भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#भाजी
#भरलीवांगी
अगदी सोपी आणि लवकर तयार होणारी रेसीपी जवारीची भाकरी किंवा पोळी दोन्ही सोबत खायला अप्रतिम

भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)

#भाजी
#भरलीवांगी
अगदी सोपी आणि लवकर तयार होणारी रेसीपी जवारीची भाकरी किंवा पोळी दोन्ही सोबत खायला अप्रतिम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०- मिं
  1. 4छोटी काटेरी गावरान वांगी
  2. 1माठा कांदा
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला
  6. चवि पुरत मीठ
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1 वाटीभाजलेले शेंगदाना कुट
  9. अवशकते नुसार पाणि
  10. मोहरी
  11. जिर
  12. 3 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

२०- मिं
  1. 1

    वांगी धुऊन भरली वांगी तयार करायला जस कट करते तसे कट करा + च्या आकारत कांदा बारीक चिरा कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घ्या

  2. 2

    नंतर शेंगदाणा कुट घ्या त्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला मीठ हळद बारीक चिरलेले थोडा कांदा आणि कोथिंबीर दोन चमचे कच्चे तेल घालून सर्व मिक्स करा हा वाग्या मध्ये भरण्या साठी मसाला तयार होतो

  3. 3

    नंतर कट केलेल्या वांग्या मध्ये हा मसाला भरून घ्यावा थोडा मसाला शिल्लक ठेवावा

  4. 4

    गॅस सुरु करून कढई मध्य २ चमचे तेल टाका तेल गरम झाल्या नंतर मोहरी आणि जीरे घाला तडका तयार झाल्या वरती त्यात कांदा घाला व गुलाबी सर रंगा वरती परतून घ्यावा

  5. 5

    कांदा परतल्या नंतर त्यात शिल्लक मसाला घालून थोडी कोथिंबीर घाला आणि परतून घ्यावे

  6. 6

    कढई मधील मसाल्या मध्ये भरलेली वांगी टाका आणि झाकण ठेऊन त्या झाकणा वरती पाणी घालून १० मिं वाफ घ्या

  7. 7

    १०- मिं नंतर झाकण काढून भाजी मिक्स करून घ्या आणि ताटा वरील गरम पाणी भाजी मध्ये टाकून भाजी शिजून घ्या

  8. 8

    पाणि आटलेकी भाजी शिजली का ते चेक करा आणि सर्व्ह करा

  9. 9

    मस्त मसाले दार वांग तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

Similar Recipes