मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#diwali21 ही दिवाळी सर्वानाच सुख समृद्धीची,आनंदाची आणि आरोग्यदायी जावो...
दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोड पदार्थाने केली.मुलाला बेसन लाडू खूप आवडतात.त्यामुळे त्यांचा पहिला नंबर...आकार थोडा छोटाच ठेवलाय.. छानही दिसतो आणि त्यानिमीत्ताने पूर्ण लाडू खाल्ला जातो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
७-८
  1. 2 कपबेसन
  2. 3/4 कपसाजूक तूप२ टेबलस्पून दूध
  3. 2 टेबलस्पूनदूध
  4. 1/4 टीस्पूनवेलची जायफळ पूड
  5. 1-1/2 कपपिठीसाखर...आवडीनुसार
  6. 3-4 टेबलस्पूनड्राय फ्रूट तुकडे

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    तूप घालून बेसन मंद आचेवर रंग बदलेपर्यंत, खमंग बेसनाचा सुवास येईपर्यंत भाजले.

  2. 2

    छान भाजून झाले,तूप सुरू लागले की त्यात दूध घालून पटापट मिक्स केले. ड्राय फ्रूट चे तुकडे घालून मिक्स केले.

  3. 3

    मिश्रण गार झाल्यावर त्यात वेलची जायफळ पूड,पिठीसाखर घालून मिक्स केले.त्याचे छोटे छोटे लाडू वळून घेतले.त्यावर मनुका अर्धी कापून ती लावली.लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes