व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)

Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja

#EB12
#W12
या आठवड्यात मी 'व्हेज मराठा' ही भाजी बनवत आहे. जर तुम्ही 'शाकाहारी' असाल पण पंजाबी भाज्यांमध्ये नेहमी पनीर खाऊन कंटाळला असाल तर ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल.

व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)

#EB12
#W12
या आठवड्यात मी 'व्हेज मराठा' ही भाजी बनवत आहे. जर तुम्ही 'शाकाहारी' असाल पण पंजाबी भाज्यांमध्ये नेहमी पनीर खाऊन कंटाळला असाल तर ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दीड ते 2 तास
4 जणांसाठी
  1. वडे बनवण्यासाठी
  2. 2 कपकोबी बारीक चिरून
  3. 2 कपगाजर किसून
  4. 1/2 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 4 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  6. 4 टेबलस्पूनमैदा
  7. 1 चमचाकिचन किंग मसाला
  8. 1 चमचाधने पावडर
  9. 1 चमचालाल तिखट
  10. 2 चमचे"आले-लसुण-मिरची" पेस्ट
  11. मीठ (चवीनुसार)
  12. तेल (तळण्यासाठी)
  13. ग्रेव्हीसाठी
  14. 3मोठे कांदे
  15. 2मोठे टोमॅटो चिरून
  16. 8 ते 10 लसुण पाकळ्या
  17. 1.5 इंचआले बारीक चिरून
  18. 1/2 कपसुके खोबरे किसून
  19. 2 टेबलस्पूनतीळ
  20. 3 टेबलस्पूनकाजु तुकडे
  21. 2 टेबलस्पूनजीरे
  22. 7ते 8 कडीपत्त्याची पाने
  23. 2सुक्या लाल मिरच्या
  24. 2 टेबलस्पूनकिचन किंग मसाला
  25. 1 टेबलस्पूनधने पावडर
  26. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  27. 50 ग्रॅमखवा
  28. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  29. चवीनुसारमीठ
  30. 3 टेबलस्पूनतेल
  31. पाणी
  32. सजावटीसाठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

दीड ते 2 तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात कोबी आणि गाजर एकत्र घ्यावे नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, धने पावडर, किचन किंग मसाला, आले-लसुण-मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण एकसारखे ढवळावे.
    या मिश्रणाला थोडेसे पाणी सुटेल तेव्हा यात कॉर्नफ्लोअर आणि मैदा समप्रमाणात घालावा.

  2. 2

    कॉर्नफ्लोअर आणि मैदा यांचे प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करावे. (काहीवेळा दिलेल्या प्रमाणापेक्षा हे जिन्नस जास्त लागू शकतात.) आता हे सर्व एकजीव मिसळून याचा एक गोळा करावा.
    नंतर याचे छोटे छोटे चपटे गोळे करून तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत.

  3. 3

    आता ग्रेव्हीसाठी गॅसवर एका कढईत 2 tbs तेल घ्यावे. तेल गरम झाले की त्यात चिरलेला कांदा, लसुण पाकळ्या आणि बारीक चिरलेले आले घालून परतावे. कांदा सोनेरी होईपर्यंत परतावे नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून परतावे. टोमॅटो काही मिनिटे परतला की त्यात तिळ, किसलेले सुके खोबरे आणि काजु घालून परत परतावे. सर्व पदार्थ व्यवस्थित परतले गेले की हे मिश्रण गार होण्यासाठी बाजूला ठेवावे.

  4. 4

    आता हे मिश्रण गार झाले की ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची smooth पेस्ट करून घ्यावी.

  5. 5

    आता परत गॅसवर एका कढईत 1 tbs तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जीरे, सुक्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पाने घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात मिक्सरमध्ये केलेली पेस्ट घालून ती पेस्ट परतावी. पेस्ट परतत असताना त्यात खवा घालावा आणि मिश्रणात एकजीव होइपर्यंत ढवळावा, आता मिश्रणात लाल तिखट, किचनकिंग मसाला, धने पावडर, जीरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून ढवळावे आणि ग्रेव्ही थोडीशी पातळ होईल एवढे पाणी घालून तिला झाकून काही मिनिटे मंद आचेवर ठेवावी.

  6. 6

    आता ग्रेव्हीला छान उकळी फुटली की एका भांड्यात तयार केलेले वडे घालून त्यावर तयार ग्रेव्ही घालावी आणि आपल्या आवडीप्रमाणे सजवून गरमागरम रोटी/नान/पोळीसोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
रोजी
cooking हा माझा एक आवडता छंद आहे, वेगवेगळ्या रेसिपी try करायला मला खूपच आवडते माझे स्वयंपाकघर ही माझी प्रयोगशाळा आहे म्हणायला हरकत नाही. फक्त मी हाडाची vegetarian असल्याने veg रेसिपीच try करते. वेगवेगळ्या रेसिपी साठी लागणारी वेगवेगळी भांडी आणि त्या सर्व्ह करण्यासाठी आकर्षक अशी भांडी खरेदी करायला ही मला खुप आवडते
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes