खमंग, खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#EB1
#wk1
#E-BookRecipechallenge

हिवाळा संपला असला तरीही बाजारात अजून कोथिंबीर चांगली मिळते आहे. कुठलाही तिखट पदार्थ कोथिंबिरीशिवाय अपूर्ण वाटतो. कोथिंबीर घातली की पदार्थाला कसं सुंदर रंगरूप येतं. विशेषतः पिवळ्या रंगाच्या पदार्थांवर तर कोथिंबीर घालायलाच हवी. या दिवसांत मिळणा-या विपुल कोथिंबिरीचा वापर आपण सगळेच जण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतो. मला स्वतःला कोथिंबीर पराठे, वैदर्भीय पुडाची वडी किंवा बाकर वडी, कोथिंबिरीचा भात हे पदार्थ तर आवडतातच. शिवाय कोथिंबीर वडीही आवडते. मुंबईकडे बहुतेक ठिकाणी मिळते ते कोथिंबीर वडी म्हणजे पिठल्याची वडी असते. या वड्यांमध्ये कोथिंबिरीचं प्रमाण कमी आणि बेसनाचं प्रमाण जास्त असतं. अशा वड्या मला अजिबात आवडत नाहीत. कोथिंबीर वडी कशी खुसखुशीत असायला हवी. त्यात कोथिंबिरीचा पुरेपुर स्वाद उतरायला हवा. विशेषतः वडीच्या बाहेरच्या भागातली तळलेली कोथिंबीर तर काय अफलातून लागते!😋😋
पाहूयात खमंग कोथिंबीर वडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० ते ३५ मि.
४ जणांसाठी
  1. 1मोठी जुडी कोथिंबीर
  2. 2 कपबेसन
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. प्रत्येकी
  5. २ टीस्पून तिखट
  6. 1 टीस्पूनधणे जिरेपूड
  7. 1 टेबलस्पूनतीळ
  8. 1/2 टीस्पूनसाखर
  9. 1 टीस्पूनतेल
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३० ते ३५ मि.
  1. 1

    कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवा आणि कोरडी होण्यासाठी स्वच्छ पंचावर किंवा कापडावर पसरून ठेवा.

  2. 2

    कोथिंबिरीतलं पाणी पूर्ण सुकलं की मग ती बारीक चिरून घ्या. त्यात हळद, तिखट, मीठ, धणे-जीरे पूड, साखर, मीठ, तीळ असं सगळं घाला.

  3. 3

    चांगलं एकजीव करून पंधरा मिनिटं बाजुला ठेवून द्या. जरा वेळानं हे मिश्रण ओलसर होईल.

  4. 4

    आता त्यात बेसन घाला. बेसन या मिश्रणात मावेल तसं कमीजास्त करा. गरज असल्यास थोडंसं पाणी घालून पीठ भिजवा. साधारणपणे भाकरीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट भिजवा. त्याला १ टीस्पून तेलाचा हात लावून त्याचे रोल करून घ्या.

  5. 5

    कुकरमध्ये जरा जास्त पाणी घालून पाणी उकळायला ठेवा. कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून हे रोल त्यात ठेवा.

  6. 6

    भांडं कुकरमध्ये ठेवून शिटी न लावता २० मिनिटं रोल वाफवून घ्या.

  7. 7

    थंड झाल्यावर पातळ वड्या कापा.

  8. 8

    तेल नको असल्यास नुसत्या उकडलेल्याही छान लागतात. नाहीतर पॅनमध्ये शॅलो फ्राय करा किंवा कढईत तेल कडकडीत तापवून मस्त तळून घ्या.

  9. 9

    तयार कोद

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes