कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#EB1
#w1

#कोथंबीरवडी

रेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाही
माझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .
माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाही
रेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

35 मिनिट
3 व्यक्ती
  1. 2 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  2. 1 कपबेसन पीठ
  3. 2 टेबलस्पूनतांदुळाचे पीठ
  4. 1/2 टेबलस्पूनमिरची लसून पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनदही
  6. 2 कपपाणी
  7. 1/4 टीस्पूनतीळ
  8. 1 टेबलस्पूनतेल फोडणीसाठी
  9. मीठ चवीनुसार
  10. 1/2 टीस्पूनहळद पावडर
  11. 1/4 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी कोथिंबीरची जुडी घेऊन स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुऊन पूर्णपणे पाणी काढल्यावर बारीक चिरून घेऊ,

  2. 2

    मिरची लसून पेस्ट तयार करून घेऊ

  3. 3

    दिल्याप्रमाणे बेसन पिठ तांदळाचे पिठ घ्यायचे
    एका बाऊलमध्ये बेसन चे पीठ तांदळाचे पीठ, दही घेऊन एक कप पाणी टाकून बॅटर तयार करायचा

  4. 4

    आता कढईत तेल गरम झाल्यावर तेलात मिरची लसूण पेस्ट परतून घेउ, परतून झाल्यावर, हळद आणि मीठ टाकून घेऊ आता एक कप पाणी टाकून घेऊ
    एक उकळी आल्यावर गॅस बंद करून देऊ
    साखर टाकून देऊ

  5. 5

    आता तयार केलेल्या बेसनचा बॅटर या पाण्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ

  6. 6

    तीळ टाकून घेऊ,व्यवस्थित मिक्स झाल्यावर परत गॅस लावून बेसन शिजून घेऊ

  7. 7

    बेसन शिजून झाल्यावर गॅस बंद करून देऊ
    बेसन शिजायला पाच मिनिट लागतात
    घट्ट होते एकसारखे हलवत राहायचे म्हणजे गुठळी पडत नाही

  8. 8

    बेसन शिजले आहे ते कढईतून वेगळे व्हायला लागते ते आपल्याला कळेल बेसन शिजले आहे गॅस बंद करून द्यायचे

  9. 9

    कडई खाली उतरू व्यवस्थित बेसन एकदा मिक्स करून घेऊ व बारीक केलेली कोथिंबीर त्यात टाकून मिक्स करून घेऊ

  10. 10

    आता एका प्लेटला तेल लावून घेऊ तेल लावल्यावर तयार तयार बेसन थापून घेऊ

  11. 11

    थोडावेळ थंड करायला ठेवा थंड झाल्यावर वड्या पाडून कढईमध्ये तेल तापवून वडी टाकून दोन्ही साईडने तळून घेऊ

  12. 12

    तयार खमंग कोथंबीर वडी,

  13. 13

    वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट अशीही कोथंबीर वडी

  14. 14
  15. 15
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes