पंजाबी समोसे (punjabi samosa recipe in marathi)

Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja

आज मी अगदी authentic असे समोसे करण्याची रेसिपी देत आहे. विकतचे असतात त्याप्रमाणेच मी केलेले आहेत.

पंजाबी समोसे (punjabi samosa recipe in marathi)

आज मी अगदी authentic असे समोसे करण्याची रेसिपी देत आहे. विकतचे असतात त्याप्रमाणेच मी केलेले आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 ते दिड तास
  1. 1/2 कपपुदिना पाने
  2. 1.5-2 टीस्पून आले बारीक चिरून
  3. 1/2 कपकोथिंबीर
  4. 1 टीस्पून बडीशेप
  5. 2 टीस्पून धणे
  6. 5-6 लसुण पाकळ्या
  7. 3-4 हिरव्या मिरच्या
  8. 8-10मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  9. 1 कपहिरवे मटार
  10. तेल (फोडणीसाठी)
  11. 2 टीस्पून कसुरी मेथी
  12. 1 टीस्पून काळे मीठ
  13. 2.5 टीस्पून आमचुर पावडर
  14. 1 टीस्पून लाल तिखट
  15. 1 टीस्पून धणे पावडर
  16. 2 टीस्पून जीरे पावडर
  17. 1 टीस्पून काळी मिरी पावडर
  18. 1/2 टीस्पून लाल सुक्या मिरचीची भरड
  19. 1/2 टीस्पून गरम मसाला
  20. तेल (तळणीसाठी)
  21. पाणी (आवश्यकतेनुसार)
  22. 3 कपमैदा
  23. 1 टीस्पून ओवा
  24. तेल(मोहनासाठी)

कुकिंग सूचना

1 ते दिड तास
  1. 1

    एका भांड्यात मैदा घेऊन त्यात ओवा, चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 चमचे तेल (मोहन) घालावे. हे सर्व निट मिक्स करून त्यात गरजेनुसार पाणी घालून हे पिठ घट्ट मळून घ्यावे आणि भिजवून झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यावे. (मोहन म्हणून गरम तेल वापरू नये)

  2. 2

    प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, आले, लसुण, हिरवी मिरची, धणे आणि बडीशेप एकत्र घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यावी.
    आता गॅसवर एका कढईत 3 ते 4 टीस्पून तेल घ्यावे तेल गरम होत असताना त्यात कसुरी मेथी, काळे मीठ, आमचुर पावडर, लाल तिखट पावडर, गरम मसाला, धणे पावडर, जिरा पावडर, लाल मिरचीची भरड, काळ्या मिरीची पुड आणि चवीनुसार मीठ घालावे हे मिश्रण काही सेकंद परतल्यावर त्यात मिक्सरमध्ये केलेली पेस्ट घालावी आणि ढवळावे.

  3. 3

    आता वरील मिश्रणात हिरवे मटार घालावेत आणि काही सेकंद ढवळावे नंतर त्यात उकडलेले बटाटे फोडून घालावेत आणि सर्व मसाल्यासोबत मिक्स करून स्मॅश करावेत हे झाले आपले सारण तयार.

  4. 4

    आता मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे(आपल्या आवडीप्रमाणे लहान- मोठे चालतील) गोळे करावेत. त्या गोळ्यांची लांबट अशी पोळी लाटावी आणि त्या पोळीचे दोन एकसारखे भाग करावेत.

  5. 5

    आता पोळीचा अर्धा भाग घेऊन त्याच्या कापलेल्या भागाला मध्यभागी दुमडून एकमेकांना चिटकवून त्याची कोन होईल याप्रमाणे घडी घालावी (चिटकवण्यासाठी पाण्याचा वापर करावा)आणि त्याचा कोन करून त्यात तयार केलेले सारण भरून घ्यावे. आता कोणाच्या जोडलेल्या भागाच्या विरुद्ध असलेली बाजु थोडीशी ताणून ती जोडलेल्या भागावर घेऊन चिकटवून घ्यावी.

  6. 6

    वरीलप्रमाणे सर्व समोसे वळून घ्यावेत आणि एकीकडे एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाले की तयार समोसे तेलात सोडून मध्यम आचेवर खरपुस तळून घ्यावेत आणि चटणीसोबत सर्व्ह करावेत.

लिंक्ड रेसिपीस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
रोजी
cooking हा माझा एक आवडता छंद आहे, वेगवेगळ्या रेसिपी try करायला मला खूपच आवडते माझे स्वयंपाकघर ही माझी प्रयोगशाळा आहे म्हणायला हरकत नाही. फक्त मी हाडाची vegetarian असल्याने veg रेसिपीच try करते. वेगवेगळ्या रेसिपी साठी लागणारी वेगवेगळी भांडी आणि त्या सर्व्ह करण्यासाठी आकर्षक अशी भांडी खरेदी करायला ही मला खुप आवडते
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes