बीटरूट कटलेट्स विथ आवळा चटणी (beetroot cutlets with awla chutney recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#happybirthdaycookpad
#cookalong
#winterspecial
#christmasvibes
#masterchefmirvaan
कुकपँड इंडिया या रेसिपीज प्लॅटफॉर्मला 5वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल कुकपँड परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!🙏💐 Bday म्हटले की सेलिब्रेशन तो बनता है ना बॉस...यासाठी खास शेफ सेलेब्रिटी आले होते मास्टरशेफ इंडियाचे मिरवान विनायक. यांच्यासोबत cookalong मध्ये बीटरूट कटलेट्स विथ स्पायसी आवळा चटणी ही रेसिपी बनविली ..अमेझिंग रेसिपी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडण्यासारखी. कुकपँड नेहमीच नवीन नवीन टास्क घेऊन येत असते. प्रत्येकवेळी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची प्रेरणा देत असते. असा हा आपला लाडका cookpad असाच बहरत राहो हीच सदिच्छा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
15 कटलेट्स
  1. 1 कपबीटरूट उकडलेले
  2. 4बटाटे उकडलेले
  3. 1कांदा चिरलेला
  4. 1 इंचआले बारीक चिरून
  5. 2हिरवी मिरची
  6. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  7. 2 टीस्पूनधने-जीरे पावडर
  8. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  9. मूठभरकोथिंबीर
  10. 5 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
  11. 100 ग्रॅमप्रोसेस्ड चीज
  12. 5 चमचेरवा
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल
  15. आवळा-पुदिना चटणीसाठी
  16. 1आवळा
  17. 1/4 कपपुदिना
  18. 1 इंचआले बारीक चिरून
  19. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  20. 1/4 कपकोथिंबीर बारीक चिरून
  21. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    आवळा चटणीसाठी प्रथम मिक्सरच्या भांड्यात चिरलेल्या आवळ्याचे काप, आले, मिरची, मीठ, पुदिना व कोथिंबीर घालून वाटून घ्यावे.
    आपली आवळा-पुदिना चटणी तयार.

  2. 2

    प्रथम बटाटे व बीट कुकरमध्ये उकडून घ्या. कांदा, कोथिंबीर, आले, मिरच्या अगदी बारीक चिरावे. उकडलेले बीट किसून घ्यावे.बटाटा कुस्करून घ्यावा. एक बाउलमध्ये हे बीट, बटाटे घेऊन त्यात चिरलेला कांदा, मिरची, लाल तिखट, आमचूर पावडर, धणे-जीरे पावडर, मीठ, आले, कोथिंबीर व कॉर्नफ्लॉवर घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

  3. 3

    एका बाऊलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात साधारण अर्धा कप पाणी घालून स्लरी बनवावी. एका प्लेटमध्ये बारीक रवा पसरवून ठेवा.

  4. 4

    एक एक गोळा घेऊन तो हातावर चपटा करून त्यात चीज क्यूब घालून गोळा बंद करून चपटा आकार द्यावा.

  5. 5

    कटलेट कॉर्नफ्लॉवर स्लरी मध्ये बुडवून घ्या.रव्यात घोळून ते तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्या. कटलेट दोन्ही बाजूने छान क्रिस्पी करून घ्या.
    टीप: रव्याच्या ऐवजी ब्रेडक्रम्स देखील वापरू शकता. चीज क्युब ऐवजी पनीर देखील वापरू शकता.

  6. 6

    गरमागरम बिटरूट कटलेट आवळा-पुदिना चटणी, खजुराची चटणी सोबत सर्व्ह करावे.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes