पुडाची करंजी - ओल्या नारळाची (pudachi karanji recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#dfr दिवाळी फराळ चँलेंज
करंजी हा दिवाळीतला एक पारंपारिक पदार्थ आहे.करंजीशिवाय दिवाळीचा फराळ पूर्णच होत नाही.गृहिणीचे कसब पहाणारा हा आणखी एक प्रकार.करंजीचे सारण आणि पारी दोन्हीही सुंदर जमून आले की तयार होतात छानशा नावेसारख्या दिसणाऱ्या करंज्या.आपल्याकडे या करंजीला शुभशकुनाचे स्थान आहे.आमच्याकडे मूल चालायला लागले की पहिल्या करंज्या करतात.याला पाऊल उंडे म्हणतात.लग्नात रुखवतावर वधू-वरांची नावे आणि अनोखी डिझाइन करुन ठेवली जाते मोठ्ठी अशी करंजी.लग्नातल्या रुखवताच्या जेवणाला जावयांना आवर्जून वाढली जाते करंजीच!!पुढे डोहाळजेवणात चांदण्यातले डोहाळजेवण करताना पांढऱ्या पदार्थामध्ये हमखास केली जाते ती करंजीच!अशी सगळ्यांची आवडती करंजी ....
याप्रसंगी भोंडल्याच्या गाण्याच्या ओळी आठवतात....अश्शा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या । अस्सं तबक सुरेख बाई पालखीत ठेवावं ।अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी....
चला तर....खुसखुशीत करंजीचा आस्वाद घ्यायला😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5व्यक्ती
  1. नारळाचे सारण
  2. 1नारळ खोवून
  3. 1 कपसाखर
  4. 25ग्रॅम खसखस भाजून
  5. 20-25बदामाची पूड
  6. 1 टीस्पूनवेलचीपूड
  7. 1/2 टीस्पूनजायफळपूड
  8. करंजीसाठी साटा
  9. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  10. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठी
  11. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  12. करंजीची पारी
  13. 2 कपमैदा
  14. 2 टेबलस्पूनरवा
  15. 2 टेबलस्पूनतुपाचे मोहन
  16. 1/4 टीस्पूनमीठ
  17. 3/4 कपनीरसे दूध(न तापवलेले)

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    नारळ फोडून खोवून घ्यावा.कढईत थोडे तूप घालून त्यात नारळाचा चव घालावा.थोडे हलवून साखर घालावी.साखर विरघळू द्यावी. व मिश्रण थोडे घट्ट होऊ द्यावे. त्यात बदामपूड,वेलची व जायफळ पूड घालून सारण तयार करावे.सारण थंड होऊ द्यावे.

  2. 2

    मैदा चाळून घ्यावा.त्यात रवा घालावा.मीठ घालून त्यावर तुपाचे मोहन घालावे. निरशा दुधात पारीसाठी मैदा घट्ट भिजवावा.मैदा भिजू द्यावा.करतेवेळी हे पीठ छान मळून मऊ करुन घ्यावे.मिश्रणाचे सहा समान गोळे करुन ठेवाव्यात.

  3. 3

    या गोळ्यांच्या पोळ्या लाटून घ्याव्यात.

  4. 4

    साट्यासाठी तांदूळ पीठी,कॉर्नफ्लोअर एकत्र करावे.त्यात साजूक तूप घालून खूप फेटून मऊ व सैलसर अशी पेस्ट करावी.हाच साटा.
    आता हा साटा लाटलेल्या पोळीला लावावा.अशा प्रकारच्या एकावर एक तीन पोळ्यांना हा साटा लावावा.याचा घट्ट रोल करावा व बंद करुन त्याचे सुरीने लाटी होईल असे काप करावेत.

  5. 5

    तयार लाटीची लेअर्स असलेली बाजू आपल्याकडे लाटताना ठेवावी.व हलक्या हाताने पारी लाटावी. त्यात सारण भरुन बाजूने बंद करावी.कातणाने कापून गरम रिफाइंड तेलामध्ये गुलाबी रंगावर तळावी.पारीला सुंदर पदर सुटू लागतील.अगदी निगुतीने करंजी करावी लागते.तळल्यावर चाळणीत काढावी.थंड झाल्यावर खुसखुशीत करंजीचा देवाला नैवेद्य दाखवावा.व फराळ बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes