मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
३ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम गव्हाचे पीठ
  2. ५० ग्रॅम ज्वारीचे पीठ
  3. ब्रेड स्लाईस
  4. उकडलेला बटाटा
  5. २ चमचेआलं मिरचीची पेस्ट
  6. १-१/२ वाटी मेथीची पाने
  7. १/२ चमचा हळद
  8. १-१/२ चमचा लाल तिखट
  9. १/२ चमचाधणेपूड व जीरेपूड
  10. २ चमचे तेल व चविप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम १ बटाटा उकडून ठेवावा. नंतर मीठ पाणी उकळवून त्यांत मेथीची पाने ब्लांच करावी व नंतर थंड पाण्याने धुवून सर्व पाणी निथळून ती कापून ठेवावी.

  2. 2

    नंतर गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, मेथी घालावी व त्यांत बटाटा व ब्रेडचा स्लाईस कुस्करून घालावा व नंतर त्यांत वरील सर्व मसाले वआलं मिरचीची पेस्ट २ चमचे तेल व चविनुसार मीठ घालून पीठ मळून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्याचे थोडे जाडसर पराठे लाटावे व तव्यावर तेल घालून पराठे खमंग भाजून घ्यावेत व चटणी किंवा साँसबरोबर गरमागरम सर्व्ह करावेत. या साहित्याचे अंदाजे ६ पराठे तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes