आलु समोसे (aloo samosa recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मस्त रिमझिम पाऊस पडत होता.सगळ्या प्रकारची भजी, बटाटेवडे इतक्या दिवसात तर करून झालेले.मग काय आता फक्त समोसेच राहिले होते करायचे. मग केले मस्त गरम गरम आलू समोसे आणि सोबत वाफाळलेला चहा ... हा बेत ...मस्त एन्जॉय करत करत खाल्ले.

आलु समोसे (aloo samosa recipe in marathi)

मस्त रिमझिम पाऊस पडत होता.सगळ्या प्रकारची भजी, बटाटेवडे इतक्या दिवसात तर करून झालेले.मग काय आता फक्त समोसेच राहिले होते करायचे. मग केले मस्त गरम गरम आलू समोसे आणि सोबत वाफाळलेला चहा ... हा बेत ...मस्त एन्जॉय करत करत खाल्ले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण अर्धा तास
३-४
  1. समोसा पारी
  2. 1 कपमैदा
  3. 1/4 टीस्पूनमीठ..चवीनुसार कमी जास्त
  4. 2 टेबलस्पूनतेल...मोहन
  5. 1/4 टीस्पूनओवा
  6. 1/4 कपपाणी...अंदाजे
  7. सारण...
  8. 3उकडलेले बटाटे
  9. 1/2 टीस्पूनमीठ
  10. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  11. 1हिरवी मिरची
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 1/4 टीस्पूनहिंग
  14. 1/4 टीस्पूनहळद
  15. 1/2 टीस्पूनतिखट
  16. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  17. 1 टीस्पूनबेसन
  18. 1 टीस्पूनसाखर
  19. 1 टीस्पूनधणे जिरे पावडर
  20. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  21. 1/2 टीस्पूनधणे
  22. 1/2 टीस्पूनजीरे
  23. 1/2 टीस्पूनबडीशेप
  24. 1लाल मिरची
  25. 2 टेबलस्पूनपाणी
  26. 1/2 टीस्पुनतेल

कुकिंग सूचना

साधारण अर्धा तास
  1. 1

    प्रथम समोसा बनवण्याच्या पारीची तयारी केली.मैदा,मीठ,हातावर चोळून घेतलेला ओवा आणि मोहन घालुन नीट मिक्स करून घेतले.त्याची मुठ पाडून पाहिली.

  2. 2

    थोड थोड कोमट पाणी घालून घट्ट आटा मळून घेतला.आणि पंधरा मिनिटे झाकून ठेवला.

  3. 3

    तोपर्यंत बटाटे उकडून, सोलून,कुस्करून घेतले.धणे,जीरे,बडीशेप,लाल मिरची खलबत्त्यात भरड कुटून घेतले.तव्यावर तेल घालून त्यात हिंग,हळद,तिखट,मीठ,धणे जिरेपूड,गरम मसाला,आमचूर पावडर,साखर, बेसन हे सर्व छान परतून घेतले.त्यात भरड वाटलेले मिश्रण घालून मिक्स केले.,चिरलेली कोथिंबीर घातली,२ टेबलस्पून पाणी घातले,छान परतून कोरडे केले. हे सर्व मिश्रण कुस्करलेल्या बटाट्यात घालून छान मिक्स केले.

  4. 4

    झाकून ठेवलेल्या आट्याचे छोटे गोळे केले.त्याची गोलाकार पोळी लाटून घेतली तिचे अर्धचंद्राकृती दोन भाग केले.एक भाग घेऊन त्याचा कोन तयार केला.त्यामध्ये सारण भरून कडा पाण्याने चिकटवून घेतल्या.

  5. 5

    अशा पद्धतीने समोसे तयार करून सोनेरी रंगावर तळून घेतले.

  6. 6

    गरम गरम समोसे सॉस सोबत सर्व्ह केले.सोबत वाफाळलेला चहा होताच.पण त्याचा फोटो काढायचा राहिला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes