आईच्या हातचे समोसे (samosa recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#md
#समोसे
माझी आई काही फार सुगरण नव्हती पण आम्हा मुलांचे हट्ट मात्र ती पुरवायची. आमच्या लहानपणी आम्हा सर्वांना समोसे खूप आवडायचे. त्यावेळी तिने ते खास शिकून आमच्यासाठी बनवले. ते इतके छान झाले त्यामुळे वारंवार तिला ते करायला सांगाय चो. त्याकाळी हॉटेल वगैरे ते आकर्षण असायचे. पण हे समोसे आम्ही आमच्या एका नातेवाईकाकडे खाल्ले होते. आईने तिथून शिकून आम्हाला करून खाऊ घातले. त्यात बाबांनी मदत केली कारण त्यांनाही आवडायचे. आज ते बनवले आठवण ताजी झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
तीन व्यक्ती करिता
  1. 250 ग्रॅमबटाटे
  2. 1 वाटीमैदा
  3. 6लसूण पाकळ्या
  4. 6हिरव्या मिरच्या
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  7. 1 टेबलस्पूनकाजू किस्मिस
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनबडी सोप
  10. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  11. 1 टी स्पूनकसुरी मेथी
  12. 1 टीस्पूनधने पावडर
  13. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  14. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  15. तेल तळण्यासाठी
  16. 1 टीस्पूनरवा
  17. मीठ स्वादानुसार

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे उकळून घ्यावे व त्याचे साल काढून त्याच्या हाताने फोडी करून ठेवा. आता एका ताटलीमध्ये मैदा व रवा एकत्र करा त्यात साजूक तूप घाला चांगले मिक्स करून भिजवून ठेवा. त्यावर ओला फडकं झाकून ठेवा.

  2. 2

    कोथिंबीर मिरची आले व लसूण मिक्सर मधून बारीक करून घ्या. तसेच आमचूर तिखट धने जीरे पावडर व गरम मसाला एकत्र करून घ्या.आता एका पॅन मध्ये तेल टाका.यात बारीक केलेले आले लसुन चे मिश्रण घाला. कच्चेपणा गेला की त्यात हाताने कुस्करलेले बटाटे घाला.

  3. 3

    पायात कसुरी मेथी तिखट आमचूर धने-जिरेपूड याचं केलेलं मिश्रण घाला. मीठ घाला कोथिंबीर घाला काजू किसमिस घाला.चांगले परतून घ्या. हे मिश्रण चांगले थंड होऊ द्या.

  4. 4

    आता भिजवलेल्या मैद्याचे गोळे करा.गोळा पोळपाटावर लाटून घ्या.मधून अर्धा कापा.एक भाग घेऊन त्याला मधून दाखविल्या प्रमाणे कोन करा.आता यात बटाट्याची भाजी घाला. व खालचा भाग पाणी लावून बंद करा. अशाप्रकारे सर्व समोसे बनवून घ्या.

  5. 5

    आता गॅसवर कढईत तेल तापत ठेवा. आता एक एक समोसा टाकून मंद आचेवर सर्व समोसे तळून घ्या. हे समोसे हिरव्या मिरच्या दही चिंचेच्या चटणी सोबत अप्रतिम लागतात.

  6. 6

    या समोस्याची पद्धत थोडी वेगळी असून चवीला अप्रतिम आहे विशेष म्हणजे त्यात आईचं प्रेम आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Deepa Patel
Deepa Patel @cook_25234990
मस्त रेसिपी आहे तुमची. मी जरूर करून पाहिलं

Similar Recipes