भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#dfr दिवाळी फराळ चँलेज
च क ली....तमाम गृहिणींची जिव्हाळ्याची,सुगरणपणाचा कस लागणारी...करेपर्यंत अगदी कशी काय होतेय बाई!...या थोड्याश्या दडपणाखालीच केली जाणारी ही चकली...झाली छान तर ठीक...नाहीतर काही खरं नाही😉.दिवाळीचा सगळा मूड या चकलीवरच अवलंबून असतो...पटतंय ना?सगळी प्रमाणं वगैरे लिहून ठेवली जातात,आता युट्यूब आहे..कोणाची कशी झाली,अमकीची तर मस्त...तमकीची अगदी तोंडात घालताच विरघळणारी😋नाहीतर कुणाची अगदीच मऊ...अगदी सरळ भुईचक्रासारखी उलगडणारी😄कुणाची करेपर्यंत एकदम छान...आणि डब्यात गेल्यावर मऊ🤔कुठे भाजणी चुकते,कुठे दळून आणायला चुकते,कुठे भाजणी भाजायला चुकते,कुठे चकलीचे मोहन घालणं चुकते,कुठे तेलात पडल्यावर चकली अगदी पसरू लागते...हसू लागते आणि करणारीला अगदी रडू येते😏अनेक वर्ष बरेच प्रयोग करुन मग हळूहळू जमायला लागते,आणि नाहीच जमली तर हल्ली बाजारात हजारो जणी चकल्या देतातच करुन!!...तरीही मला वाटते,दिवाळीचा फराळ ही गृहिणीचा सगळा संयम पहाणारी गोष्ट आहे.सगळं कसं अचूक प्रमाणात झालं तरच तो पदार्थ खाण्याची मजा असते.स्वतः खपून करण्यासारखी मजा नाही...!चुकलं तरी काय चुकतंय,कस़ं केलं की छान होईल याचा शोध वर्षानुवर्ष घेतल्याशिवाय आजी,आईसारखे पदार्थ जमत नाहीत.मी कधी चकलीची रेसिपी लिहीन असं चुकूनही वाटलं नव्हतं,कारण आता आताच माझी चकली छान होऊ लागलीय असं म्हणतात!😅..कुकपँडमुळे हे करता येतंय हे खरं👍
बघा,तुम्हाला आवडतेय का ही चकली?...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5-6व्यक्ती
  1. चकलीसाठी भाजणीचे प्रमाण :
  2. 4 कपजाड आणि नवा तांदूळ किंवा राशनचेही चालतील
  3. 2 कपहरभरा डाळ
  4. 1 कपउडीदडाळ
  5. 1/2 कपमूग डाळ
  6. 1/2 कपजाड पोहे
  7. 1/4 कपसाबुदाणा
  8. 1/2 कपधणे
  9. 1/4 कपजीरे
  10. चकलीसाठी साहित्य:
  11. 4 कपचकली भाजणी पीठ
  12. 4 कपपाणी
  13. 2 टीस्पूनलाल तिखट
  14. 2 टीस्पूनपांढरे तीळ
  15. 2 टीस्पूनओवा
  16. 1/2 टीस्पूनहळद
  17. 1 टीस्पूनहिंग
  18. 4-5 टीस्पूनमीठ(किंवा चवीनुसार)
  19. 4 टीस्पूनलोणी
  20. 1/2 रिफाइंड तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    चकलीची भाजणी:-
    1.तांदूळ शक्यतो जाड,साधा व नवा घ्यावा.नव्या तांदळाला चिकटपणा कमी असतो.धुवून ठेवावा.
    2.हरभरा डाळ,उडीदडाळ,मूगडाळ अगदी स्वच्छ म्हणजे पांढरटपणा निघून स्वच्छ पाणी राहिल अशा धुवाव्यात.
    3.ही सगळी धुतलेली धान्ये,पाणी निथळून व्यवस्थित सावलीतच 7-8तास वाळवावीत.
    4.भाजणी भाजताना सर्व धान्यांचा ओलसर,दमटपणा जाईपर्यंत खमंग भाजावे.भाजल्यावर धान्ये हाताला हलकी लागतात.तांदूळ मात्र हलकेसेच भाजावेत.
    5.जाड पोहे व साबुदाणा भाजावा.शेवटी धणे,जीरे भाजावेत.
    6भाजणी थंड झाल्यावर बारीक दळून आणावी.

  2. 2

    चकली करताना:-
    चकली भाजणी वरील प्रमाणानुसार मोजून घ्यावी.पाणी मोजून आधणास ठेवावे.पाण्याला उकळी आली की त्यात तिखट,मीठ,हळद, हिंग,तीळ,ओवा व लोणी घालून पाच मिनिटे उकळावे.

  3. 3

    या पाण्यात मोजून घेतलेली भाजणी घालून पीठ कोरडे रहाणार नाही असे सगळीकडून झाऱ्याने हलवावे.झाकण घालून 1-2तास तरी मुरत ठेवावे.

  4. 4

    पीठ थंड झाले की सर्व पीठ परातीत मळून घ्यावे.आता याला पाणी लागणार नाही.किंचीत सैलसर होते परंतु चकल्या सहज घालता येतात.पीठ मुरण्यास बराच वेळ ठेवल्याने यात सगळ्या चवी येतात.

  5. 5

    पीठाचे सोऱ्यामध्ये मावतील अशा आकाराचे गोळे करावेत.व चकली प्लॅस्टिक अथवा छोट्या चौकोनी पेपरवर घालावी.

  6. 6

    रिफाइंड तेल कढईत तापत ठेवावे.कडकडीत तापवावे.गँस मिडीयम लो ठेवावा.सगळ्या चकल्या मिडीयम लो फ्लेमवरच तळून घ्याव्यात.तेल एकदम खूप घालू नये.लागेल तसे वाढवत जावे म्हणजे तेलाचे टेंपरेचर सारखेच रहाते.

  7. 7

    तेलातील बुडबुडे कमी होईपर्यंत चकली तळावी.म्हणजे सगळ्या बाजूंनी चकली तळली जाते.तळलेल्या चकल्या गार होऊ द्याव्यात.

  8. 8

    कुरकुरीत, हलकी आणि खुसखुशीत अशी चकली तयार आहे!
    थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात चकल्या भरुन ठेवाव्यात.🤗👍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes