"पौष्टिक बीटरूट ची भाजी" (Beetroot Bhaji Recipe In Marathi)

" पौष्टिक बीटरूट ची भाजी "
सध्या माझीच तब्बेत बिघडली आहे, रक्तामधील आर बी सी कमी झालेत, आणि त्या करता सध्या औषधां बरोबर डाएट वर पण थोडा जोर देतेय, जेणेकरून तब्बेतीमध्ये लवकर सुधारणा होईल. असो....!!!
सध्याच्या डाएट मध्ये रक्त आणि रक्ताशी निगडित घटक वाढवण्याला प्राधान्य देते आहे, आणि बीट रूट हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे या साठी....!!
म्हणून ही भाजी वरचे वर माझ्या आहारात असते. आणि सर्वांनीच ती खावी असा माझा आग्रह समजा....❤️
अगदी बेसिक भाजी आहे, पण खूप पौष्टिक आहे.
"पौष्टिक बीटरूट ची भाजी" (Beetroot Bhaji Recipe In Marathi)
" पौष्टिक बीटरूट ची भाजी "
सध्या माझीच तब्बेत बिघडली आहे, रक्तामधील आर बी सी कमी झालेत, आणि त्या करता सध्या औषधां बरोबर डाएट वर पण थोडा जोर देतेय, जेणेकरून तब्बेतीमध्ये लवकर सुधारणा होईल. असो....!!!
सध्याच्या डाएट मध्ये रक्त आणि रक्ताशी निगडित घटक वाढवण्याला प्राधान्य देते आहे, आणि बीट रूट हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे या साठी....!!
म्हणून ही भाजी वरचे वर माझ्या आहारात असते. आणि सर्वांनीच ती खावी असा माझा आग्रह समजा....❤️
अगदी बेसिक भाजी आहे, पण खूप पौष्टिक आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कढई मध्ये तेल गरम करून त्यात हिंग जीरे आणि मोहरी घालून खमंग फोडणी करून घ्या.
त्यात बारीक चिरलेला लसूण घालून सोनेरी रंगावर तळून घ्या.
नंतर त्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. - 2
नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
हळद घालून मिक्स करा. - 3
Ata चवीनुसार मीठ घालून मिक्स करुन घ्या.
आणि नंतर यात किसलेला बीट रूट घालून परतून घ्या. - 4
भाजी वाफे मध्ये शिजू द्या, जास्त शिजवू नका.
शेवटी धणे पूड घालून मिक्स करा.
(हवे असल्यास वरून किसलेला ओला नारळ घालू शकता.) - 5
आणि गरमागरम सर्व्ह करा.
"पौष्टिक बीटरूट ची भाजी"
Top Search in
Similar Recipes
-
बीटरूट च्या पाना ची भाजी (Beetrootchya pananchi bhaji recipe in marathi)
#VSM #बीट रूटच्या पानाची भाजी: बाजारात कितीवेळा बीट रूट पाना सकट विकाला असतात तर ती पानं नकाढता त्या सकट बीट रूट विकत घ्यावे ही पानं हिमोग्लोबिन, रक्त वाढवणारी आणि अती पौष्टिक भाजी आहे. Varsha S M -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaji Recipe In Marathi)
#beetroot#bhajiमुलांच्या परीक्षेच्या वेळेस त्यांना योग्य आहार दिला म्हणजे त्यांचे शरीरही सुदृढ राहते आणि अभ्यास करताना त्यांना कसलाच त्रास होत नाही अशा प्रकारे आहार दिला म्हणजे मुलांना त्याचा फायदा होतो. परीक्षेच्या वेळेस मुलांची तब्येत व्यवस्थित राहावे यासाठी त्यांना चांगला आहार दिला पाहिजे म्हणजे एवढे वर्षभर केलेली मेहनत तब्येत मुळे त्यांची नुकसान होऊ नये त्यासाठी आहाराकडे चांगले लक्ष द्यायला हवे. माझ्या मुलीचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे बीटरूट तिला कोणत्याही प्रकारे खायला आवडते ज्यूस ,सॅलेड भाजी तिला खूप आवडते मी चटणीही करून देते बीटाची .आरोग्यावर खूप फायदे आहेत परीक्षेच्या वेळेस मुलांना आहारातून नक्कीच दिला पाहिजेबीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते.मेंदू हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव मानला जातो, त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बीटरूट नायट्रेट्सने समृद्ध आहे, त्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासोबत रक्त प्रवाह वाढवतो. बीटचे नियमित सेवन केल्याने मेंदूची स्मरणशक्तीही सुधारते.बीटरूटमध्ये भरपूर फायबर आढळते, ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात. चांगल्या पचनासह, बीटचे नियमित सेवण केले पाहिजे. Chetana Bhojak -
बीटरूट गाजर रायता (Beetroot Gajar Raita Recipe In Marathi)
#ChooseToCook.. माझी आवडती रेसिपी..पौष्टिक बीट रूट आणि गाजर, सोबत दही, आणि या वेळी मिळणारे,हिरवे ताजे बरबटीचे दाणे.. एकदम स्वादिष्ट रायता, जेवणाची लज्जत वाढविणारा... वेट लॉस करिता उत्तम.. तडका न देता.. Varsha Ingole Bele -
बीटरूट पावभाजी (beetroot pavbhaji recipe in marathi)
बीटमुळे रक्त लवकर वाढते . लहान मुलांना बीट आवडत नाही.परंतु पावभाजी खायला सर्वानांच आवडते. Trupti Temkar-Bornare -
हेल्दी आणि टेस्टी बीटरूट पराठा (Beetroot Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी हेल्दी आणि टेस्टी बीट रूट पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)
#dessert .. #व्हॅलेंटाईनस्पेशल... आज मी केला आहे चविष्ट आणि पौष्टिक असा बीट रूट चा हलवा. बीट रूट तसे खाणे कुणाला आवडत नाही. म्हणून मग बीट वापरून वेगवेगळे पदार्थ केले तर ते पोटात जाते. आरोग्यासाठी चांगले असलेले हे बीट रूट, हलव्याच्या रूपामध्ये खायला एकदम मस्त लागते . तेव्हा बघूया अगदी सोपा बीट रूट चा हलवा.. Varsha Ingole Bele -
बीटरूट टिक्की (beetroot tikki recipe in marathi)
#कूकपॅड इंडिया बर्थडे कुकिंग विथ सेफ मिरवान विनायक यांच्या बरोबर बीटरूट टिक्की शीकायला मिळाली. मी आज बीट रूटटिक्की ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बीटरूट मिनी उत्तप्पा (beetroot mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week5 #beetroot ह्या की वर्ड साठी बीट रूट चे मिनी उत्तप्पे केले. Preeti V. Salvi -
पौष्टिक माठाची भाजी (mathachi bhaji recipe in marathi)
संपूर्ण माठाची एक जुडी २५ ते ३० लोहाच्या टॉनिक गोळ्यांच्या बरोबरीचे नैसर्गिक लोह देते, जे बाळंतिणीला फार गरजेचे असते. माठ हा लोहयुक्त व रक्त वर्धक असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढते.चला तर मग पाहूयात अगदी सोपी आणि झटपट होणारी पौष्टिक भाजी. Deepti Padiyar -
बीटरूट पराठे (beetroot paratha recipe in marathi)
बीटरूट चे पदार्थ आवडीपेक्षा तब्येतीसाठी म्हणून जास्त खाल्ले जातात :) त्यातील बीटचे पराठे हा आमचा आवडता विषय आहे :) पंधरा दिवसातून एकदा तर नक्की असतातच आमच्याकडे :) सुप्रिया घुडे -
बीट रूट राईत (beetroot raita recipe in marathi)
#weekly ट्रेण्ड चेलेंज रेसिपी: पौष्टिक अस बीट रूट नेहमी आपल्या आहारात समावेश असावा कारण बीट रूट मुळे शरीरातले हिमोग्लोबिन (लाल रक्त) वाढते जे फार गरजेचं आहे.दही पण तितकं गरजेचं आहे म मी दही सोबत बीट रूट घालुन राईत्या ची रेसिपी करुन दाखवते. Varsha S M -
कणकेचा चीला (kankecha chilla recipe in marathi)
#GA4#week22 #चिला #कणकेचा, टोमॅटो आणि बीट रूट घालून केलेला चिला.. .पौष्टिक...आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
बीटरूट गाजर पुरी (Beetroot gajar puri recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # नेहमी, सकाळी नाश्त्यासाठी काय करावे, हा प्रश्न पडतो, अशा वेळी, बीट रूट आणि गाजर वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट, पुऱ्या दिल्या, तर नाश्ता चांगला झालाच म्हणून समजा... Varsha Ingole Bele -
बीटरूट चॉप्स (beetroot chops recipe in marathi)
#GA4#week5#beetroot#बीटरूटबीटरूट मध्ये फायबर , फोलेट ,विटामिन बी नाईन, मॅंगनीज, पोटॅशियम, आयरन आणि विटामिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं तसेच बीट रूट आणि त्याचा रस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जसे की रक्ताभिसरण,ब्लड प्रेशर कमी करणे त्यात जास्त प्रमाणात इन ऑरगॅनिक नायट्रेटअसतात. त्याची पानं सुद्धा खाल्ल्या जातात बीटरूट मध्ये सूज कमी करणारे घटक असतात तसेच इसेन्शियल व्हिटॅमिन्स मिनरल्स एंटीऑक्सीडेंट व युनिक बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असतात जे आपल्या प्रकृतीस फार उपयुक्त असतात. Mangala Bhamburkar -
रागी बीटरूट अप्पे (ragi beetroot appe recipe in marathi)
#अप्पे # आज सकाळी नाश्त्यासाठी काय करावं हा प्रश्न पडला असताना घरात रागी किंवा नाचणीचे पीठ आहे याची आठवण झाली आणि मग त्यात बिटाचा कीस टाकून त्याचे मस्तपैकी पौष्टिक आप्पे बनवले.. गरमागरम आप्पे ोबर्याच्या चटणी सोबत मस्त झाले सकाळी नाश्त्याला... Varsha Ingole Bele -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaaji recipe in marathi)
बीट हा लोह, जीवनसत्वं, फॉलीक Acid आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीटरूट शरीरातील हीमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात सापडलेल्या अँटि-ऑक्सिडेंट्स (विशेषतः बीटागीयनिन) शरीराला रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटॅमिन बी १, बी २ आणि व्हिटॅमिन सी हे सर्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. तर अशा या बीट च्या भाजीसाठी मी Rajashri Deodhar यांची रेसिपी #cooksnap करतेय. सुप्रिया घुडे -
पौष्टिक बीटरूट ची भाजी
#RJRरात्रीचे जेवण रेसिपीसबिट आपण नुसतेच खातो. कोशिंबीर करतो. हलवा करतो. त्याच्या वड्या करतो.पण अशी भाजी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल. Sujata Gengaje -
भेंडी पोकळ्या ची भाजी (bhendi poklyachi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं कि पोकळ्याची म्हणजेच चवळीची भाजी ही नैवेद्य म्हणून लागतेच,गणपतीत तर नैवेद्यासाठी भेंडी आणि पोकळा हा हवाच पारंपरिक रित्या बनविली जाणारी ही भाजी चावीला खूप छान लागते.मी इथे फक्त एकच भेंडा घातला आहे मुलांसाठी,पण ह्या भाजीत भेंडी आणि पोकळा सारखंच घेऊन भाजी बनविली जाते,गावी गेल्यावर ही भाजी खाण्यात ली मजा काही औरच!! चला तर मग पाहुयात भेंडी पोकळ्याची पाककृती. Shilpa Wani -
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
#GA4 #week5#Clue बीट वापरून केलेली सिम्पल रेसीपी... बीटरूट पराठा Geetanjali Kshirsagar-Bankar -
शेव टोमॅटो भाजी (sev tomato bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ... नेहमी शेव भाजी म्हणजे रस्सा, हे समीकरण.. पण आज मी , अगदी कमी साहित्यात झटपट होणारी, शेव टोमॅटो भाजी केली आहे.. आणि ते ही घरी, उरलेल्या फराळातील शेवेची... फक्त, शेवभाजी, ही गरमागरम खावी, .... Varsha Ingole Bele -
बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)
#sp # 🥗 सॅलेड, आपल्या जेवणाचा एक महत्त्वपूर्ण भाग... आपले जेवण पौष्टिक बनवण्याचा एक मार्ग ...आज मी बनवले आहे बीट रूट सॅलेड... करायला सोपे, पटकन होणारे, चवीला छान आणि पौष्टिक सुद्धा.. तर बघुया... Varsha Ingole Bele -
बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5 #post2. किवर्ड बीटरूट & सॅलेड Pranjal Kotkar -
बारीक मेथी मुगडाळ भाजी (methi moongdal bhaji recipe in marathi)
"बारीक मेथी मुगडाळ भाजी" Shital Siddhesh Raut -
बीटरूट रायता. (betroot raita recipe in marathi)
#GA4#week5गोल्डन एप्रन मधील किवर्ड बीटरूट....हा वर्ड पकडून बीटरूट रायता ही रेसिपी केली आहे...किसून घेतलेले बीटरूट आणि दही, लसूनअदरक ची पेस्ट, घातलेले मसाले, यांचे खूप मस्त कॉम्बिनेशन म्हणजे बीटरूट रायता रेसिपी...हा रायता खूप रुचकर आणि तेवढाच पोष्टिक देखील आहे. या मध्ये विपुल प्रमाणात पोटॅशियम, डायटरी फायबर, मॅग्नीज, आणि विटामिन b6 अजून खूप सारे विटामिन्स आणि न्यूट्रिशन या बीटरूट मधून आपल्याला मिळते. हा रायता तुम्ही पराठ्याबरोबर, पुलाव सोबत सर्व्ह करू शकता. इतका तो चवीला रुचकर आणि तेवढाच भन्नाट लागतो...नक्की ट्राय करा, *बीटरूट रायता*... Vasudha Gudhe -
श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
श्रावण घेवडा ही श्री दत्त गुरूंची आवडती भाजी आहे.ही रेसिपी मी केरळ ला हाउस बोट वर खाल्ली होती. ह्या भाजी ला beans poriyal म्हणतात. एकदम सात्त्विक आहे . भरपूर ओले खोबरे व अजिबात मसालेदार नसल्याने चविष्ट लागते.माझ्या घरी सगळ्यांना च ही भाजी खूप आवडते. Rashmi Joshi -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9: ई बुक चेलेंज करिता मी भोगीची भाजी बनवली.हिवाळ्यात अशी पौष्टिक भाजी शक्ती वर्धक आहे. Varsha S M -
कर्टूले ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमतपावसाळा माझा आवडता ऋतू. रिमझिम कोसळणारया त्या सरी तो गार वाहणारावारा.. सर्वी कडे दिसणारे हिर्वेगार निसर्ग खळ्खळ्नार्या पाण्याचे पाट...सगळी कडे कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. यासोबतच पहायला मिळतात सृष्टी ची अनोखी निर्मिती छोटी छोटी किटके मला आठवते ती लहान पणी लाल रंगाची मऊमऊ अशी देव गोगलगाय आणी असेच खूप चमत्कारीक जीव सोबतच नव नवीन उगव्लेली हिरवीगार वनस्पती किंवा रानमेवा आठवडी बाजार मधे जवळ पासचि खेडे गावतील लोक आणतात विकायला. आजोबा पट्वारी असल्यामूळे माझ्या वडिलांचे लहानपण बरेच से गावात गेले त्यामूळे त्याना पावसाळी रान भाज्यांची बरयापैकी माहिती होती अणि तशी ती आमच्या घरात पण यायची आणी म्हणूनच अम्हाला अश्या मौसमी पावसाळी रान भाज्या खायची आवाड निर्माण झालीआज अशीच एक भाजी तुमच्या साठी घेउन आली..कार्टूले.. तशी ही भाजी माझ्या घरात मलाच एकटीला आवडते आणी नेहमीच हा प्रयत्नही असतो की घरच्यानी पण आवडीने खावी..पण मी तसा आग्रह नाही करत वर्षातून काहिच तर दिवस दिसते ही भाजी म्हणून मी पण माझी माझ्या साठी च करते....चला तर पाहुया माझी ही पावसाळ्यातील रान भाजी Devyani Pande -
-
-
बीटरूट शुक्तो (beetroot Shukto recipe in marathi)
#पूर्व#बीटरूट शुक्तोबीटरूट शुक्तो हा एक पारंपरिक बंगाली जेवणातील मुख्य पदार्थ जो जास्त करून भाता सोबत सर्व्ह केला जातो. मुख्यतः शुक्तो म्हणाले की मिक्स भाज्यांचा आठवतो. पण मी आज बीटरूट शुक्तो रेसिपी सांगत आहे जी बंगाली घरात पूर्वापार केली जात असे. विस्मरणात चाललेली पारंपरिक रेसिपीच म्हणा ना.बीटरूट शुक्तो पोटाला थंडावा देणारा भाजीचा प्रकार. असे म्हणतात की ज्याला उत्तम शुक्तो बनवायला जमला तो किंवा ती पाककलेत निपुण. यावरून पूर्वी बंगाली कूकची परीक्षा घेतली जात असे.पूर्व या थीम नुसार बीटरूट शुक्तो रेसिपी खास शेअर करावीशी वाटते. Shital Muranjan
More Recipes
- मटर बटाटा पोहे (Matar Batata Pohe Recipe In Marathi)
- मुळ्याच्या पानांचे थालीपीठ (Mulyachya Pananchi Thalipeeth Recipe In Marathi)
- मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
- थंडीतले बाजरी पेय (Winter Special Bajri Drink Recipe In Marathi)
- वुड एप्पल पंच शाॅट्स (Wood Apple Punch Shots Recipe In Marathi)
टिप्पण्या