भाजणीची खुसखुशीत चकली (chakli recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#dfr ...
#दिवाळी_स्पेशल

भाजणीची खुसखुशीत चकली (chakli recipe in marathi)

#dfr ...
#दिवाळी_स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोभाजणीचे पीठ
  2. 1 टेबलस्पूनओवा
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. चवीनुसारमीठ
  8. 3 टेबलस्पूनतीळ
  9. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    सर्व प्रथम गॅस वर एका पातेल्यात पाणी गरम करून उकळी काढून घ्यावी, उकळी आली की त्यात लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, ओवा, पांढरे तीळ घालून २ मिनिटे चमचाने ढवळून घ्यावे व गॅस बारीक करुन पाण्यात भाजणिचे पीठ सोडून ढवळून घ्यावे. व दोन तीन मिनिटे झाकून ठेवावे व नंतर गॅस बंद करावा..

  2. 2

    दहा मिनिटांनी पीठ परातीत काढून मळून घ्यावे.आवश्यकतेनुसार थंड पाणी पण वापरता येईल.व नंतर साच्याला तेल लावून घ्यावे व पीठाचा लांबटगोल गोळा करून साच्यात गोळा घालून झाकण लावून घ्यावे व बटर पेपर वर किंवा ताटात गोलाकार आकारात चकल्या पाडून घ्याव्यात..

  3. 3

    व नंतर कढईत तेल गरम करून त्यात चकल्या सोडून तांबूस रंगाची होईपर्यंत १० मिनिटे गॅस मिडीयम टू हाय गॅस वर तळून घ्यावे
    अश्या प्रकारे आपली भाजणीची खुसखुशीत चकली तयार आहेत👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes