हुरडा (hurda recipe in marathi)

#EB10 #W10
डिसेंबर-जानेवारी म्हणलं की आठवण होते हुरड्याची!शहरातल्या माणसांना धावपळीच्या जीवनातून यावेळी गावकडची ओढ असते ती हुरडा पार्टीची आणि मौजमजेची! हुरडा म्हणजे ज्वारीची कोवळी कणसं. महाराष्ट्र हा ज्वारीसाठी खूप प्रसिद्ध आहे. ज्वारीच्या मालदांडी,गूळभेंडी,बेंदरी,लकडी अशा अनेक जाती आहेत.ग्लुटेनफ्री अशी ही ज्वारी आता आहारात महत्वाची झाली आहे.हुरडा खाण्यासाठी खास वेगळी ज्वारी शेतात लावली जाते.शेतात जाऊन हुरडा खाणं ही एक गावरान मेजवानीच!हुरड्यासाठी लावलेली कणसं साधारण लांबीची तोडली जातात.मग शेताच्या जमिनीवरच एक खड्डा घेऊन त्यात गोवऱ्या,कोळशाचे निखारे फुलवतात.या निखाऱ्यात मग सगळीकडून कणसं खोचली जातात आणि मधूनमधून फिरवून भाजली जातात.भाजलेली कणसं निखाऱ्यातून काढून मग एकेक कणिस हातावर चोळून कोवळे दाणे वेगळे करतात.हे दाणे चोळून वेगळे करताना हातही काळे होतात.फोलकटं बाजूला करुन या भाजलेल्या ज्वारीच्या हुरड्याबरोबर खोबरं, दाणे,लसणाची चटणी,मीठ,गूळाचा खडा,मिरची,गावरान गाजरं,तीळरेवडी,गोडीशाव यांचा एखाद्या झाडाखाली बसून फक्कड असा खादंतीचा बेत रंगतो.मऊ कोवळा हा हुरडा खूपच गोडीचा असतो.एरवी शेतात न जाताही हुरडा घरी आणून तेला-तुपावर भाजून मीठ घालून बरोबर तिखट चटणी,तळलेले दाणे,फरसाण,लिंबं यासह ताव मारता येतो.एकंदर पौष्टिकतेने भरलेला हा हुरडा म्हणजे भरपूर फायबर्स आणि प्रोटिन्स यांचा थंडीत मिळणारा खजिनाच आहे.याची चव दर थंडीबरोबर घ्यायलाच हवी.कधी शेतात तर कधी घरी!हुरड्याबरोबर पोटभरीसाठी बाजरीचा खिचडा,भरीत-भाकरी,थालिपीठं असा मेनू म्हणजे खवैय्यांची चंगळच!!...चला आज माझ्या घरी ...खास हुरडापार्टीचं आवातन😁😁😋
हुरडा (hurda recipe in marathi)
#EB10 #W10
डिसेंबर-जानेवारी म्हणलं की आठवण होते हुरड्याची!शहरातल्या माणसांना धावपळीच्या जीवनातून यावेळी गावकडची ओढ असते ती हुरडा पार्टीची आणि मौजमजेची! हुरडा म्हणजे ज्वारीची कोवळी कणसं. महाराष्ट्र हा ज्वारीसाठी खूप प्रसिद्ध आहे. ज्वारीच्या मालदांडी,गूळभेंडी,बेंदरी,लकडी अशा अनेक जाती आहेत.ग्लुटेनफ्री अशी ही ज्वारी आता आहारात महत्वाची झाली आहे.हुरडा खाण्यासाठी खास वेगळी ज्वारी शेतात लावली जाते.शेतात जाऊन हुरडा खाणं ही एक गावरान मेजवानीच!हुरड्यासाठी लावलेली कणसं साधारण लांबीची तोडली जातात.मग शेताच्या जमिनीवरच एक खड्डा घेऊन त्यात गोवऱ्या,कोळशाचे निखारे फुलवतात.या निखाऱ्यात मग सगळीकडून कणसं खोचली जातात आणि मधूनमधून फिरवून भाजली जातात.भाजलेली कणसं निखाऱ्यातून काढून मग एकेक कणिस हातावर चोळून कोवळे दाणे वेगळे करतात.हे दाणे चोळून वेगळे करताना हातही काळे होतात.फोलकटं बाजूला करुन या भाजलेल्या ज्वारीच्या हुरड्याबरोबर खोबरं, दाणे,लसणाची चटणी,मीठ,गूळाचा खडा,मिरची,गावरान गाजरं,तीळरेवडी,गोडीशाव यांचा एखाद्या झाडाखाली बसून फक्कड असा खादंतीचा बेत रंगतो.मऊ कोवळा हा हुरडा खूपच गोडीचा असतो.एरवी शेतात न जाताही हुरडा घरी आणून तेला-तुपावर भाजून मीठ घालून बरोबर तिखट चटणी,तळलेले दाणे,फरसाण,लिंबं यासह ताव मारता येतो.एकंदर पौष्टिकतेने भरलेला हा हुरडा म्हणजे भरपूर फायबर्स आणि प्रोटिन्स यांचा थंडीत मिळणारा खजिनाच आहे.याची चव दर थंडीबरोबर घ्यायलाच हवी.कधी शेतात तर कधी घरी!हुरड्याबरोबर पोटभरीसाठी बाजरीचा खिचडा,भरीत-भाकरी,थालिपीठं असा मेनू म्हणजे खवैय्यांची चंगळच!!...चला आज माझ्या घरी ...खास हुरडापार्टीचं आवातन😁😁😋
कुकिंग सूचना
- 1
कोवळा आणि ताजा हुरडा घ्यावा.पँकिंगमधला असल्यास थोडा कपड्यावर ओतून चोळून घ्यावा.स्वच्छ होतो.
कढई गँसवर तापत ठेवून त्यात लागेल तसा हुरडा भाजून घ्यावा.मध्यम आचेवर प्रथम कोरडाच भाजावा.सतत परतावे.कारण दाणे खूपच कोवळे असल्याने लवकर करपतात.थोडी वाफ धरली की तेल व मीठ घालून पुन्हा परतावे. - 2
हुरडा गरमच खाण्याची मजा आहे.याबरोबर शेंगदाण्याची,खोबरे-लसणाची चटणी,चिरलेला कांदा,आवडत असल्यास थोडा फरसाण,गुळाचे खडे आणि वर लिंबाची फोड ठेवून गरमागरम सर्व्ह करावा थंडीची रंगत वाढवणारा मस्त हुरडा!😊😊👍
Similar Recipes
-
हुरडा (Hurda Recipe In Marathi)
#BWR#HURDAहुरडा बोलताच समोर हिरवं गार ज्वारीचे शेत येते हिवाळ्यात जास्त तर कृषी पर्यटक म्हणून हुरडा पार्टी फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी हुरडा पार्टी केली जाते शहरातील बरेच मंडळी या हुडा पार्टीस साठी गावाकडे जातात. कवळ्या कवळ्या हिरव्या ज्वारीच्या कंसांची दाणे भाजून गूळ आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबरखाल्ले जातात खूप आवडीने सगळे एन्जॉय करतात मलाही जाता जाता ह्या सीझनचा हुरडा खायला मिळाला ते माझ्या एका गुजराती फ्रेंड मुळे ती गुजरात वरून फिरून आल्यावर तिने माझ्यासाठी हा हुरडा आणला.मी तिला सांगितले होते तुला जर मिळाला तर नक्कीच माझ्यासाठी आणि तिने आणले हायवे वर बऱ्याच ठिकाणी तिला हुरडा विकताना दिसला मी सांगितल्यामुळे ती थांबली आणि तिने माझ्यासाठी आणला आणि तिने ही खाल्ला तिच्यामुळे मला ही संपत आलेला हिवाळ्याचा सीजन असूनही हा पदार्थ खायला मिळाला . मी पण भरपूर मागवला आणि एन्जॉय केला. Chetana Bhojak -
ज्वारीचा हुरडा (Jowaricha Hurda Recipe In Marathi)
#LCM1#ज्वारीचा_हुरडासुषमा कुलकर्णी ताईंची ज्वारीचा हुरडा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खूप छान लागला हुरडा.डिसेंबर जानेवारी महिन्यात ज्वारीची कोवळी कणसं यायला लागतात. ती कोवळी कणसं भाजून खातात खूप छान लागतात. या कोवळ्या कणसांना हुरडा म्हणतात. शेतामधे एकत्र जमून सगळ्यांबरोबर हुरडा पार्टी करण्याची गंमत काही औरच असते. Ujwala Rangnekar -
गावरान हुरडा (Gavran hurda recipe in marathi)
#हुरडाहिवाळा सुरु झाला की वेध लागतात ते हुरडापार्टीचे आणि मग हुरडा पार्टीचे बेत ठरू लागतात. आजकाल तर काही दुकानांत ज्वारीचे कोवळे दाणे असलेला पॅकेट बंद हुरडा मिळू लागला, तरी जी मजा शेतात जाऊन खाण्यात आहे ती घरात नाही. पट्टीची हुरडा खाणारी मंडळी सोबत असली की त्याची लज्जत काही औरच. अशा या थंडीच्या मोसमात सगे सोयऱ्यां सोबत एकतरी हुरडा पार्टी झालीच पाहिजे... Shital Muranjan -
हुरडयाचा उपमा (hurdyacha upma recipe in marathi)
#GR#गावरान वाणीचा हुरडा #😋#काल शेतात हुरडा पार्टी एॅजाय केलीथोडा हुरडा उपमा करावासा वाटला आवडीती डीश😋 Madhuri Watekar -
लज्जतदार हुरडा भेळ (Hurda Bhel Recipe In Marathi)
#GR2थंडीच्या दिवसांत , शेताचा राजा म्हणजे कोवळा ,लुसलुशीत " हुरडा " . खाण्यास गोड आणि तब्येतीला पौष्टिक !!गावाकडे असताना , आधी गरम गरम हुरडा खायचो . नन्तर हुरड्याची भेळ .. आहाहा , लाजवाब ..हल्ली सगळीकडे हुरडा मिळतो . त्यामुळे तुम्ही पण करून पहा .कृती पाहू ... Madhuri Shah -
मराठवाडा स्पेशल ज्वारीचे थालिपीठ (jowariche thalipeeth recipe in marathi)
#KS5थालीपीठ हा असा खाद्य पदार्थ आहे जो आपण नाश्त्याला, जेवणात किंवा लांबचा प्रवास करताना देखील सोबत खाण्याकरीता ठेवू शकतो. थालीपिठ ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी असूनही महाराष्ट्रातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता मराठवाडा पद्धतीची ज्वारीच्या थालिपीठाची रेसिपी घेऊन आले आहे.थालिपीठ म्हणलं की भाजणीचं हेच डोळ्यापुढे येतं.त्याची सर कशालाच नाही.खूप अनुभवी हातांनी योग्य प्रमाणात आणि अचूक अशी भाजलेली भरपूर धणे भाजून घातलेली भाजणी...त्याचे थालिपीठ...मस्त भरपूर कांदा-कोथिंबीर... सोबत लोण्याचा गोळा....ताजे नवे घातलेले कैरीचे लोणचे किंवा लिंबाचे मुरलेले...आणि तव्यावरुन पानात आले की जे स्वर्गसुख मिळते ते कश्शातच नाही.स्वयंपाकाच्या कंटाळ्याला चोख पर्याय थालिपीठच..वेळ आणि भूक दोन्ही भागवणारा.ही भाजणी म्हणजे पंचधान्य,सप्तधान्य घालून केलेली.आपली दररोजच्या वापरातील सगळी धान्ये यात येतातच.जास्त प्रमाण ज्वारी बाजरीचे,त्याहून कमी गहू,तांदूळ,हरभराडाळ,उडीदडाळ, मूगडाळ इ.इ.डाळींऐवजी ती कडधान्ये घेतल्यास अधिकच पौष्टिक. कधी नाचणी,वरई,चवळी,सोयाबीनही घालतात.गुजराथकडे ही धान्य न भाजताच फक्त एकत्र करुन दळून थालिपीठ करतात.कोकणात तांदळाची कांदा घालून केलेली थालिपीठं मस्तच लागतात.भाजणी करेपर्यंत मात्र ज्वारीची थालिपीठेही आनंद देतात...कधी कोबी,कधी गाजर असे घालून.भरपूर प्रोटीन्स आणि कार्ब्ज चा स्त्रोत आपल्या पूर्वजांनी थालिपीठ रुपाने दिलाय आणि घरोघरी ती आवर्जुन केली जातातच!माझी एक काकू आहे अप्रतिम भाजणी करते...ती साधी थालिपीठाची किंवा चकलीची किंवा उपासाची असो....तिच्या हातची ही चव कुठेच नाही.ही मराठवाड्याकडची थालिपीठं तुम्हालाही आवडतील अशीच!!😊 Sushama Y. Kulkarni -
संक़ात सुप (soup recipe in marathi)
# सुप- हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या,ओले दाणे,हुरडा असा रानमेवा येतो.तेव्हा काही वेगळं करावं असं वाटत़ तेव्हा हटके झटके सुप करत आहे. Shital Patil -
लाल भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKRउन्हाळ्यात ठराविकच भाज्या पूर्वी मिळत असत.त्यातील बाराही महिने सदाबहार मिळणारी अशी भाजी म्हणजे परसदारी मिळणारा भोपळा.आमच्या गावी घरातल्या कोनाड्यात याची जागा होती.नाही मिळाली भाजी तर हा लाल भोपळा उर्फ काशीफळ हेच कामी यायचे.एकदा भोपळा फोडला की मग त्याची वाटावाटी आणि उरलेला मग घरात भाजीसाठी,भरतासाठी किंवा भोपळघारग्यांसाठी!लाल भोपळ्याला अंगचाच गोडसरपणा असतो.केशरी-पिवळा सुखावह रंग,वरच्या जाळीदार आवरणात लपलेल्या बिया,कठीण साल असं याचं रुप...अगदी सात्विक,आणि म्हणूनच उपासाला सुद्धा चालणारा हा भोपळा.भरपूर फायबर्सचा स्त्रोत.वजन कमी करणे,डोळ्यांचे आरोग्य सुधारणे,पचनक्रिया सुधारण्यासाठी,रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि मधुमेहींसाठी खास असा हा आरोग्यवर्धक भोपळा....बऱ्याच जणांना आवडत नसला तरी अधूनमधून याची भाजी खायला हवीच! Sushama Y. Kulkarni -
अख्खा मसूर-कोल्हापूर स्पेशल (akha masoor recipe in marathi)
#ccsमसूर हे या एक द्विदल कडधान्य. सगळ्यांचे आवडते.चटकन होणारे...अगदी मोडच यायला हवेत असे नाही.लवकर भिजतात.ऐनवेळीही करता येण्यासारखी!शिवाय अगदी चविष्ट आणि पचनास हलकीही.साध्या लसणाच्या फोडणीनेही छान चव येते.ही नेहमी घरीच होणारी आणि उसळ वर्गातली...पण काही दिवसांनी ही हॉटेलमध्येही दिसू लागली...."अख्खा मसूर"च्या पुण्यापासून अगदी कोल्हापूरापर्यंत ठिकठिकाणच्या ढाब्यावर मोठे फलक दिसू लागले.मला तर ही अख्खा मसूरची काय भानगड आहे हे बरेच दिवस समजलेच नव्हते.एकदा कोल्हापूरला जाताना कराडपाशी एका हॉटेलमध्ये हा पदार्थ ट्राय केला...अगदी झणझणीत आणि तर्रीदार..नाकातून पाण्याची धार आणि तिखटपणाने घामच आला...खास कोल्हापूरी झटका!!इतका तिखटपणा काही नेहमीच्या जेवणात आमच्याकडे नसतो...तरीही झणझणीत खाण्याची इच्छा झाली की आता हा अख्खा मसूर जरा स्टाईलमध्ये ज्यादा मसाला और ग्रेव्हीबरोबर केला की जिव्हातृप्ती बरोबरच हॉटेलस्टाईलचाही आनंद मिळतो!🤗🤗....पहा,आवडतीये का तुम्हाला माझी ही रेसिपी😊 Sushama Y. Kulkarni -
-
कांदा चटणी...सिंहगड स्पेशल (kanda chutney recipe in marathi)
#Cooksnap#कांदा_चटणी_सिंहगड_स्पेशल.. कांदेनवमी ... या दिवशी सबकुछ कांदा रेसिपीज..😍...मुसळधार,धो,धो पावसात जिभेला खास treat देण्याची ही नवमी तिथी..हा दिवस त्यामुळे घरोघरी फार पूर्वीपासूनच साग्रसंगीत सोहळ्याचा दिवस..आप्तस्वकीयांबरोबर हसतखेळत पाऊसधारांसंगे गरमागरम कांद्याचे विविध पदार्थ करुन त्या मेजवानीचा आस्वाद घेण्याचा दिवस..😍..लहानपणापासूनच खास कायम आठवणीतला दिवस...हा दिवस खास असण्याचे कारणही तसेच खास ...आहाराचा ऋतुमानाशी लावलेला संबंध..पुढे दोन दिवसांनी येणारी आषाढी एकादशी..सुरु होणारा चातु्र्मास.. चातु्र्मासात चार महिने कांदा,लसूण,वांगी हे पदार्थ खायचे नाहीत..कारण चार महिन्यांचा पावसाळा..या पावसाळ्यात मंद झालेली पचनशक्ती..त्यात हे वातूळ पदार्थ खाल्ले तर तब्येतीस त्रास होणार..हे तळण्यासाठी कांदा,लसूण पदार्थ निषिद्ध ...म्हणूनच हा चार महिन्यांचा दुरावा सुसह्य व्हावा म्हणून कांद्याला बहाल केलेली ही खास तिथी.😍..खरंच पूर्वाजांच्या विचारांचे करावे तेवढे कौतुक कमीच..सगळेच अचंबित करणारे !!!!! चला तर मग आज मी माझी मैत्रीण @Shital Siddhesh Raut हिची सिंहगड स्पेशल कांदा चटणी cooksnap केलीये..शितल अतिशय चमचमीत झालीये ही कांदा चटणी..😋😋..खूप मस्त..👌👌..सगळ्यांनाच आवडली.. Thank you so much dear for this awesome recipe😊🌹❤️ Bhagyashree Lele -
चिकन शेवपुरी
#स्ट्रीटरोजच्या शेवपुरी पेक्षा काहीतरी वेगळे करावे असा विचार होता आणि त्यातूनच ही एक वेगळी रेसिपी मला सुचली बघा तुम्ही पण ट्राय करून खास नॉनवेज लवरसाठी😍 Yashshree Korgaonkar -
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1एक अस्सल खान्देशी प्रकार म्हणजे शेवभाजी.महाराष्ट्रातील खाद्यभ्रमंतीमध्ये शेवभाजी हा सुद्धा एक लोकप्रिय प्रकार!खान्देश म्हणजे धुळे,जळगाव, भुसावळ, नंदुरबार...उत्तर महाराष्ट्र. इकडे तिखटाचं प्रमाण अधिक आणि मसालेदार पदार्थ ही खासियत. पदार्थावरचा लाल तिखट तवंग पाहूनच आम्हा पुण्याच्या लोकांना खावे की न खावे हा प्रश्न पडतो!!☺️तिखट,तेज,तर्रीदार अशी ही शेवभाजी म्हणजे थंडीला पळवून लावणारी...याच्या मसालेदारपणाने नाकडोळ्यातून पाण्याच्या धारा सुरु होतात आणि जिव्हा काय तृप्त होते म्हणून सांगू!शेवभाजीसाठी लागणारा मसाला घरी करु शकतो किंवा तयार मिळणाराही वापरता येतो....ब्रेड किंवा गरमागरम ज्वारीच्या पातळ भाकरीबरोबर याची लज्जतच न्यारी...बरोबर कांदा आणि लिंबू....अहाहा...!!चला मग...घ्या ही शेवभाजीची डीश...आणि पळवून लावा थंडीला🤗 Sushama Y. Kulkarni -
मराठवाडा रेसिपीज हुरड्याचे धपाटे (Hurdyache dhapate recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात काही भागात ज्वारी हे मुख्य पीक आहे आणि तेथील ज्वारी सुद्धा खूप छान आसते. आमचे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातत आहे हा हुरडा आमच्या शेतातीलच आहे. कोवळ्या ज्वारी लाच आपण हुरडा म्हणतो. ज्वारीची कोवळी कणसे काढून ती गोवरीच्या निखाऱ्यावर भाजतात. आणि आपल्या आवडीच्या लसुन शेंगदाणा किंवा खोबर्याच्या चटणी बरोबर तो हुरडा खातात. सध्या हुरडा पार्टी खूपच प्रसिद्ध आहेत. हा हुरडा वाळवून सुद्धा ठेवतात आणि त्याचे धपाटे अप्रतिम लागतात. एकदा ओला हुरडा आम्हाला पाठवता आला नाही म्हणून सासूबाईंनी हा हुरडा वाळवून ठेवला. चला पाहूया आपण त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटतं. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आमच्या घरी कांदे पोहे हे बनवलेच जातात.माझी कांदे पोहे ही रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2एकदम सोपा,झटपट होणारा अस्सल गावरान चवीचा मेनू म्हणजे झुणका भाकरी.झुणका भाकरी म्हणलं की डोक्यावरच्या टोपलीत शेतात राबणाऱ्या घरधन्यासाठी घरधनीण झुणका,भाकर,सोबत कांदा असं घेऊन जातेय असं चित्र दिसू लागतं.किती सोपं आणि साधं जेवण हो!शिवाय पौष्टिकही."झुणका भाकर तयार आहे"या पाट्या हायवेजना जागोजागी दिसतात.खमंग,रुचकर चवीचा हा झुणका भाजीला उत्तम पर्याय.... चला घ्या आस्वाद उन उन भाकरीबरोबर या झुणक्याचा!😊👍 Sushama Y. Kulkarni -
अलूबुखार पंच (aloo bhukhara punch recipe in marathi)
#tmr माझे आवडते पटापट होणारे हे अलबुखार पंच एक आल्हादायक आणि उत्साहवर्धक पेय आहे.... Nilesh Hire -
झणझणीत पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4 #week23 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पापड हा कीवर्ड ओळखून झणझणीत आणि झटपट अशी तोंडी लावण्यासाठी ही पापड चटणी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
हरभऱ्याची कोवळ्या पानांची भाजी (harbharychi kovlya pananchi bhaji recipe in marathi)
#खासथंडीरेसिपीथंडीत मिळणाऱ्या मुबलक भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे कोवळी हरभऱ्याच्या पानांची भाजी.खास गावरान टच!साधारण दिवाळीनंतर ओल्या हरभऱ्याच्या जुड्या किंवा सोलाणे दिसू लागतात.खरंच अप्रतिम चव असते.आता याचा पाला जो असतो तो कोवळा म्हणजे घाटे फुटायच्या आधी जो खुडला जातो तो म्हणजे हा कोवळा हरभऱ्याचा पाला.परवा भाजीवालीकडे सहज दिसला आणि घेतला.ही भाजी खुडणं खूप किचकट काम."ताई,चार पाच तास ही भाजी आम्ही तिघींनी खुडली तेव्हा तीन किलो पाटीत पडली"मी आश्चर्यचकित झाले.तिने मागितले तेवढे पैसे देऊन भाजी घेतली.बऱ्याच दिवसांनी भाजी मिळाल्याचा आनंदही होताच!मन खूप मागे गेलं.माझी आजी ओला कोवळा हरभरा पाला वाळवून,गाजरं किसून वाळवून,तसंच मेथी,कोथिंबीर वाळवून डब्यात ठेवत असे.उन्हाळ्यात भाज्या मिळेनाशा झाल्या की याच भाज्या तोंडीलावणे म्हणून उपयोगी पडत.या कोवळ्या हरभऱ्याला विशिष्ट असा आंबटपणा असतो.याला ताम/तांब म्हणतात.याने संधीवात वाढतो असे म्हणतात,तरीही आयर्नचा भरपूर स्त्रोत म्हणून एकदोन वेळा खायला काहीच हरकत नाही.ही भाजी निवडलेली मिळत असली,तरी घरी आणल्यावर पुन्हा निगुतीने निबर काड्या बाजूला काढल्याशिवाय भाजी छान लागत नाही आणि शिजतही नाही.हिवाळ्यातले धुके आणि दव पडल्यामुळे या भाजीचा आंबटपणा वाढतो.हरभऱ्याच्या शेतात मग या हरभऱ्यावर पातळ धोतरासारखे कापड घालतात.दवाने ते भिजते.नंतर ते पिळून त्यातील पाणी साठवून ठेवतात. ते पोटदुखीवर जालिम औषध आहे!...खेड्यामधले हे शोध व उपाय अद्भुत आहेत ना!अशी ही बहु गुणकारी हरभऱ्याची भाजी गरम भाकरीबरोबर कमाल लागते...थंडी स्पेशल म्हणून एकदा तरी करुन बघाच😊😋😋 Sushama Y. Kulkarni -
पॉवर पॅक रेड सूप (carrot beet soup recipe in marathi)
#सूपहे सूप गाजर बीट आणि टोमॅटो पासून बनवले आहे. त्यामुळे खूप पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगले आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
#ks7#लाॅस्ट रेसिपीज्# दोडक्याची चटणीकाळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं, जीवनशैली बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. चमचमीत, मसालेदार पदार्थ आणि फास्टफूड खाण्याकडे लोकांचा कल अधिक वाढू लागला. परिणामी पारंपारीक पदार्थ अर्थातच मागे पडू लागले. साधेसुधे पण पौष्टीक पदार्थ घराघरातून जवळजवळ हद्दपारच झाले.पण मला कायम आवडणारा आणि अगदी पटकन होणारा हा पदार्थ अजूनही मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्याकडे वरचेवर हा पदार्थ करते.त्यामुळे माझ्या मुलीलाही हा खूप आवडतो. तर चला बघूया रेसिपी.....यासाठी एकदम कोवळा दोडका पाहिजे. Namita Patil -
भाजणीचे कांद्याचे थालिपीठ (bhajniche kandhyache thalipeeth recipe in marathi)
#ashr देवशयनीआषाढी एकादशीचा उपास करण्याआधी आषाढात कांदेनवमी साजरी केली जाते.हं...पण ही कांदेनवमी तुम्हाला कोणत्याही कँलेंडरवर लिहीलेली दिसणार नाही..आणि कांदेनवमी हे पण कोणीतरी शोधून काढलेलं🤣😃तरीही घराघरात पूर्वापार ही कांदेनवमी साजरी करणे म्हणजे एक सोहळाच असतो.कांदा भजी,कांद्याचे थालिपीठ, कांद्याची पात पीठ पेरलेली असे किती म्हणून पदार्थ!कांद्याला आपल्या खाद्य संस्कृती मध्ये किती मोठे स्थान आहे!कांदा थंड व तिखट गुणाचा आहे,त्याचे कितीतरी औषधी उपयोग शरिरासाठी आहेत.असा हा कांदा तामस आहारात समाविष्ट होतो.आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो.त्यामुळे इथून पुढे चार महिने असा कांदा,लसूणयुक्त तामस आहार वर्ज्यच!चार महिने कांदा,लसूण,वांगी न खाणारे माझे माहेर होते.हल्ली आता कांद्याशिवाय पानच हलत नाही.या चार महिन्यात पाऊसही कधी रिपरिप तर कधी रिमझिम असा सुरु असतो.प्रकृती स्वास्थ्यासाठीवातप्रकोप होऊ नये म्हणूनही कांदा या काळात खाऊ नये.चातुर्मास हा व्रतवैकल्याचा,पवित्र आणि सणासमारंभांची रेलचेल असल्याने त्यावेळी इथे कांद्याला स्थान नाही.सगळे सात्त्विक भाव आपल्यामध्ये उतरावेत,देहाने शुद्ध भाव आचरावा,राजस आणि तामस गुणांचा निचरा व्हावा यासाठी आपल्या पूर्वजांनी ही आहार रचना केली आहे.प्रत्येक ऋतुमधील सणवार आणिआहार यांची ऋषीमुनींनी सांगड घालून ठेवली आहे.त्याचा आरोग्याशीही संबंध आहेच!!पेश आहे आषाढातील रेसिपी निमित्त "भाजणीचं कांद्याचं थालिपीठ " Sushama Y. Kulkarni -
हाय प्रोटीन अडई विथ रेड चटणी (Adai With Red Chutney Recipe In Marathi)
#SIRसगळ्यांना hello🙋खूप दिवसांनंतर रेसिपी पोस्ट करते आहे.साऊथ इंडियन पदार्थ सगळ्यात आवडते!कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होणारे.म्हणलं तर स्ट्रीट फूड,म्हणलं तर एकदम स्टँडर्ड हॉटेलमध्ये मिळणारं आणि खूप हौशी लोकांसाठी घरीही सहज करता येणारं...म्हणजे साऊथ इंडियन फूड.शिवाय पोटभरीचं.ब्रेकफास्ट, लंच,डिनर,स्नँक्स या सगळ्या वेळी चालणारं.कधी मेन डीश तर कधी साईड डीश!घरात मोठा डबाभर इडली-डोशाचे पीठ करुन फ्रीजमध्ये ठेवलं तर अधूनमधून सहज पदार्थ करता येतात.फरमेंट केल्यामुळे साऊथ इंडियन पदार्थ सगळे प्रोटीन रिच!उडीद डाळ,हरभरा डाळ या मुख्यत्वे वापरल्या जाणाऱ्या डाळी.तांदूळही भरपूर प्रमाणात वापरतात,त्यामुळे कार्ब्ज आणि प्रोटिनयुक्त अशी हा पौष्टिक डीश बनते. 'अडई'हा इन्स्टंट डोशासारखाच फरमेंट न करता सहज होणारा प्रकार....सर्व डाळी,तांदूळ भिजवून, वाटून लागलीच करता येणारा पदार्थ!!खूप फरमेंटेशन नसल्याने कमी एसिडीक....अगदी चटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ... नारळाची ओली चटणी किंवा लाल चटणी बरोबर सहज आवडेल असा!चला तर करुन पहा प्रोटीन्स रिच अडई😋 Sushama Y. Kulkarni -
उडीद वडा (south indian style) (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स#उडीदवडा#5उडीद/ मेदु वडा दक्षिणेकडील एक खुपच फेमस breakfast......गरम गरम वडा मस्त खोबर्याच्या चटणी आणि सांभारासोबत खाण्याची एक वेगळीच मजा आहे.हा मेदु वडा उडदाच्या डाळीचा करतात.उडीद डाळ protien rich असल्याने हा breakfast साठी एक best option आहे.कारण सकाळी खाल्याने रात्रभरात कमी झालेली प्रौटिन लेवल भरून निघते.उडीद डाळीत मोठ्या प्रमाणात फॉलीक अॅसीड असते,तसेच यामुळे red blood cells वाढण्यास मदत होते.तर असा हा पौष्टीक मेदु वड्याचा नाश्ता आठवड्यातुन दोन वेळा तरी व्हायलाच पाहीजे.म्हणुन ही खास पारंपारीक रेसिपी...... Supriya Thengadi -
घुगऱ्या अर्थात तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya danachya usal recipe in marathi)
#GA4#week13 कीवर्ड तुवर विदर्भात हिवाळा संपता संपता तुरीचे पिक निघते.खळ्यामधून तूरी बारीक होऊन त्यातून दाणे पडले की त्या तूरी उफणतात आणि मग दाणे वेगळे आणि टरफले वेगळे बाहेर पडतात , तेव्हा पूर्वी शेतातच चूल पेटवून माठामध्ये पाणी घालून त्यात तुरीचे दाणे , तिखट मीठ तेल टाकून शिजवायचे आणि नंतर मस्तपैकी प्लेट मध्ये घेऊन रश्श्यासहीत , वरुन कांदा घेऊन खायचे. त्याला म्हणतात "घुग-या". तर अशा घुग-या आधी शेतात , घराघरात व्हायच्या. मी माञ वाळलेल्या तुरीच्या दाण्यांच्या घुग-या बनवल्यात! मस्त झाल्यात चवीला. ...... Varsha Ingole Bele -
गाजर बिट ज्युस (gajar beet juice recipe in marathi)
#Immunity आज आपल्यापुढे ऐकच प्रश्न आहे तो म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ति वाढवणे त्यासाठी आपल्या आहारात वापरत असलेल्या भाज्यांपासुन वेगवेगळे ज्युस बनवुन प्यायले पाहिजेत गाजर, बिट हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशिरच असतात तसेच आले ही रोगप्रतिकारक शक्ति वाढवते. लिंबामुळे व्हिटॉमिन सी मिळते चला तर असा पदार्थापासुन बनवलेला पौष्टीक ज्युस कसा करायचा ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
चटपटीत रगडा पॅटीस (ragda pattice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळा म्हटला की काही तरी गरमागरम चटपटीत खायची इच्छा होते. आणि बाहेर फिरायला गेलं की हमखास असं चटपटीत गरमागरम पदार्थांची आठवण येतेच. स्ट्रीटफूडमध्ये माझा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे रगडा पॅटीस. रगडा पॅटीस खाण्यासाठी माझ एक ठरलेल स्पॉट आहे. मी तिथेच खात असते. त्यांच्या दुकानाचं नाव 'बॉम्बे चाट'आहे. तिथे सगळं चाट हायजीन असतं. आणि खूप स्वच्छता बाळगतात. त्यामुळे उन्हाळा,पावसाळा असो किंवा हिवाळा सर्वच ऋतूत मी तिथेच रगडा पॅटीस खात असते.पण 4,5 महिन्यात खाण्याचं तर सोडा त्या वाटेने जायला सुद्धा मिळालेल नाही.आता तर बाहेर खाण्याचा विचारच करावा लागतो कारण आपण सगळे जाणताच😷. पावसाळ्यात जेव्हा ही पाऊस सुरू असतो तेव्हा तो चाट वाला भाऊ आवर्जुन आम्हाला गाडीतच मस्त गरमागरम प्लेट आणून देतो. आणि आम्ही छान पावसात गाडीत बसून खाण्याचा आस्वाद घेत असतो. पण यावर्षी पावसाळ्यात ते क्षण अनुभवायला मिळणार नाही. तेव्हा त्या बॉम्बे चाटच्या आठवणीत आज रगडा पॅटीस केला. पण बघा गम्मत अशी मी ज्यावेळी हयाला केला. त्यावेळी बरोबर पाऊस आला फरक एवढाच की मी गाडीत नव्हे तर घरी गॅलरीत बसून खाण्याचा आस्वाद घेतला.😀 आणि एक मेन गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच केला खूप छान टेस्टी झाला. हल्ली बाहेरच खायचे त्यामुळे घरी करण्याचा कधी योगच नाही आला. त्यामुळे आज स्वतःच्या हाताने करून खाण्याचा भारी आनंद होतोय😁. घरीसुद्धा सर्वांना आवडला. चला तर मग बघुयात मी केलेला रगडा पॅटीस.😍 Shweta Amle -
हातावरची भाकरी आणि कांद्याची चटणी
#रेसिपीबुक #week2लॉक डाऊन मुळे मी गावाला आली आहे. तसे पण मी सुट्ट्यांमध्ये खेड्यावर आमच्या गावी येत असते दोन महिने आम्ही तिकडेच असते. त्यामुळे मला शेतामध्ये जायची संधी मिळते. शेतामध्ये काम करायला मजूर राहते तेव्हा त्याच्या सोबत जाते काम पण करते बर का मी त्याच्या सोबत माझ्या शेतात. मी तेव्हा हातावरच्या भाकरी कांद्याची चटणी हा बेत एक नंबर आणि सगळ्यांना आवडते माझ्या घरी उन्हाळ्यात भाजीपाला लावते. आम्ही शेतामध्ये मग रोज सकाळी भाजी पाला तोडायला जावे लागते . शेतकऱ्यांचे हाल शेतकऱ्यांनाच माहिती असते बाकीच्यांनामज्या वाटते उन्हाळा ,पावसाळा, हिवाळा, पाण्या पावसात , कडक उन्हामध्ये जेव्हा मजूर काम करते आणि त्यांच्या शरीरावरचा घामाचे थेंब जमिनीवर पडतात तेव्हा कळते काय असते अन्नाचे महत्त्व .तेव्हा पिझ्झा बर्गर नाही चटणी-भाकर आठवते. आणि अन्नाचे महत्त्व कळते. चला तर बनवूया मग हातावरच्या भाकरी आणि कांद्याची चटणी... Jaishri hate -
प्रान्स सुक्का मसाला (Prawn Sukha Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOk #माझीआवडती रेसिपी #फिश मधील प्रान्स च्या वेगवेगळ्या रेसिपी माझ्या घरात सगळ्यांनाच आवडतात त्या तर मी नेहमीच बनवते पण माझी सगळ्यात आवडती डिश आहे प्रान्स सुक्का मसाला चला तर मी ही डिश कशी बनवते ते बघुया Chhaya Paradhi -
मटार मशरूम कढाई मसाला (Matar mushroom Kadai Masala recipe in marathi)
आरोग्यासाठी हितकारक असलेले भरपूर पौष्टिकतेने भरलेले मशरूम....रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर मश्रुम कढाई मसाला हा भाज्यांमध्ये एक उत्तम पर्याय म्हणून वेटर कडून आपल्याला सुचविला जातो आणि ज्यांना मशरूम आवडतात ते हा पर्याय निवडतात...घरच्या घरी कसे बनवायचे चला तर मग पाहूया.... Prajakta Vidhate
More Recipes
टिप्पण्या