खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

खमण ढोकळा माझ्या मुलींना खूप आवडतो. मी अधून मधून बनवत असते. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.#EB3 विंटर स्पेशल Ebook साठी ही रेसिपी मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा

खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

खमण ढोकळा माझ्या मुलींना खूप आवडतो. मी अधून मधून बनवत असते. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.#EB3 विंटर स्पेशल Ebook साठी ही रेसिपी मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीबेसन
  2. 1 वाटीदाही
  3. 2 चमचेबरिक रवा
  4. 1एनो चे पॅकेट
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1 चमचाआले पेस्ट
  7. 1 चमचालसूण पेस्ट
  8. 3 चमचेसाखर
  9. 1/2 चमचासाधं मीठ
  10. 1/2 चमचासैंधव मीठ
  11. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला
  12. चिमुटभरहिंग
  13. 4 चमचेतेल
  14. 1.5 वाटीपाणी
  15. 1लिंबुचा रस
  16. 3 टेबलस्पूनफोडणी साठी तेल
  17. 1 चमचामोहरी
  18. 6-8 काडीपता पान
  19. 5हिरव्या मिरच्या
  20. 1/2 चमचाहिंग
  21. 4 चमचेखवलेल खोबरे

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिट
  1. 1

    प्रथम बेसन चाळून घ्या. मोठा वाटी मध्ये बेसन,रवा, साखर, साधं मीठ, सेधंव मीठ, हिंग,हळद, आल लसूण पेस्ट आणि दही घालून चमच्या साह्यानं फेटा. हळदीच्या ऐवजी फुडकलर पण टाकू शकतो. ढोकळयाला छान रंग येतो

  2. 2

    आता त्यात लिंबू रस, तेल घालून परत फेटा. फेटतान चमचा एकाचं दिशेनं फिरवा. उलट सुलट फिरवू नका. भजी बनवताना जस पिठ असत तस पिठ लागेल असे पाणी घालून बनवा. आत हे पिठ 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा

  3. 3

    कुकर मध्ये दीड ग्लास पाणी घालून मध्यम आचेवर ठेवा.

  4. 4

    कुकर चा डबा घेऊन त्याला तेल लावून घ्या. आता पिठात इनो टाका व 2चमचे पाणी घालून फेटा. हे पिठ डब्यात ओता. डबा अर्धा येईल येवढंच पिठ घाला. पिठ जास्त झाले तर ढोकळयाला जाळी नाही येणार.

  5. 5

    कुकरच्या झाकणाची रींग कडून घ्या. कुकर मध्ये स्टँड ठेवा व पककडीच्या साह्यानं डबा कुकर मध्ये ठेवा

  6. 6

    झाकण लावून 20 ते 25 मिनीटे मंद आचेवर ठेवा. 20 मिनिटांनी ढोकळा शिजला की नाही ते सुरी च्या साह्यानं चेक करा. ढोकळयात घालुन पहा जर पिठ चिकट नाही तर तो व्यवस्थित शिजला समजावे. गॅस बंद करून डबा काढून घ्या.

  7. 7

    ढोकळा पूर्ण थंड झाला की फोडणीची तयारी करा

  8. 8

    एका छोट्या टोपत तेल गरम करून घ्या. मोहरी टाका ती तडतडली की कडीपत्ता, मिरची, हिंग टाकून पाणी घाला व गॅस बंद करा

  9. 9

    हे पाणी ढोकळया वर घाला व वरून खोबर बुरबुरा. ढोकळा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्या. पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes