कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

kavita arekar
kavita arekar @kav1980

#rbr
रक्षाबंधन म्हणजे भाव बहिणी मधील नाते घट्ट करणारा सण. या दिवशी भावासाठी काय करायचे त्याच्या आवडीचे यासाठी तिची तयारी आठवडा भर आधीच सुरू होते. भाऊ लांब रहात असेल तर त्याचा साठी राखी पोस्टाने पाठवते. राखी सोबत काही भेटवस्तू किंवा मिठाई, चॉकोलेट असे काही पाठवते. मी माझ्या भावा साठी आज कोथिंबीर वडी केलेय. गोडाच्या जेवण मध्ये डाव्या बाजूला ही वडी अगदी शोभून दिसते बरं का☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याधुवून बारीक चिरलेली कोथिंबीर
  2. 1-1/2 वाटीबेसन
  3. 2 चमचेतांदुळाचे पीठ
  4. आलं मिरची वाटलेली
  5. 2 चमचेलाल तिखट
  6. 1 चमचाहळद
  7. 1 चमचाहिंग
  8. 1 चमचापांढरे तिळ
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 चमचाइनो
  11. 1 चमचालिंबू रस
  12. 1 चमचाधने पावडर
  13. तेल तळण्यासाठी
  14. 1/2 चमचासाखर

कुकिंग सूचना

45मिनिटे
  1. 1

    सगळे साहित्य घ्या. कोथिंबीर चिरून त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, आलं मिरची पेस्ट तिखट, हळद घाला.

  2. 2

    मग तेल, मीठ, धने पूड, साखर आणि शेवटी लिंबू रस घालून सगळे एकत्र करा. थोडे थोडे पाणी घाला. आणि मिश्रण तयार करा. खूप पातळ मिश्रण नको. थापता येईल एवढे घट्ट ठेवा. शेवटी त्यात इनो घाला.

  3. 3

    थाळीला तेल लावून त्यावर थोडे पांढरे तीळ घाला.मग मिश्रण थाळीत घालून थापा आणि वरून थोडे तीळ घाला. 15 -20 मिनिटे वाफवून घ्या. गार झाल्यावर त्याच्या वड्या कापा

  4. 4

    गरम तेलात कोथिंबीर वडी तळुन घ्या. तुम्ही वडी शॅलो फ्राय पण करू शकता. खोबरं कोथिंबीर नि सजावट करून भावाला खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
kavita arekar
kavita arekar @kav1980
रोजी

Similar Recipes