेलचेल असते. विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप उत्साह असतो. सगळीकडे हिरवेगार निसर्ग सौंदर्य बघायला मिळाते. श्रावणात भरपूर हिरव्या गार भाज्या उपलब्ध असतात. यादिवसात अळूच्या वडीची आणि भाजीची हिरवीगार पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
खमंग कुरकुरीत अळूवड्या खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते.
आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड‌ ते दोन इंच पुढे असतात, आणि ती चकचकीत पण असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची. आमच्या कडे नैवेद्यासाठी अळूवड्या ठेवताना त्यामधे आलं लसूण घालत नाहीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 10अळूची मध्यम आकाराची पाने
  2. 1 वाटीबेसन पीठ
  3. 1/4 वाटीतांदळाचे पीठ
  4. 1/4 वाटीचिंचेचा कोळ
  5. 2 टीस्पूनतिखट पूड
  6. 1 टीस्पूनगोडा मसाला
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 2 टीस्पूनमीठ
  9. 4 टीस्पूनगुळ
  10. शॅलो फ्राय करण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड‌ ते दोन इंच पुढे असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची.

  2. 2

    वडीच्या पानांना लावण्यासाठी बेसन पीठ, थोडं तांदूळ पीठ, मीठ, तिखट पूड, गोडा मसाला, बारीक चिरलेला गुळ आणि चिंचेचा कोळ घालून थोडं पाणी घालून जरा दाटसर बॅटर बनवावं. आणि आळूवडीच्या पानांना बेसनाचे बॅटर लावावे बॅटर लावताना पानाची दोन्ही टोकं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ठेवून प्रत्येक पानावर बॅटर लावावे.

  3. 3

    बॅटर लावल्यावर पानं दोन्ही बाजूंनी दुमडून गुंडाळून मग त्याचा रोल करुन शेवटी टोक बंद करुन रोल बनवावा. एका प्लेटला तेल लावून त्यात आळूवडीचा रोल वाफवण्यासाठी कूकर मधे पाणी घालून त्यावर जाळी ठेऊन त्यावर प्लेट ठेवून १५ मिनिटे अळूवड्या वाफवून घ्याव्या.

  4. 4

    आळूवडीचा रोल गार झाल्यावर त्याच्या कापून वड्या पाडाव्यात. पॅनमधे तेल घालून त्यात अळूवड्या दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्याव्या. वड्या डिप फ्राय पण करतात. काही जणांना वाफवलेल्या वड्या शॅलो फ्राय न करता पण तशाच खायला आवडतात.

  5. 5

    खमंग कुरकुरीत शॅलोफ्राय केलेल्या अळूवड्या गरमागरम किंवा आवडत असल्यास गार झाल्यावर सर्व्ह कराव्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या (4)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
अळूची पाने ओळखायची टिप खूप helpful आहे

Similar Recipes